
मग भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टलच्या बातमीने भीमराव पडोळेसह अनेकांवर कारवाया का झाल्या ? पत्रकारीतेच्या नावाखाली गैंग बनवून सुपारी घेणाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे.
भद्रावती प्रतिनिधी :-
आजची पत्रकारिता ही अनेक गुंड मवाली, नतभ्रष्ट आणि दलाली करणाऱ्यांची जणू पाठराखण करणारी ठरत आहे की काय? अशीच परिस्थिती काही अपवाद वगळता सगळीकडे दिसत आहे. कारण एखादा अधिकारी बनण्यासाठी जी शैक्षणिक पात्रता लागते ती शैक्षणिक पात्रता पत्रकारितेत आवश्यक राहिली नाही आणि म्हणूनच ज्यांना पत्रकारीतेचे अवाक्षरही कळत नाही ते सुद्धा पत्रकार म्हणून मिरवीत असल्याने पत्रकारिता आता जणू धोक्यात आली आहे.
असाच एक किस्सा सद्ध्या भद्रावती येथे गाजत असून एकीकडे भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टल मधे पोलिस हवालदार भीमराव पडोळे यांच्या भ्रष्ट कारणाम्याची मालिका प्रकाशित झाल्याने भांबावलेल्या भीमराव पडोळे यांनी काही भाडोत्री व एका पोर्टलच्या नावावर जमा झालेल्या गैंगच्या माध्यमातून स्वतःची स्तुती करून घेतली होती मात्र हा भीमराव असा कसा ? हा प्रश्न भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टल वर प्रकाशित झाल्याने ही भाडोत्री गैंग बिथरली आणि भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टलच्या संपादकाना उलट सुलट नावे ठेवली पण ज्या भीमराव पडोळे यांची ही बोगस गैंग स्तुती करीत होती त्या पडोळे ची वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी त्वरित बदली केल्यामुळे ही गैंग तोंडघशी पडली, अर्थात त्यामूळे भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टल चे सर्वत्र अभिनंदन करण्यात आले. आता आपण तोंडघशी पडलो याचा भास झाल्यावर ही बोगस गैंग आता पुन्हा संपादका वर ताशेरे ओढून स्वतःचीच इज्जत वेशीवर टांगायला जणू उतावीळ झाली असल्याचे दिसत आहे कारण यांना माहीत नाही की आपण जी गैंग बनवून फिरत आहो त्या गैंग ला अधिक्रुत कुठलाही अधिकार नाही त्यामुळे यांच्यावर गुन्हे दाखल होऊ शकते कारण ज्याअर्थी वरिष्ठ पोलिस विभागामार्फत चौकशी झाल्याने भीमराव पडोळे ची बदली झाली त्याला हिरो बनवणे म्हणजे वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्या निर्णयावर आक्षेप घेणे होते आणि ह्या गैंग कडे कुठलीही शैक्षणिक पात्रता आणि अनुभव नसल्याने पत्रकारितेच्या नावावर गैंग बनवून दुसऱ्यांच्या चारीत्र्यावर शिंतोडे उडवणे म्हणजे पोलिस विभाग अशा गैंग वर कारवाई करू शकतात आणि महत्वाची बाब म्हणजे पत्रकारिता हा काही बदमाशाचा अड्डा नाही की पाहून घेण्याची भाषा ही गैंग वापरत आहे, कारण पत्रकारितेत निटनेटक्या शब्दांचे खेळ असते व वायफळ शब्दांचा प्रयोग म्हणजे स्वतःची कमकुवत बुद्धिमत्ता उघड करते ते ह्या बोगस गैंग ला कोण सांगेल ? पण भीमराव पडोळे यांना देवदूत बनवून त्या देवदूता कडून माल कमावला व भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टल ला बदनाम करण्याची सुपारी घेतली त्याची परतफेड केली नाही तर भीमराव पडोळे सुद्धा ह्या गैंग ला सोडणार नाही आणि म्हणूनच भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टल वर ज्या बातम्या येतात त्या फेक येतात असे ह्या गैंग चे म्हणणे आहे परंतु महत्वाची बाब म्हणजे भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टल च्या बातमी ने कोळसा, रेती, दारू इत्यादी व्यवसायिक व विविध विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली एवढेच नव्हे तर प्रभारी उपविभागीय वन अधिकारी यांच्या भ्रष्टाचाराची मालिका सद्ध्या सुरू आहे मग ह्या सर्व बातम्या फेक असत्या तर संपादका वर कारवाई झाली असती मात्र ह्या भाडोत्री गैंग च्या एकालाही लिहिता येत आणि त्यांची पत्रकार बनण्याची लायकी नाही व भीमराव पडोळे प्रकरणी ते तोंडघशी पडले असल्याने ते गैंगवार वर उतरले आहे, भ्रष्टाचार करणाऱ्यांना साथ म्हणजे भ्रष्टाचार करणे होय हे भद्रावती शहरातील जनता ओळखून आहे, कारण ह्यांना जर भ्रष्ट भीमराव पडोळे हा देवदूत वाटत असेल आणि पत्रकारितेत ज्यानी खडतर प्रवास करून आपली छाप सोडली ते झोलाछाप वाटत असेल तर यांना वेड्याच्या इस्पितळात भरती व्हावे असेच सुज्ञ नागरिकांना वाटत आहे.