
मनसेचे शहर उपाध्यक्ष मोहसीण सय्यद यांच्यासह इतर मुस्लिम युवकांनी केली होती तक्रार,
वरोरा प्रतिनिधी :–
सद्ध्या सामाजिक माध्यमांमधे धार्मिक भावना भडकवुण एका विशिष्ट धर्म समुदायाला बदनाम करण्याचे छडयंत्र रचल्या जात आहे, जे सर्वधर्मसमभाव ह्या भारतीय मूळ संकल्पनेला तिलांजली देण्यासारखे आहे. कारण भारतात सर्व धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत असून एकमेकांच्या धार्मिक आणि सामाजिक उपक्रमात सहभागी होतात मात्र राजकीय सुडबुद्धिने काही धर्मांध व्यक्ती धर्मगुरूलाच लक्ष करून सामाजिक माध्यमांमधे त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह व्यक्तव्य व बदनामी करतात अशा धर्मांध व्यक्तींवर कारवाई होणे आवश्यक झाले आहे.
अशीच घटना फेसबुक या सामजिक माध्यमांवर घडली असून वरोरा येथील अभी भागडे या व्यक्तींनी दिनांक २२ सप्टेंबरला दुपारी २ वाजून ३६ मिनिटांनी दिल्ली येथील मरकज चे सर्वेसर्वा व मुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात “मौलाना साद का भी ऍन्काउंटर हो” अशा प्रकारची धार्मिक भावना भडकवणारी पोस्ट टाकली होती. या विरोधात वरोरा शहरातील मुस्लिम समुदायात अत्यंत आक्रोश व्यक्त होत असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष मोहासीण सय्यद यांनी आपल्या सहकाऱ्यांना घेवून समाजकंटक अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पोलिस स्टेशन मधे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारी वरूम पोलिसांनी अभी भागडे यांना चौकशी साठी ताब्यात घेतले असून बातमी लीहीस्तोवर त्याचे वर गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती आहे. परंतु आता अभी भागडे यांना अटक करते की पोलिसांवर दबाव येत असल्याने अशा समाजकंटकाला सोडून दिल्या जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.