You are here
Home > चंद्रपूर > खळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.

खळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.

सहाय्यक पोलिस निरीक्षक जितेंद्र बोबडे यांच्या नेत्रुत्वात तब्बल 72 तासांपेक्षा जास्त वेळेपर्यंत दारू माफीयांचा शोधाशोध सुरू .

चंद्रपूर प्रतिनिधी :-

जिल्ह्यात सर्वत्र दारू माफीयांचा धुमाकूळ सुरू असताना आता जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी आपले खास भरारी पोलिस पथक तयार करून दारू माफीयांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे, त्यातच पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या विधानसभा क्षेत्रात अक्षरशः 72 तासांपासून अवैध दारू तस्करांचा शोधाशोध सुरू आहे. मागील तीन दिवसापासून

सहाय्यक पोलिस निरीक्षक जितेंद्र बोबडे यांच्या नेत्रुत्वात खास पोलिस भरारी पथक ब्रम्हपुरी, शिंदेवाही, सावली सोबतच नागभीड चिमूर आणि मूल मधे फिरत असल्याने बाहेरील जिल्ह्यातून कुठलीही दारू इथे आली नाही त्यामुळे एकीकडे दारू शौकीन दुःखी आहे तर दुसरीकडे दारू माफीयांचा शोध भरारी पथक करीत असल्याने सर्वच दारू माफीया हे जणू भूमिगत झाले असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामूळे “इतना सन्नाटा क्यू भाई” अशी म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे, कारण जनता कर्फूमधे लोक रस्त्यांवर असले तरी दारूच मिळत नसल्याने दारू शौकीन मात्र आपल्या घरात आहे. महत्वाची बाब म्हणजे काही दिवसापूर्वी एका ऑडियो मधून पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या जवळच्या व्यक्तीचे अवैध दारू विक्री संबंधात संभाषण सर्वच प्रसारमाध्यमांमधे गाजले होते व त्यातून पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी याची गंभीर दखल घेत पोलिसांना कारवाईचे आदेश दिले होते, त्यामुळेच त्यांच्या क्षेत्रात जो दारू माफीयांचा धुमाकूळ होता त्यावर आता पायबंद घातल्या गेल्याचे दिसत आहे.

एकीकडे पालकमंत्री यांच्या प्रभाव क्षेत्रात दारू माफीयांच्या मुसक्या आवळन्यास सुरुवात झाली असली तरी चंद्रपूर जिल्ह्यातील इतर भागत मात्र अवैध दारू विक्रेते जणू सैराट झाले असल्याचे चित्र आहे. या क्षेत्रात सुद्धा जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी दखल घेतली तर इथे सुद्धा दारू माफीयांची धरपकड होऊन अवैध दारू पुरवठा खंडित होऊ शकतो पर्यायाने दारूबंदी सफल होऊ शकते.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा