You are here
Home > कोरपणा > धक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण ?

धक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण ?

कोरपना पोलीस स्टेशन येथे विजय बावणे सह इतरांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल,

कोरपना प्रतिनिधी :

सत्ता आली की माणसाला कसा माज येतो हे चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच चर्चेची बाब राहिली आहे, कारण जिथे सत्ता तिथे सर्वकाही मैनेज होतं आणि म्हणूनच आम्हच कोण काय बिघडवत ते पाहून घेतो या तोऱ्यात सत्ताधारी वागत असतात अशीच एक मस्ती चढलेल्या कोरपना येथील CDCC, बँकेचे संचालक व नगरपंचायती स्वीकृत सदस्य विजय बावणे यांनी मोहब्बत खान या पत्रकार प्रतिनिधी असलेल्या व्यक्तीच्या घरात आपल्या समर्थकांसह घुसून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक बाब उघड झाली असून विजय बावणेसह नितीन बावणे, सुनील बावणे, नगरपंचायत चे उपाध्यक्ष मनोहर चेन्न, स्वप्निल गाभणे, पियुष कावळे इत्यादीविरोधात कोरपणा पोलीस स्टेशन येथे विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे ,

महाराष्ट्र 24 न्यूज चे मोहब्बत खान यांनी नगरपंचायत कोरपना जनादेश 2020- 2021 या ग्रुप वर विजय बावणे यांच्या समर्थकांविरोधात टिकात्मत व निदनीय लेख लिहिला असल्याने व त्यामुळे कोरपना नगरपंचायतचे गैरव्यवहार व भोंगळ कारभाराचे वाभाडे काढल्यामुळे बावणे समर्थकांनी भ्रमणध्वनीवरून मोहब्बत खान यांना मारपीट करण्याची धमकी देऊन विजय बावणेसह समर्थकांनी मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारपीट केली व बहीण मिनाज अंजुम यांचे हात ओढून आईला धक्काबुक्की करून खाली पाडले, दरम्यान आरडा ओरड झाल्याने घरा पलीकडले लोक जमा झाले तेव्हा आपल्या समर्थकांसह विजय बावणे सह समर्थकांनी तिथून पळ काढला, या घटनेची तक्रार मोहब्बत खान यांनी कोरपना पोलीस स्टेशन गाठून दिली त्यावेळी विजय बावणे आपल्या समर्थकांसह पोलीस स्टेशन मध्ये येवून गोंधळ घालत असताना पोलिसांनी हस्तक्षेप करून मोहब्बत यांना संरक्षण दिले पोलिसांनी अ . प्र. क्र.०२६४. कलम भा. द. वी. 147, 148, 149, 506, 507, 294, 332, 452, अन्वये गुन्हा दाखल केला, या घटनेमुळे मोहब्बत खान यांचा परिवार भयभीत झाला असून याची दखल तालुका पत्रकार संघाने घेतली व या घटनेचा निषेध करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा