You are here
Home > महाराष्ट्र > उदयनराजे भाजपात; पृथ्वीराजशी लढत

उदयनराजे भाजपात; पृथ्वीराजशी लढत

राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत उदयनराजे भोसले यांनी आजच भाजपात प्रवेश केला. यावेळी त्यांनी खासदारकीचाही राजीनामा दिला. अमित शाह आणि जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केला. शुक्रवारी संध्याकाळीच उदयनराजे भोसले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यासह दिल्लीला गेले होते. शनिवारी सकाळी त्यांनी भाजपात प्रवेश केला. राज्यात विधानसभा निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते. अशात उदयनराजेंनी भाजपा प्रवेशाआधी खासदारकीचा राजीनामा दिल्याने सातारा येथील लोकसभेची पोटनिवडणूकही त्याचवेळी होऊ शकते. इतकंच नाही तर ही लढत पृथ्वीराज चव्हाण आणि उदयनराजे भोसले अशी होण्याची शक्यता आहे.

खासदारकीचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या उदयनराजे भोसले यांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरच भाजप पुढं चाललाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा देशातील लोकशाही मजबूत करण्याचं काम करताहेत. त्यांच्या कामानं प्रभावित होऊन मी भाजपशी जोडून घेण्याचा निर्णय घेतला,’ असं उदयनराजे यांनी यावेळी सांगितलं

admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा