You are here
Home > चंद्रपूर > बल्लारपूर मतदारसंघ : काँग्रेसकडून तेली समाजाचा चेहरा

बल्लारपूर मतदारसंघ : काँग्रेसकडून तेली समाजाचा चेहरा

चंद्रपूर/प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेससाठी अनुकूल स्थिती निर्माण झाल्याने राज्याचे हेवीवेट नेते अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा मतदारसंघ असलेल्या बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून प्रतिस्पर्धी उमेदवार निवडण्यासाठी काँग्रेसकडून काही नवीन चेह-याची चाचपणी केेली जाात आहे.
जातीय समीकरणाच्या दृष्टीने पाहिल्यास कुठल्याच एका जातीचे या मतदारसंघात प्राबल्य नाही. या मतदारसंघात तेली, माळी, कुणबी, आदिवासी, दलित आणि हिंदी भाषिक हे जवळपास समसमान म्हणजे 35 ते 40 हजारांच्या घरात आहे. माळी समाज भाजपशी जुळला असल्याने काँग्रेस तेली समाजातील नेत्याला रिंगणात उतरविण्याची तयारी करीत आहे. यात कॉग्रेस सेवादलचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत खनके, माजी आमदार देवराव भांडेकर, चंद्रपुरातील हृदयरोगतज्ञ डॉ. विकास झाडे, माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, विनायक बांगडे यांनी दावेदारी केली आहे.
बल्लारपूर हा 2009 साली मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर मूल तालुक्यास नव्याने अस्तित्वात आलेला मतदारसंघ आहे. या मतदारसंघाच्या जन्मामुळे सावली तालुका ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात गेला. चंद्रपूर जिल्ह्यातील शोभाताई फडणवीस यांचे नेतृत्व अस्ताला गेले तर सुधीर मुनगंटीवार यांचं नेतृत्व उदयाला आले. 2009 आणि 2014 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये सुधीर मुनगंटीवार विजयी झााले.
तेव्हापासून मुनगंटीवारांना टक्कर देऊ शकेल, असा उमेदवार पुढे करण्यात काँग्रेस अपयशी ठरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य उमेदवारीसाठी इच्छुक असून, त्यांनी या भागात जनसंपर्क देखील सुरु केला आहे. मात्र, राज्यात आघाडी असल्याने ही जागा काँग्रेसच्या वाट्याला आहे. मागील दोन-चार दिवसाआधी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या यात्रेत वैद्य यांनी ही जागा राष्ट्रवादीला सोडण्याची मागणी केली. पण, त्यावर अजून कोणताही निर्णय झालेला नाही.

राज्याचे वित्तमंत्री आणि भाजपचे जेष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या बल्लारपूर मतदार संघात आगामी विधानसभेत अतिशय रंगतदार लढाई होण्याची शक्यता आहे.  2019 च्या लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर जिल्हा हा सर्वार्थाने धक्कादायक निकाल देणारा ठरला. सुधीर मुनगंटीवार यांच्या सारख्या मातब्बर नेत्याच्या मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराला मिळालेली 31 हजारांची आघाडी मिळाली. हीच बाब काँग्रेससाठी आशादायी आहे.

दारूबंदीचा फटका बसला की नाही हा जरी मतभेदाचा मुद्दा असला तरी मुनगंटीवारांच्या विरोधातला प्रचार या एकाच मुद्द्यावर केंद्रित झाला तर आश्चर्य वाटायला नको. विरोधक एकीकडे दारूबंदी आणि OBC कार्ड खेळण्याच्या तयारीत असतांना भाजप मात्र राजू झोडे आणि बहुजन-वंचित आघाडीच्या माध्यमातून होणाऱ्या मतविभाजणीवर डोळा ठेवून आहे. राजू झोडे यांनी दलित आणि मुस्लिम समाजात स्वतःचा मोठा जनाधार तयार केलाय तर वंचित बहुजन आघाडीने देखील लोकसभेत 33 हजार मतं घेऊन सर्वांनाच बुचकळ्यात टाकलंय. या वेळी सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधक OBC कार्ड चालविण्याची दाट शक्यता आहे. म्हणून काँग्रेस पक्ष तेली समाजातून उमेदवार शोधत आहे. तर दुसरीकडे मुनगंटीवार यांनी मूल शहरात माळी समाजाचा मेळावा घेतला. यावरून जाती जातीत राजकीय गणिते जुळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. मागील लोकसभा निवडणुकीत तेेली समाजाचे विनायक बांगडे यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, ऐनवेळी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये दाखल झालेले बाळू धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे तेली समाज नाराज झाला. ही नाराजी दूर करण्यासाठी बल्लारपूर मतदारसंघात तेली समाजाचे उमेदवार देण्यासाठी पक्षाने काही नेत्यांची चाचपणी सुरू केली आहे. यातच सावलीचे माजी आमदार भांडेकर यांनी तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांच्याविषयी मात्र पक्षश्रेष्ठी फारसे उत्सुक दिसत नाहीत. तरुण चेहरा म्हणून हृदय रोग तज्ञ डॉक्टर विकास झाडे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. मात्र राजकारण आणि काँग्रेस यांच्याशी त्यांचा कोणताही संबंध नसल्याने अनेकांनी विरोध केला. त्यानंतर काँग्रेस सेवादलचे राष्ट्रीय अध्यक्षांनी एक जागा सेवादलला विनंती केली. त्यामुळे चंद्रपूर जिल्हा सेवादलाचे अध्यक्ष सूर्यकांत खनके यांच्या नावाविषयी चर्चा सुरू झाली आहे. ते तेली समाज संघटनेचेे ज्येष्ठ पदाधिकारी आहेत. झाल्यास तेली समाज पुन्हा एकदा एकत्र येऊन ही लढाई जिंकण्याची शक्यता आहे.

admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा