You are here
Home > कृषि व बाजार > अखेर पीडित डॉ. युवतीच्या लढाईला मिळालं यश

अखेर पीडित डॉ. युवतीच्या लढाईला मिळालं यश

वरोरा येथील डॉ.सनी आंबेकर यांच्या आई वडिलांना पुणे पोलिसांकडून अटक !

वरोरा – येथील डॉ सनी आंबेकर यांचे पुणे येथील डॉ. मुलीवर प्रेम जमले होते. नंतर प्रेमाचे रूपांतर लग्नात करण्याच्या आणाभाका घेतला गेल्या पण मुलीचे एमडी ची अंतिम वर्षाची परीक्षा संपल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय दोघामधे होऊन डॉ सनी यांनी वरोरा येथे सुखकर्ता नावांनी हॉस्पिटल सुरू केले. दोघांमध्ये मोबाईलवर बोलणं व्हायचं पण फेब्रुवारी 2019 मधे अचानक डॉ सनी यांनी पीडित युवतीसोबत बोलने बंद केले त्यामुळे ती युवती वरोरा येथे आली असता तिचेवरच सनी आणि त्याच्या आई वडीलांनी मारण्याची धमकी देवून हाकलून लावले होते. मात्र वरोरा येथील सामजिक कार्यकर्ती जबिन दोसाणी आणि मनसेचे राजू कुकडे यांचेकडे पीडित युवतीने संपर्क केल्यानंतर हे प्रकरण जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांचेकडे गेले. त्यांनी तत्काळ या प्रकरणी वरोरा उपविभागीय पोलीस अधिकारी यांचेकडे पाठवून डॉ सनी आंबेकर व इतरांवर कलम 376 व इतर विविध कलमान्वे गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले. गुन्हे दाखल झाले खरे पण ही केस पुणे येथील हडपसर व नंतर हिंजेवाडी पोलीस स्टेशन मधे स्थानांतरीत करण्यात आल्याने डॉ सनी यांनी त्या दरम्यान अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयातून मिळवून घेतला.मात्र प्रकरण जसे पुणे पोलीसांकडे सोपविण्यात आल्यानंतर व या प्रकरणाचा तपास हिंजेवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उद्धव खाडे यांचेकडे आल्यानंतर त्यांनी तपासाची सूत्रे फिरवून या प्रकरणी डॉ सनी आंबेकर यांच्या सोबत दोषी असणाऱ्या त्यांच्या आई वडिलांना दिनांक 1 जून ला सायंकाळी वरोरा येथुन अटक केली. त्यानंतर डॉ सनीच्या सुखकर्ता हॉस्पिटलची चौकशी केली असता त्यातील सीसीटीवी फुटेज डीलिट मारण्यात आल्याचे कळताच पुणे पोलिसांनी कंप्यूटर एक्सपर्ट कडून ती फुटेज मिळविले आणि आज दिनांक 2 जुनला जयंत आंबेकर व त्यांच्या पत्नीला पुणे पोलिसांनी पुणे पोलीस स्टेशन येथे घेऊन गेले आहे. या घटनेने वरोरा परिसरात पुन्हा एकदा डॉ सनी आंबेकर यांच्या क्रुष्णक्रुत्याची चर्चा रंगली आहे.विशेष म्हणजे डॉ सनी यांनी हे प्रकरण सुरू असताना दुसरे लग्न केले असल्याची सुद्धा चर्चा आहे. पीडित युवतीने सामजिक कार्यकर्ती अनेक मुलींना युवतींना व महिलांना न्याय मिळवून दिला त्या जबिन दोसाणी आणि मनसेचे राजू कुकडे व इतर सहकाऱ्यांचे सहकार्य केल्याबद्दल आभार मानले….

admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा