You are here
Home > राजकारण > मनसे उमेदवार रमेश राजूरकर यांची आभार सभा संपन्न,

मनसे उमेदवार रमेश राजूरकर यांची आभार सभा संपन्न,

वरोरा प्रतिनिधी :-

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा भद्रावती विधानसभा मतदार संघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार रमेश राजूरकर यांच्या उमेदवारीची सर्वत्र चर्चा होती की ते निवडून येईल. तसा पोलिस प्रशासनाचा सुद्धा अहवाल होता मात्र निवडणुकीच्या दोन दिवसात प्रतिस्पर्धी उमेदवारांनी मतदारांना पैशाचा मोठा वाटप केल्याने वातावरण फिरले आणि अनपेक्षितपणे काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर ह्या निवडून आल्या. खर तर अवघ्या दहा ते बारा दिवसात एका नवख्या उमेदवारांनी संपूर्ण विधानसभा मतदार संघच नव्हे तर जिल्ह्यात आपली ओळख निर्माण करून तब्बल ३५ हजार मतदान घेणे म्हणजे तो उमेदवार किती पावरफुल असेल हे यावरून दिसून येते. काही उमेदवार हरल्यानन्तर राजकीय प्रवाहातूण वेगळे होतात हे आजपर्यंतचा अनुभव आहे मात्र निवडणूक हरल्यानंतर सुद्धा मतदारांचे जाहीर आभार तोच मानतो जो आपल्याला पुन्हा लढायचं आहे हे धेय्य डोळ्यासमोर बाळगतो.अगदी त्याच ध्येयाने पछाडलेल्या रमेश राजूरकर ह्या ध्येयवेड्या समाजसेवीनी ज्या ३५ हजार मतदारांनी विश्वास टाकला त्यांचे आभार मानण्यासाठी भद्रावती आणि वरोरा इथे जाहीर आभार सभांचे यशस्वी आयोजन केले. या आभार सभांना रमेश राजूरकर यांच्यासह विधानसभेचे माजी उपाध्यक्ष मोरेश्वर टेमुर्डे.मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे. जिल्हा सचिव विनोद सोनटक्के.यांनी मार्गदर्शन केले.या आभार सभांमुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यामधे काम करण्याची ताकत आल्याने या विधानसभा क्षेत्रात मनसेचे संघटन वाढणार असल्याचे बोलल्या जटा आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा