You are here
Home > चंद्रपूर > बैलांच्या खरेदीकडे शेतकऱ्यांची पाठ

बैलांच्या खरेदीकडे शेतकऱ्यांची पाठ


राजुरा : काही वर्षापूर्वी शेतीसाठी बैल अत्यावश्यक मानला जात होता. आजही बैलजोडीचे महत्त्व कायम आहे. परंतु, शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे आता बैलांना पोसणे शेतकऱ्यांना कठीण होत आहे. शेतीतून लावगडीचा खर्च निघणे कठीण झाल्याने शेतकऱ्यांच्याच जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतीसाठी बैलजोडी खरेदी न करता ट्रॅक्टर व अन्य आधुनिक साधन वापरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. ज्यांच्याकडे बैलजोडी आहे ते विकण्यासाठी बाजारात आणत आहेत. परंतु, खरेदीदार मिळत नसल्याने दिसून येत आहे. शेतीसाठी बैल करणाऱ्यांचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. त्यांची जागा ट्रॅक्टर, मळणीयंत्र व नवनवीन साधनांनी घेतली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून राबणारा बैल कृषी संस्कृतीपासून दुरावत चालला आहे. काही वर्षापूर्वी शेती करायची असेल तर कसण्यासाठी बैलांशिवाय पर्याय नव्हता. त्यासाठी वाटेल तेवढी किंमत मोजून बैलांची खरेदी केली जात असे. बैल हा शेतकरी कुटुंबातील एक सदस्य म्हणून वावरत होता. परंतु, कालानुरुप शेतातून उत्पन्न कमी होत गेले. चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला. बैलांना पोसणे शेतकऱ्यांना कठीण होत गेले तेव्हापासून बैल विकण्यासाठी बैलबाजारात गर्दी होत गेली. परंतु, बैलांना विकण्याचा सपाटा सुरू झाला असला तरी खरेदीदार मिळत नाही. कारण बहुतेक शेतकऱ्यांचीच अवस्था आता बदलत आहे. याचा अर्थ शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बदलली असे नाही. एकेकाळी चंद्रपूर, राजुरा, नागभीड, वरोरा व भद्रावती येथील बैलबाजार सर्वदूर परिचित होता. विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून बैलांचे शौकीन या ठिकाणी यायचे. कोटीचे उलाढाल व्हायची. पण आता बाजार एकाकी पडला आहे. बाजार भरतो पण शेतकरी खरेदीदार कमी येतात. बैलांना कत्तलीसाठी विकत घेणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या अधिक दिसते. .

admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा