You are here
Home > कृषि व बाजार > अमृत कलश योजनेत निकृष्ठ दर्जाचे काम

अमृत कलश योजनेत निकृष्ठ दर्जाचे काम

ठेकेदारावर तात्काळ गुन्हा दाखल करा – किशोर जोरगेवार

 चंद्रपूर –   शहरातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी करोडो रुपये खर्च करुन राबविण्यात येत असलेल्या अमृत कलश योजनेचे काम हे नियमबाह्य रित्या केल्या जात असून याचा मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. या योजनेसाठी लावण्यात येत असणारे पाईप रस्त्यावर टाकुन ठेवण्यात आल्याने वाहतूकीस अडचण निर्माण होत असून अनेक अपघात झाले आहे. त्यामध्ये नागरिकांना आपला जीव सुद्धा गमवावा लागला आहे. त्यामुळे नागरिकांना वेटीस धारणा-या संबधीत ठेकेदरावर गुन्हा दाखल करा अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष किशोर जोरगेवार यांनी केली आहे. या मागणीचे निवेदनही त्यांनी अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांना दिले आहे.

           शहरात  सुरु असलेल्या अमृत कलशच्या कामात कूठलेही नियोजन करण्यात आलेले नाही. हे काम करत असतांना रस्त्याच्या मधोमत रस्ता खोदून पाईप लाईन टाकल्या जात आहे. मात्र ही पाईप लाईन टाकतांना रोड बंद असल्याचे कोणतेही निर्देशक रस्त्यावर लावण्यात येत नाही. त्यामूळे अपघांताची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच ही पाईप लाईन गटर लाईनला लागुन टाकण्यात येत असल्याने भविष्यात पाईप लाईन लिकेज झाल्यास शहरातील नागरिकांना दुषीत पाणी पूरवठा होण्याचीही शक्यता नाकारली जाऊ शकत नाही. हे काम करत असलेल्या कामागांराकडेही कोणतेही सुरक्षा साधने दिल्या गेलेली नाही. त्यामूळे कामगार आपला जीव धोक्यात टाकून काम करीत आहे. या बांधकामासाठी मोठ-मोठया मशीन शहरात आणल्या गेल्या आहे व त्या माशिनिद्वारे शहरात सर्वत्र काम चालू आहे. मात्र या मशीनेद्वारे कोनत्याही वेळेवर काम सुरु केल्या जात असल्याने वाहतूकीची कोंडी निर्माण होत आहे. शहरात कुठेही काम करायचे असेल तर मनपाने पाहिले त्या कामाची वेळ निश्चित करून त्या वेळेवर काम सुरु केले तर अपघात किव्हा कोनत्याही प्रकारची दुर्घटना त्या ठिकाणी होणार नाही. इतके मोठे काम सुरु असतांना सदर ठिकाणी सुरक्षा अधिकारी तथा अभियंता उपस्थित राहत नाही. त्यामुळे कामाचा दर्जा खालवत जात आहे. या योजनेचे काम अतिशय कासव गतीने सुरु आहे. या योजनेद्वारा पाईप लाईन टाकण्याचे काम शहरात सुरु आहे ते काम सुरु असताना शहरातील रस्ते, नाल्या, ईलेक्ट्रिक लाईटचे केबल, टेलिफोन लाईनचे केबल व शहरातील संपूर्ण छोटे  मोठे रस्ते पूर्णपणे या ठेकेदारानी विस्कळीत केले आहे.  त्यामूळे नागरिकांना मोठा त्रास सहण करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेता संबधीत ठेकेदारावर गून्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनातून किशोर जोरगेवार यांनी केली आहे. यावेळी संपूर्ण प्रकणाची चौकशी करुन योग्य कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन अप्पर जिल्हाधिका-यांनी जोरगेवार यांना दिले यावेळी नगरसेवक विशाल निंबाळकर, रवींद्र लोनगाडगे सरपंच ग्रा.पं. दाताळा, संदीप कष्टी, इरफान शेख, हर्षद कानमपल्लीवर, नकुल वासमवार यांची उपस्थिती होती.

admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा