You are here
Home > विदर्भ > दिवस वाढवा, लसीकरणाचे उद्दिष्ट गाठा!

दिवस वाढवा, लसीकरणाचे उद्दिष्ट गाठा!

अतिरिक्त आयुक्त राम जोशी : टास्क फोर्स कमिटीची बैठक

नागपूर,ता.  : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय टीकाकरण मोहिमेअंतर्गत नागपूर शहरातील प्रत्येक बालकाचे टीकाकरण व्हायलाच हवे. त्यासाठी ठरलेल्या दिवसांमध्ये वाढ करा. आठवड्यातून दोन दिवस टीकाकरण करा, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिले.

नागपूर महानगरपालिकेच्या वतीने राष्ट्रीय टीकाकरण कार्यक्रमांतर्गत टास्क फोर्स कमिटीची बैठक शुक्रवारी (ता. १७) आयुक्त कार्यालय सभागृहात पार पडली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्यासह अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, आरोग्य अधिकारी (दवाखाने) डॉ. सरीता कामदार, अतिरिक्त सहायक आरोग्यअधिकारी डॉ. विजय जोशी, डॉ. गजानन पवाने, डॉ. उमेश मोवाडे, डब्ल्यू. एच. ओ. चे सदस्य डॉ. साजीद खान, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे, आयएमएचे प्रतिनिधी डॉ. अनिरुद्ध देवके, आपीएचे प्रतिनिधी डॉ. गिरीश चरडे, डॉ. गोवर्धन नवखरे, डॉ. नरेंद्र बहीरवार, डॉ. टिकेश बिसेन, डॉ. दीपांकर भिवगडे, डॉ. जयश्री चन्ने, डॉ. वर्षा देवस्थळे, डॉ. आतिक रहमान खान, डॉ. विजय तिवारी, डॉ. राजेश बुरे, शिक्षण विभागाच्या हेमलता गोटे, ई.एस.आय.एस.च्या डॉ. वर्षा भोंबे, एनयूएलएमचे विनय त्रिकोलवार, आरोग्य समन्यवक दीपाली नागरे, एनयूएचएमचे नीलेश भांबरे उपस्थित होते.

यावेळी नागपूर शहरात सुरु असलेल्या टीकाकरण मोहिमेची माहिती डॉ. साजीद खान यांनी दिली. नागपुरात सुरू असलेल्या टीकाकरण मोहिमेदरम्यान आवश्यक त्या सोयी उपलब्ध करून देणे आणि प्रत्येक बालकाला त्याचा फायदा देणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या ६० टक्के उद्दिष्ट गाठल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

यावेळी बोलताना अतिरिक्त आयुक्त राम जोशी म्हणाले, टीकाकरण कार्यक्रमाची व्याप्ती वाढविण्याच्या दृष्टीने प्रत्येक आरोग्य केंद्रात दोन दिवस टीकाकरण करण्यात यावे. मंगळवार आणि शुक्रवार हे दिवस निश्चित करावे. औद्योगिक परिसरात मंगळवार ऐवजी बुधवारी टीकाकरण करण्यात यावे, असे निर्देश त्यांनी दिले. खासगी रुग्णालयांनीही लसीकरणासंदर्भातील अहवाल वेळेत पाठवावा, असेही ते म्हणाले. शासकीय कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यामुळे ज्या भागात लसीकरणाची टक्केवारी कमी आहे, त्या भागात अधिक काम करणे आवश्यक आहे. यासाठी जनजागृतीवरही भर देण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले.

बैठकीला संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा