You are here
Home > कृषि व बाजार > C.I.D चौकशीत अटक होण्याच्या भीतीने धोटे बंधू फरार. डॉ. पिंपळकर ताब्यात !

C.I.D चौकशीत अटक होण्याच्या भीतीने धोटे बंधू फरार. डॉ. पिंपळकर ताब्यात !

.राजुरा येथील एका शाळेत तब्बल आठ ते सोळा अल्पवयीन आदिवासी मुलींवर झालेल्या अत्त्याचार प्रकरणाची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा झाली होती.हे प्रकरण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजू कुकडे यांनी सर्व प्रथम प्रसारमाध्यमांसमोर पत्रकार परिषध घेवून आणले होते.व या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्यात यावी अशी मागणी मनसेतर्फे करण्यात आली होती.त्या नंतर जिल्ह्यात या घटनेविरोधात आदिवासी समाजाच्या वतीने अनेक आंदोलने करण्यात आली . मात्र या प्रकरणात चार आरोपी अटकेत असले तरी या संस्थेचे अध्यक्ष तथा कॉंग्रेसचे राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सुभाष धोटे.संस्थेचे सचिव तथा राजुरा नगरपरिषद विद्यमान अध्यक्ष अरुण धोटे यांना अटक करावी अशी मागणी आदिवासी संघटनेनीं केली होती. मात्र या प्रकरणाची सीआयडी चौकशी सुरू असल्याने जोपर्यंत सीआयडीचा चौकशी अहवाल येतं नाही तोपर्यत त्यांना अटक होऊ शकत नव्हती. परंतु या दरम्यान यांच शाळेच्या परिसरात असलेल्या नर्सिंग कॉलेजच्या एका 21 वर्षीय मुलींवर झालेल्या अन्यायाविरोधात मनसेचे राजू कुकडे व महिला सेना जिल्हाध्यक्षा सुनीता गायकवाड यांनी पीडित युवतीला घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेकडे तक्रार दिल्यानंतर दोन्ही धोटे बंधूवर विनयभंग व धमकी देणे या आरोपाखाली गुन्हे दाखल करण्यात आले होते व त्यांना तीन दिवसाची पोलीस कस्टडी ठोठावण्यात आली होती. त्यामुळे ह्या हायप्रोफाईल प्रकरणात जिल्ह्यातील सर्व जनतेचे लक्ष लागले होते.मात्र या प्रकरणात पीडित युवतीनेआपले बयान बदलविल्याणे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले होते. तरीही मनसेचे राजू कुकडे यांनी मनसेतर्फे आपली बाजू मांडून पीडित युवतीवर दबाव टाकला गेल्याने पीडित मुलीने बयान बडलविल्याचा आरोप लावला होता व धोटे बंधूंच्या न्यायालयातून जमानत मिळविण्यासाठी पीडित युवतीचे बयान बडलवल्या गेले असल्याचे सुद्धा प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रीया दिली होती.मात्र आता तब्बल सोळा मुलीवर अत्त्याचार झाल्याचे सीआयडी चौकशीत निष्पन्न झाल्याने व त्या प्रकरणात दोन्ही धोटे बंधू सहआरोपी असल्याने काल दिनांक 7 जून ला रात्री सीआयडीची पथकाने जिल्हा अधीक्षकांसमवेत धोटे बंधूना अटक करण्यासाठी धाड टाकली असता धोटे बांधूनीं पळ काढल्याचे समोर आले आहे. मात्र या प्रकरणात धोटे बंधू पूर्णता अडकलेले असल्याने त्यांना या प्रकरणात बाहेर निघणे कठीण झाले आहे. परंतु या प्रकरणात मनसेने घेतलेल्या प्रमुख भूमिकेमुळेच हे प्रकरण प्रकाशझोतात आल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येतं आहे.आता या प्रकरणी धोटे बंधूवर काय करवाई होणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे….

admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा