You are here
Home > कृषि व बाजार > आदिवासी संघर्ष क्रुती समितीच्या दणक्याणे मेघा धोटे यांना जाहीर झालेला “रणरागिणी” पुरस्कार रद्द !

आदिवासी संघर्ष क्रुती समितीच्या दणक्याणे मेघा धोटे यांना जाहीर झालेला “रणरागिणी” पुरस्कार रद्द !

राजुरा येथे इन्फन्ट जीजस ह्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मागील दोन महिन्यापासून अल्पवयीन आदिवासी मुलींच्या लैंगिक अत्त्याचार प्रकरणाची सीआयडी चौकशी सुरू आहे. त्या शाळेची बदनामी या प्रकऱणामुळे तर झालीच शिवाय आदिवासी संघर्ष समितीने राजुरा आणि चंद्रपूर येथे मोर्चे काढून शाळा संचालकांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी लावून धरली आहे.असे असतांना त्याचं इन्फन्ट जिजस स्कूलच्या एका शिक्षिकेला दि. ४/६/२०१९ ला पुन्यनगरी या दैनिक वर्तमान पत्रात मेघा धोटे यांना दि. ९/६/२०१९ ला रणरागीणी पुरस्कार देण्यात येनार असल्याची बातमी प्रकाशीत झाली होती. या बातमीची दखल आदिवासी संघर्ष कृती समीतीने घेत वणी येथिल गित घोष यांनाअखिल भारतीय संविधानिक हक्क परीषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष गित घोष यांनी वणी येथिल बेटी फाउंडेशन यांचे कडे तक्रार केली होती सदर तक्रारीची दखल घेत पुरस्कार रद्द करुन बेटी फाउंडेशन च्या अध्यक्षांनी चुक मान्य केली या बातमीची दखल आदिवासी संघर्ष कृती समीतीने घेत वणी येथिल गित घोष यांना संपर्क करुन राजुरा लैंगिक अत्याचार प्रकरण लक्षात आनुन दिले. याची दखल घेत सदर प्रकरण गित घोष यांनी बेटी फाउंडेशन यांच्या निदर्शनास हीं बाब लक्षात आनुन दिली व लेखी तक्रार सुद्धा दिली होती.मात्र या प्रकरणात मेघा धोटे यांनी खरी माहीती लपवविली असल्याचे अध्यक्षांनी सांगितले व दिलगीरी व्यक्त करत सदर पुरस्कार रद्द केला. यामुळे आदिवासी संघर्ष कृती समितीच्या वतीने गित घोष यांचे व रणरागीणी फाउंडेशन चे अध्यक्ष यांचे आभार मानण्यात येत आहे. यावेळी आदिवासी संघर्ष क्रुती समितीचे भारत आत्राम.महीपाल मडावी.दिपक मडावी.अभिलाष परचाके.संतोष कुळमेथे इत्यादीनीं पाठपुरावा केला.

admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा