You are here
Home > कृषि व बाजार > बोर्डा ग्रामपंचायत चा पाणीपुरवठा खंडित झाल्यामुळे १० दिवसापासून पाण्यासाठी नागरीकांची भटकंती शुरू.

बोर्डा ग्रामपंचायत चा पाणीपुरवठा खंडित झाल्यामुळे १० दिवसापासून पाण्यासाठी नागरीकांची भटकंती शुरू.

वरोरा तालुक्यातील बोर्डा ग्रामपंचायत मध्ये मागील दहा दिवसापासून पाणीपुरवठा बंद असल्यामुळे बोर्डावासियांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. पैसे मोजून पिण्याच्या पाण्याची कॅन घेऊन आपली तहान भागवत आहे. पिण्यासाठी पाणी मिळत नसल्यामुळे लोकांना आंघोळीसाठी पाणी उपलब्ध होत नाही आहे कारण गावातील हातपंपाची सुद्धा पातळी खोलवर गेली असून हातपंपाला पाणी नाही आहे. तर गाव वाशी गावातील घाटे यांच्या शेतात विहिरीतून पाणी विकत घेत असल्याची माहिती समोर आलेली आहे.याबाबत ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवकाला विचारले असता पाणीपुरवठ्याची बोरवेल मशीन जळाल्याने दुविधा उत्पन्न होत असल्याची माहिती सरपंच माधुरी बतकी यांनी दिली. व ग्रामसेवक यांनी पाणीपुरवठा विभागाची बोरवेल मशीन जळली असून त्वरित दुरुस्ती करण्या संबंधी सविस्तर अर्ज जिल्हा परिषद चंद्रपूर पाणी पुरवठा विभाग यांना पाठवलेले असून आजही बोरवेल दुरुस्तीचे काम थकीत असल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण पायपीट करावी लागत आहे. याला सर्वस्वी जबाबदार ग्रामपंचायत समिती असल्याचे आरोप नागरिक करत आहे. पाणीपुरवठा विभाग या गोष्टीकडे कमालीचे दुर्लक्ष करीत असून नागरिकांना होणाऱ्या दुविधेचा खेळ पाहतोय की काय असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहे. ग्रामपंचायत बोर्डा येथे महाराष्ट्र राज्य जलसंधारण विभाग तर्फे दोन पाण्याच्या टाक्या नवीन उभारण्यात आलेले असून वॉटर एटीएम पद्धतीने पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. व जलसंधारण विभागातर्फे संपूर्ण गावात पाणीपुरवठ्यासाठी कूपनलिका टाकण्याचे कामही अधुरे असून प्रत्येक घराला जलवाहिनी जोडण्याचे काम अजून अर्धवट आहे. या कामाला अजुन किती दिवस लागतील असा सवाल नागरिक करीत आहेत. पाण्याच्या टाकीतून पाणीपुरवठा होण्यासाठी अजून काही महिन्याचा कालावधी लागेल अशी माहिती ही पाणीपुरवठा विभागा तर्फे मिळत नसल्याची खंत आहे याबाबत सरपंचाला विचारले असता दूरध्वनीवर प्रतिसाद मिळत नाही व व मोबाईल वरून संवाद साधला असता सरपंच न बोलता त्यांचे पतिदेव संवाद साधून उडवाउडवीची उत्तरे देतात. संवादाअंती तक्रार करत्यांच्या प्रश्नांची उत्तरे सरपंच न देता त्यांचे पती दैवच उत्तरे देत असून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याची खंत नागरिकांनी प्रतिनिधीला सांगितले.व गावातील पूर्वीपासून सुरू असलेली पाणीपुरवठा विभागाची दोन-दोन बोरवेल असून दोन्ही बोरवेल मधून पाणीपुरवठा होत असून एक वेळ ग्रामपंचायत जवळील बोर मधून पाणी पुरवठा केला जातो तर दुसऱ्यांदा जिल्हा परिषदेच्या शाळा जवळील बोर मधून पाणीपुरवठा केला जातो. व या दोन्ही बोर पैकी एक बोरवेल शॉर्टसर्किटने जडली यामुळे एका बोर मधून पाणी पुरवठा बंद आहे. बंद असलेल्या बोरला वगळता दुसऱ्या बोर मधून दिवसातून एकदा तरी पाणीपुरवठा केला जाऊ शकतो तरीपण नागरिकांकरिता पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यावर ग्रामपंचायत कमालीचे दुर्लक्ष करीत आहे. संपूर्ण गावातील पाणीपुरवठा खंडित झालेला आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी दूर पायपीट करावी लागत आहे. पुरुष महिला वृद्ध व लहान बालके बादली व पिपे घेऊन बोर्डा चौक स्थित हात पंपावरून पाणी नेत असल्याचे चित्र गाव वासियांना पहावयास मिळत आहे. गावातील बोरवेल नादुरुस्त असल्याची तक्रार ही तहसील किवा जिल्हा जलसंधारण विभाग यांच्याकडे करून त्वरित नादुरुस्त बोरवेल चा काम करून पाणीपुरवठा सुरळीत करावा याबाबत ग्रामपंचायत समिती दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. मागील दहा दिवसापासून खंडित पाणीपुरवठा व पाण्यासाठी होणारी वणवण व तप्त उन्हामध्ये पाण्यासाठी भटकणाऱ्या वृद्ध नागरिक महिला पुरुष व बालके यांना उष्माघाताचा त्रास सहन करावा लागतोय ही बाब अजूनही ग्रामपंचायत बोर्डा यांच्या लक्षात येत नाही असे दिसून येते.जिल्हा परिषद प्रशासन जर नादुरुस्त बोरवेल दुरुस्त करून देत नसल्यास स्थानिक स्तरावर बोर मशीन दुरुस्तीचे काम केल्या जाऊ शकते तरी पण ग्रामपंचायत बोर्डा आता नियम बदलले असून याची तक्रार जिल्हा परिषद चंद्रपूर जलसंधारण विभाग यांच्याकडे करावी लागत असल्याची बोलले. तक्रार मशीन खराब झाल्यापासून केली की नाही याचे उत्तर सुद्धा देण्यास टाळाटाळ करीत आहे.या सर्व घडामोडी बघता हे लक्षात येते की ग्रामपंचायत बोर्डा व पदाधिकारी हे कामात हयगय करत असून कमिशन खोरी सारखा प्रकार असल्याचा भास होत आहे. जर येत्या दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास संपूर्ण बोर्डाशी घागर मोर्चा काढण्याच्या तयारीत असल्याची माहिती बोर्ड वाशी यांनी दिली आहे.

admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा