You are here
Home > कृषि व बाजार > महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या 14 व्या राज्यस्तरीय अधिवेनाची राज्यमंत्री गुलाब पाटिल यांच्या उपस्थितीत सांगता..विविध ठराव पारित !

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या 14 व्या राज्यस्तरीय अधिवेनाची राज्यमंत्री गुलाब पाटिल यांच्या उपस्थितीत सांगता..विविध ठराव पारित !

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या जळगाव येथील 14 व्या अधिवेशनामधे अनेक मागण्या संदर्भातील ठराव करून महाराष्ट्र शासनाकडे ते पाठवले आहे. त्यामधे G S T मधून सूट करावी. पत्रकारांना मिळणाऱ्या निवृत्ती वेतनामधे सुधारणा करावी व ती रक्कम पंधरा ते वीस हज़ार रुपये द्यावे. पत्रकार विमा योजना अंतर्गत वीस लाखाचा विमा आकस्मिक निधन किंव्हा अपघात झाल्यावर मिळवा. पत्रकारांचे अपघाती किंव्हा आकस्मिक निधन झाल्यास त्याच्या कुटुंबाला दहा लाख रुपये म्रूतूनंतर सानुग्रह राशी मदत म्हणून द्यावी. पत्रकार सरक्षण कायद्यात दुरुस्ती करून पत्रकारांना सरक्षण द्यावे. ज्या बातमीच्या संदर्भात ज्यांच्या विरोधात बातमी त्यांनी पोलीस स्टेशन मधे तक्रार दिली तर त्या संदर्भात चौकशी केल्याशिवाय गुन्हे दाखल करू नये या आणि अनेक ठराव मांडण्यात आले. हे ठराव महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष वसंतराव मुंडे यांनी मांडले आणि त्या ठरावाला प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनी अनुमोदन केले.या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राज्यमंत्री गुलाब पाटिल. खासदार रक्षाताई खडसे उपस्थित होते. या प्रमुखाच्या हस्ते महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या विविध पदाधिकाऱ्यांचा त्यांनी संघासाठी दिलेल्या विशेष योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला. त्यामधे विदर्भातून संघाचे विदर्भ अध्यक्ष बाळासाहेब देशमुख. पूर्व विदर्भ अध्यक्ष प्रा. महेश पानसे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गुलाबराव पाटिल यांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या 14 व्या राज्यस्तरीय अधिवेशनात मांडलेल्या ठरवाच्या निमित्याने महाराष्ट्र शासनाचा एक प्रतिनिधी म्हणून निच्छितपणे ह्या मागण्यामान्य करून घेऊ अशी ग्वाही आपल्या भाषणातून दिली.

admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा