You are here
Home > कृषि व बाजार > डॉ. अशोक जिवतोडे हे ओबीसी समाजाच्या सामाजिक प्रगती करता लढणार का ?

डॉ. अशोक जिवतोडे हे ओबीसी समाजाच्या सामाजिक प्रगती करता लढणार का ?

आजची सामजिक स्थिती हीं अत्यंत बिकट अशा वळणावर असून त्यात राजकीय स्वार्थ शिरल्याने अनेक सामाजिक चळवळी उध्वस्त झाल्या आहे. मी समाजाचे काही देणे लागतो हीं भावनाच जणू लुप्त झाली आहे. त्यामुळे आपल्या संस्क्रुती आणि परंपरेला खिंडार पडून सामाजिक सलोखा लोप पावला आहे. पण अशा स्थितीत सुद्धा काही सामाजिक नेते मंडळी सामाजिक दायित्व जोपासूण व समाजाला जागरुक करण्याचे कार्य करून नव्या पिढीला घडविण्याचे अतिशय प्रामाणिक प्रयत्न करीत असतात. तसं बघितलं तर चंद्रपूर जिल्ह्यात बळीराम धोटे. किशोर पोतनवार. बंडू धोत्रे व इतर अनेक तरुण सामाजिक चळवळी उभ्या करण्याचा प्रयत्न करताहेत. पण सामाजिक कार्य करण्यासाठी सुद्धा ते कार्य करणाऱ्यांच्या दोन वेळेच्या जेवणाची सोय होणे गरजेचे आहे. कारण उपाशी पोटी कुठलीही क्रांती होतं नाही. त्यामुळे या सामाजिक चळवळीला उभी करण्यासाठी जे त्या समजातील श्रीमंत लोक आहे त्यांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. चंद्रपूर जिल्ह्यात डॉ. अशोक जिवतोडे यांनी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा घेऊन अनेक वेळा सामाजिक कार्यक्रम घेतले. वेगळ्या विदर्भ चळवळीत सुद्धा त्यांनी सहभाग घेऊन अनेक जनप्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित केले पण हे सर्व करत असतांना त्यांनी कधीही ठोस अशी प्रमुख भूमिका निभावली नाही. त्यांचेकडे चंद्रपूर जिल्ह्यात त्यांच्या खाजगी शाळेचे जाळे असल्याने त्यांच्या शब्दाला वजन आहे. शेकडो कर्मचारी त्यांच्या संस्थेत काम करतात त्यामुळे सामाजिक उपक्रम राबविण्याचे त्यांचे कार्य ते अत्यंत नियोजित पद्धतीने करू शकतात त्यामुळे ओबीसी समाजाची त्यांचेकडून फार अपेक्षा आहे. आणि जर त्यांनी मनावर आणलं तर ते आजही ओबीसी समाजाच्या गळ्यातील ताईत होऊ शकतात. कारण समाजाला आर्थिक. शैक्षणिक आणि सामाजिक दायित्व निभावनाऱ्या नेत्यांची आजही गरज आहे. सुदैवाने आज 11 जूनला त्यांचा वाढदिवस आहे. त्या दिवशी त्यांना समजातील अनेक घटकाकडून शुभेच्छांचा वर्षाव त्यांच्यावर होणार आहे. पण शुभेच्छा देतांना एक पत्रकार म्हणून माझी भूमिका वरील मथळ्याप्रमाणे स्पश्ठ आहे की डॉ. अशोक जिवतोडे यांनी येणाऱ्या ओबीसी समाजाच्या सामाजिक. शैक्षणिक व आर्थिक प्रगती करिता प्रयत्न करावे तरच त्यांच्या आजच्या वाढदिवशी त्यांना खऱ्या अर्थाने मी शुभेच्छा दिल्या त्याचा आनंद होईल……….

admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा