You are here
Home > कृषि व बाजार > प्रा.महेश पानसे यांचा राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशनात”महाराष्ट्र गौरव” पुरस्काराने सन्मान!

प्रा.महेश पानसे यांचा राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशनात”महाराष्ट्र गौरव” पुरस्काराने सन्मान!

चंद्रपूर:— म.रा.मराठी पत्रकार संघाचे पुव॔ विदर्भ अध्यक्ष प़ा.महेश पानसे यांना राज्यस्तरीय अधिवेशनात संघाच्या प़तिष्टेच्या महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.जळगाव येथे दि.९जून ला संपन्न झालेल्या १४ व्या राज्य स्तरीय अधिवेशनात सहकार मंत्री ना.गुलाबराव पाटील ,खा.रक्षाताई खडसे, संघाचे प़देशाध्यक्ष राजा माने ,संघाचे राज्य काया॔ध्यक्ष तथा अधिस्वीकृती समितीचे विभागीय अध्यक्ष मुंडे, राज्यसंघटक संजय भोकरे यांचे हस्ते पुरस्कार प़दान करण्यात आला.महेश पानसे यांची पत्रकार क्षेत्रातील योगदान व संघटनेतिल उत्कुष्ट कामगिरी लक्षात घेऊन हा प़तिष्टेचा सन्मान बहाल करण्यात आला.सन्मानचिन्ह व गौरवपत्र यावेळी महेश पानसे यांना प़दान करण्यात आले आहे.राज्यभरातून वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत निवडक ६ व्यक्तींना या प़तिष्टेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.पुवं विदर्भातील प़ा.महेश पानसे यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल व पत्रकार संघाचे संघटन बांधणी व सामाजिक उपक्रमांसाठी या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.या प़तिष्टेच्या पुरस्काराबद्दल विदर्भ अध्यक्ष देशमुख, विदर्भ सचिव शरद नागदेवे, चंद्रपूर जिल्हा अ्ध्यक्ष सुनिल बोकडे,काया॔ध्यक्ष जितेंद्र चोरडिया,सरचिटणीस राजू कुकडे, उपाध्यक्ष डॉ.खानोरकर,उपाध्यक्ष विजय सिद्धावार,यांचेसह पूर्व विदर्भातील जिल्हा अ्ध्यक्ष, तालुका अध्यक्ष इत्यादी पदाधिकारी यांनी प़ा.महेश पानसे यांचे अभिनंदन केले आहे.

admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा