You are here
Home > कृषि व बाजार > मनसेच्या पाठपुराव्याला मिळाले यश! अनधिकृत इंग्रजी माध्यमांच्या शाळा संचालकांवर फौजदारी करवाईचे शिक्षणाधिकारी यांचे पत्र !

मनसेच्या पाठपुराव्याला मिळाले यश! अनधिकृत इंग्रजी माध्यमांच्या शाळा संचालकांवर फौजदारी करवाईचे शिक्षणाधिकारी यांचे पत्र !

.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजू कुकडे यांच्या नेत्रुत्वात जिल्हाधिकारी. शिक्षणाधिकारी यांना निवेदन देवून चंद्रपूर जिल्ह्यात मागील अनेक वर्षापासून काही संस्थाचालक बेकायदेशीर अनधिकृत इंग्रजी माध्यमाच्या शाळा चालवीत असल्याने त्या बंद करून त्या संस्थाचालकांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करा अशी मागणी मनसेतर्फे लावून धरण्यात आली होती व पत्रकार परिषध घेवून शिक्षण विभागला याची माहिती आहे आहे. मात्र कुंपणच शेत खातं या उक्ती प्रमाणे शिक्षण विभागातील काही अधिकारी अशा अनधिकृत शाळा संचालकांना पाठबळ देत असल्याचा आरोप करून त्या अनधिकृत शाळा त्यांच्याच मूक संमतीने राजरोसपणे सुरू आहे. असा आरोप सुद्धा मनसेतर्फे करण्यात आला होता. त्यामुळे हे प्रकरण जिल्हा परिषदेतील शिक्षण खात्याच्या अंगलट येण्याची चिन्हे दिसतं असल्याने शिक्षणाधिकारी लोखंडे यांनी या प्रकरणी तब्बल जिल्ह्यातील 13 अनधिकृत इंग्रजी माध्यमाच्या शाळा संचालकांवर एक लाखाचा दंड आणि त्यानंतर सुद्धा शाळा सुरू ठेवल्यास प्रत्तेक दिवसाला 10 हज़ार रुपये दंड भरण्याचे सक्तीचे आदेश दिले एवढेच नव्हे तर त्यानंतर सुद्धा शाळा सुरू ठेवल्यास शाळा संचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्यांनी तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी यांना दिनांक 11 जूनला काढलेल्या पत्रातून दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठपुराव्याला आता नवे यश मिळाले असून या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष राजू कुकडे यांच्या नेत्रुत्वात जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकारी यांना निवेदने देवून त्या शाळा बंद करण्याची मागणी करण्यात आली होती त्यामुळे शिक्षणाधिकारी यांनी वरील आदेश देवून लहान मुलांचं शैक्षणिक भविष्य खराब करणाऱ्या व शिक्षणाच्या हक्काचा अधिकार कायद्याचा भंग करणाऱ्या संस्था चालकाविरोधात फौजदारी गुन्हे दाखल होत असल्याने जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रांत मोठी खळबळ माजली आहे त्यामुळे चिन्चाला येथील डिलाईट कॉन्व्हेंट.कोरपना तालुक्यातील ग्लोबल माऊंट पब्लिक स्कूल. व गोल्डन क्रिडस अकादमी स्कूल. बल्लारपूर येथील के.जी.एन पब्लिक स्कूल.ब्रम्हपुरी येथील शरद विद्यामंदिर.सरकार नगर चंद्रपूर येथील नाईस इंग्रजी कॉन्व्हेंट.विठ्ठल मंदिर वार्ड चंद्रपूर येथील शांती निकेतन आणि सनराईज कानव्हेन्ट कॉन्व्हेंट.विठ्ठल मंदिर वार्ड चंद्रपूर येथील शांती निकेतन आणि सनराईज कॉन्व्हेंट. गडचांदुर येथील राज इंग्लिश मिडीयम स्कूल. पोंभूर्णा येथील पोंभूर्णा पब्लिक स्कूल इत्यादी शाळा शिक्षण विभागाने अनधिकृत शाळा म्हणून घोषित केल्या असल्या तरी कोरपणा येथील इमिनन्स इंटरनेशनल स्कूल तर गडचांदुर येथील गोल्डन क्रिडस अकादमी इत्यादी अनधिकृत शाळाची यादी शिक्षण विभागाकडे नव्हती मात्र मनसेने दिलेल्या तक्रारी मधे नमूद वरील शाळा संचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल होऊन

करवाई होणार आहे.

admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा