You are here
Home > कृषि व बाजार > .जिल्ह्यातील अनधिकृत शाळां संचालकांवर गटशिक्षणाधिकारी यांच्या तक्रारीवरून होणार गुन्हे दाखल. शिक्षणाधिकारी लोखंडे यांचे करवाईचे आदेश. मनसेच्या पाठपुराव्याला मिळाले यश..

.जिल्ह्यातील अनधिकृत शाळां संचालकांवर गटशिक्षणाधिकारी यांच्या तक्रारीवरून होणार गुन्हे दाखल. शिक्षणाधिकारी लोखंडे यांचे करवाईचे आदेश. मनसेच्या पाठपुराव्याला मिळाले यश..

.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजू कुकडे यांच्या नेत्रुत्वात जिल्हाधिकारी. शिक्षणाधिकारी यांना निवेदन देवून चंद्रपूर जिल्ह्यात मागील अcनेक वर्षापासून काही संस्थाचालक बेकायदेशीर अनधिकृत इंग्रजी माध्यमाच्या शाळा चालवीत असल्याने त्या बंद करून त्या संस्थाचालकांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करा अशी मागणी मनसेतर्फे लावून धरण्यात आली होती व पत्रकार परिषध घेवून शिक्षण विभागाविरोधात आक्रोश व्यक्त केला होता कारण शिक्षण विभागाला या अनधिकृत शाळांची माहिती आहे. मात्र कुंपणच शेत खातं या उक्ती प्रमाणे शिक्षण विभागातील काही अधिकारी अशा अनधिकृत शाळा संचालकांना पाठबळ देत असल्याचा आरोप करून त्या अनधिकृत शाळा त्यांच्याच मूक संमतीने राजरोसपणे सुरू आहे. असा आरोप सुद्धा मनसेतर्फे करण्यात आला होता. त्यामुळे हे प्रकरण जिल्हा परिषदेतील शिक्षण खात्याच्या अंगलट येण्याची चिन्हे दिसतं असल्याने शिक्षणाधिकारी लोखंडे यांनी या प्रकरणी तब्बल जिल्ह्यातील 13 अनधिकृत इंग्रजी माध्यमाच्या शाळा संचालकांवर एक लाखाचा दंड आणि त्यानंतर सुद्धा शाळा सुरू ठेवल्यास प्रत्तेक दिवसाला 10 हज़ार रुपये दंड भरण्याचे सक्तीचे आदेश दिले एवढेच नव्हे तर त्यानंतर सुद्धा शाळा सुरू ठेवल्यास शाळा संचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्यांनी तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी यांना दिनांक 11 जूनला काढलेल्या पत्रातून दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठपुराव्याला आता नवे यश मिळाले असून या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष राजू कुकडे यांच्या नेत्रुत्वात जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकारी यांना निवेदने देवून त्या शाळा बंद करण्याची जी मागणी करण्यात आली होती त्यामुळे शिक्षणाधिकारी यांनी वरील आदेश देवून लहान मुलांचं शैक्षणिक भविष्य खराब करणाऱ्या व शिक्षणाच्या हक्काचा अधिकार कायद्याचा भंग करणाऱ्या अनधिकृत शाळा संचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिसात तक्रार देण्याचे आदेश तालुका स्तरावर गटशिक्षणाधिकारी यांना देवून त्यांचेकडून दंड वसुली सुद्धा करण्याचे पत्रात नमूद केल्याने मनसेच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणात मनसेचे राजू कुकडे. वनिता चीलके. सुमन चामलाटे. कविता घोणमोडे. कोटेश्वरि गोहने.अतुल दिघाडे. रमेश कालबान्धे.पीयूष धूपे.समीर भोयर.

admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा