You are here
Home > कृषि व बाजार > टेेमुर्डा विविध कार्यकारी संस्थेचे अध्यक्ष विलास झीले व सचिव भगवान येरेकर यांचा भ्रष्ट कारभार. संस्थेच्या आवारातच लाखोच्या बेकायदेशीर रेतीची साठवणूक. जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार !.

टेेमुर्डा विविध कार्यकारी संस्थेचे अध्यक्ष विलास झीले व सचिव भगवान येरेकर यांचा भ्रष्ट कारभार. संस्थेच्या आवारातच लाखोच्या बेकायदेशीर रेतीची साठवणूक. जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार !.

वरोरा तालुक्यातील टेमुर्डा हे गाव राजकीय द्रुष्ट्या महत्वपूर्ण असून येथे काही राजकीय नेत्यांची त्यांच्या वरीष्ठ नेत्यांशी जवळीक सलगी असल्याने अनेक विकास कामात मोठा भ्रष्टाचार होतं असतांना सुद्धा त्यांचेवर कुठलीही करवाई होतं नाही. मग ते प्रकरण अवैधरीत्या उत्खनन असो. वाळू तस्करी असो की अवैधरीत्या दारू विक्री असो. इथे सगळं काही आलबेल असते. असेच एक प्रकरण समोर आले असून चक्क टेमुर्डा विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे विद्यमान अध्यक्ष विलास झीले व सचिव भगवान येरेकर यांनी नवीन गाळे बांधकाम करण्यासाठी बेकायदेशीरपणे रेतीची साठवणूक केली असल्याची गंभीर बाब प्रकाशात आली असून या संदर्भात आम्हचे प्रतिनिधी यांनी मौका चौकशी करून तहसीलदार यांना फोन केला व या अवैधरीत्या साठवणूक केलेल्या रेती प्रकरणी संबधित रेती जब्त करून साठवणूक करणाऱ्यावर फौजदारी करवाई करा अशी मागणी केली असता तहसीलदार यांनी मंडळ अधिकारी व पटवारी यांना तत्काळ घटनास्थळी पाठवतो व करवाई करतो असे आश्वासन दिल्यानंतर सुद्धा सदर रेती जब्त झाली नसल्याने हे प्रकरण आता जिल्हाधिकारी यांच्याकडे जाणार असल्याची माहिती आहे. जर संस्थेचे अध्यक्ष व सचिव अशा प्रकारे अवैधरीत्या चोरीची रेती साठवणूक करीत असेल व आम्हच कुणी काही भिघडवु शकत नाही अशी गुंडगिरी भाषा वापरली जातं असेल तर यांची दादागिरी किती वाढली ? आणि यांनी सोसायटीत किती भ्रष्टाचार केला असेल याचा परिचय येतो. मात्र आता हे प्रकरण जिल्हाधिकारी यांचेकडे गेल्यानंतर हीं रेती आणली कुठून ? हीं रेती कोणत्या वाहनाद्वारे आणली त्याचा मालक कोण? आणि याची रायल्टि परवानगी कुणाची, इत्यादी प्रश्न अनुत्तरित असल्याने चौकशीत हे प्रकरण राजकीय रंग घेणार आहे.

admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा