You are here
Home > कृषि व बाजार > रत्नागिरी जिल्हा परिषदच्या मुजोर अधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयाचा केला अवमान ! क्रुषि विभागातील अ.ज.जात वैधता प्रमाणपत्राच्या संदर्भात विस्तार अधिकाऱ्यावर बडतर्फची करवाई प्रकरण (भाग-1)

रत्नागिरी जिल्हा परिषदच्या मुजोर अधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयाचा केला अवमान ! क्रुषि विभागातील अ.ज.जात वैधता प्रमाणपत्राच्या संदर्भात विस्तार अधिकाऱ्यावर बडतर्फची करवाई प्रकरण (भाग-1)

……..(विशेष प्रतिनिधी)-रत्नागिरी जिल्हा परिषद मधे क्रुषि विकास अधिकारी आरिफ शहा व सामान्य प्रशासनातील उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सावंत यांनी चुकीच्या पद्धतीने मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या आन्चल गोयल यांच्याकडे माहिती पुरवली आणि शासन निर्णय दुर्लक्षित करून व उच्च न्यायालयाचे आदेश डावलून ह्या अधिकाऱ्यांनी जणू हिटलरशाही सारखी जिल्हा परिषद प्रशासन व्यवस्था केली असल्याचे चित्र आहे. क्रुषि विस्तार अधिकारी गजेंद्र पौनिकर यांना अ.ज.जात वैधता प्रमाणपत्राच्या संदर्भात चुकीच्या पद्धतीने नोव्हेंबर 2017 ला तत्कालीन क्रुषि विकास अधिकारी पी एन देशमुख यांनी बडतर्फ केले होते. त्यामुळे त्यांनी या संदर्भात माहिती अधिकाराचा वापर करीत अनेक शासन निर्णय व उच्च न्यायालयाचे निर्णय या बाबत अभ्यास केला असता यादस्तावेजावरून त्यांना ज्या पद्धतीने बडतर्फ करण्यात आले ते चुकीच्या पद्धतीने आणि नियमबाह्य पद्धतीने बडतर्फ केल्याची बाब उघड होते.या बाबत बडतर्फ अधिकारी गजेंद्र पौनिकर यांनी डिसेंबर 2018 पासून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांना व शासन स्तरावर वेगवेगळ्या निवेदनाच्या माध्यमातून पुराव्यासह त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. या बाबत शासन सचिव व विभागीय आयुक्त स्तरावरून चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा परिषद रत्नागिरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आले असतांना सुद्धा क्रुषि विकास अधिकारी आरिफ शहा व सामान्य प्रशासनातील उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सावंत यांचा सावळा गोंधळ सुरू असल्याने जाणीवपूर्वक त्या पत्र आदेशाला केळाची टोपली दाखवून त्यांनी एक प्रकारे दडपशाहीचे धोरण अवलंबले असल्याने याबाबत जिल्हा परिषद वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहे. पण त्यांच्या मुजोरीमुळे एक अधिकारी आपल्या नौकरीपासून वंचित होतं असेल तर त्यांना असा कुठला आनंद होतोय? हे कळायला मार्ग नाही पण जर पौनिकर यांनी शासन स्तरावर न्याय न मिळाल्यास वेगळ्या आयुधाचा वापर केल्यास मुजोर असलेल्या अधिकाऱ्यांची नौकरी सुद्धा अशाच प्रकारे चक्रव्यूहात फसेल अशीच एकूण परिस्थिती आहे….

admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा