You are here
Home > कृषि व बाजार > भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेसाठी महाडीबीटी ऑनलाइन पोर्टल पुन्हा कार्यान्वित अंतिम मुदत 30 जून पर्यंत

भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेसाठी महाडीबीटी ऑनलाइन पोर्टल पुन्हा कार्यान्वित अंतिम मुदत 30 जून पर्यंत

चंद्रपूर: 2018-19 मध्ये प्रवेश घेतलेल्या तसेच शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाइन पोर्टलवर सादर न केलेल्या विद्यार्थ्यांना 30 जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून पुन्हा कार्यान्वित केलेल्या महाडीबीटी या पोर्टलवर अर्ज सादर करायचे असून महाविद्यालयांना त्या अर्जाची तपासणी करून  सहाय्यक आयुक्त लॉग इनवर फॉरवर्ड करण्याच्या सूचना समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रसाद कुलकर्णी यांनी विद्यार्थी तसेच महाविद्यालयांना केलेल्या आहे.

सन 2018-19 मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी अद्यापही शिष्यवृत्ती अर्ज सादर केलेले नाही. तरी शिष्यवृत्तीसाठी पात्र असणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना तात्काळ आपल्या युजर आयडी व पासवर्ड लॉगइन करून 11 जून ते 30जून 2019 या कालावधीत स्वतःचा अर्ज परिपूर्णरित्या सादर करावयाचा आहे. विशेष यासाठीच समाज कल्याण विभागामार्फत महाडीबीटी ऑनलाइन पोर्टल पुन्हा एकदा कार्यान्वित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्ज या ऑनलाइन पोर्टलवर सादर केल्यानंतर त्या अर्जाची महाविद्यालयांनी तपासणी करून अर्ज मंजूरीची प्रक्रिया पूर्ण करावी. अन्यथा सादर केलेले अर्ज आपोआप पोर्टल मधून बाद करण्यात येतील. या वर्षासाठी ही अंतिम संधी देण्यात येत असून यानंतर विद्यार्थ्यांना अर्ज सादर करण्यास व महाविद्यालयांना ते मंजूर करण्यास कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही, असे स्पष्ट निर्देश समाज कल्याण विभागामार्फत विद्यार्थी तसेच महाविद्यालयांना देण्यात आलेले आहे.

admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा