You are here
Home > कृषि व बाजार > मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांना महाराष्ट्रातील जनता केंव्हा समजून घेणार ?

मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांना महाराष्ट्रातील जनता केंव्हा समजून घेणार ?

भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एका राज्याचा विकास आराखडा मांडून व एका महानगर पालिकेत सत्ता मिळाल्यावर त्या विकास आराखड्याप्रमाणे त्या शहराचा सामाजिक.सांस्क्रुतिक. शैक्षणिक व सौंदर्यद्रुष्टीने विकास कसा होतो त्यांचे प्रात्यक्षिक दाखविणारे राजसाहेब ठाकरे हे खरे तर एका राज्याचे नेते नाही तर ते अख्ख्या भारताचे प्रतिनिधित्व करणारे नेते आहे असे अनेक विचारवंतांना वाटते. मागील लोकसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे न करता मोदी-शहा ह्या भारतीय राजकारणात हिटलरशाही आणणाऱ्या जोडीला भारतीय राजकारणाच्या राजकीय क्षितिजावरुण हटवा अंशी भिमगर्जना करून संपूर्ण भारतीय राजकारणात भूकंप आणणारे राजसाहेब ठाकरे यांचेबद्दल अनेक राजकीय विश्लेषक आणि पत्रकार यांना खूप अपेक्षा आहे.त्यांच्या मते येणाऱ्या समोरच्या काळात महाराष्ट्रातील सत्ता त्यांच्या हाती येईल. पण ज्या प्रकारे महाराष्ट्रात मनसेचे आमदार नगरसेवक यांची संख्या रोडवली त्यामुळे अनेकांना राजसाहेबांच्या भविष्याबद्दल शंका सुद्धा आहे. कारण एकतर महाराष्ट्रातील जनतेला अजूनही राजसाहेब ठाकरे पटले नाही. किंव्हा महाराष्ट्रातील जनतेनीं त्यांचे नेत्रुत्व स्वीकारले नाही असे सर्वच विचारवंत. राजकीय विश्लेषक आणि पत्रकार चर्चेतून आपले मत मांडताना दिसतात. पण हे काही अंशी खरं असलं तरी माझं मतं मात्र वेगळं आहे. माझ्या मते ज्या पद्धतीने इतर पक्षाचे पक्ष संघटन सर्वत्र दिसते आणि विशेष म्हणजे त्या संघटनेमधे श्रीमंत नेते मंडळी असतात शिवाय निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या लोकांना ज्या पद्धतीने आपल्या पक्षाकडे ओढतात आणि त्यांनाच सर्व राजकीय पक्ष उमेदवाऱ्या देतात त्यामुळे त्या पक्षाचे उमेदवार निवडून येतात.इकडे मात्र मनसेमधे कट्टर कार्यकर्त्यांची फौज असली तरी ऐन वेळेवर काही कार्यकर्ते विरोधी पक्षाच्या उमेदवाराला विकले जातात.खरे तर हीं विक्रूतिच म्हणावी लागेल पण हे मी मागील 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मी स्वतः हे चित्र चंद्रपूर विधानसभा क्षेत्रांत बघितलं आहे.जिथे पक्षाचे पदाधिकारीच भाजपा शिवसेना उमेदवारांच्या दावणीला होते आणि पक्षाची उमेदवार सौ. सुनीता गायकवाड ह्या काही मोजक्या कार्यकर्त्यांना घेवून मनसेचा किल्ला लढवित होत्या.असं चित्र महाराष्ट्रात अनेक ठिकाणी होतं, कारण मनसेच्या उमेदवारांकडे कार्यकर्त्यांना वाटायला पैसे नव्हते आणि विरोधी पक्षाच्या उमेदवारांकडे कोट्यावधी रुपये होते.मला आठवतंय एकदा राजसाहेब चंद्रपूर दौऱ्यावर असतांना एका पदाधिकाऱ्यांनी राजसाहेबांना म्हटलं होतं की आम्हच्या क्षेत्रांत विरोधी पक्षाचे आमदार आणि नेते हे खूप श्रीमंत असल्याने ते आम्हचेवर भारी पडतात आम्हाला संघटन बांधण्यासाठी त्यामुळे अडचण येते. त्यावर राजसाहेबांनी त्या पदाधिकाऱ्यांना एकच म्हटलं की ते काहीही असलं तरी तुम्ही विकले जावू नका.पण त्यांच्या त्या महत्वपूर्ण संदेशाकडे येथील पदाधिकाऱ्यांनीं लक्ष दिलं नाही आणि पक्षाचे उमेदवार त्या 2014 च्या निवडणुकीत अमानत रक्कम सुद्धा वाचवू शकले नाही. खरं तर या अनुभवातून बोध घेवून पक्षाची संघटन बांधणी नव्याने होणे गरजेचे होते मात्र पाच वर्षापूर्वीची परिस्थिती आजही आहे. त्यामुळे जोपर्यंत राजसाहेब संपूर्ण महाराष्ट्रात संघटन बदल घडविणार नाही तोपर्यत पक्षाला नवी उभारणी येणार नाही. त्यात पूर्व विदर्भ तर काही पदाधिकाऱ्यांची मनसे म्हणजे त्यांची खाजगी मालमत्ता आहे असेच एकूण चित्र आहे. जो त्यांच्या मताप्रमाणे आणि इशाऱ्यावर चालेल ते मग पक्ष संघटन वाढवीत नसले तरी ते पदाधिकारी आणि पक्षाचे, आणि जे महाराष्ट्र सैनिक पक्ष हितासाठी सदैव तत्पर. अनेक समस्याविषयी निवेदने.आंदोलने आणि उपक्रम घेवून पक्षाचे नाव रोशन करतात पण त्यांच्या इशाऱ्यावर चालत नाही ते महाराष्ट्र सैनिक पक्षाचेच नाही.त्यांचा पक्षाशी काही समंध नाही असे वरीष्ठ पदाधिकारी प्रसारमाध्यमांना सुद्धा प्रतिक्रीया देत असतात त्यामुळे यांना पक्ष वाढवायचा नाही तर कुण्यातरी धनदांडग्या. श्रीमंत विरोधी पक्षाच्या उमेदवारांच्या दावणीला बांधायचा आहे.नव्हे पूर्व विदर्भात राजसाहेबांचे लक्ष नाही त्यामुळे हे वरीष्ठ पदाधिकारी आपल्या सोईप्रमाणे पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करतात आणि पक्ष संघटन आपल्या भोवती फिरवीतात हे आता स्पष्ट दिसते.पण अशाही स्थितीत काही राजमावळे आपल्या नेत्यांची दूरद्रुष्टी आणि जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडविण्याचा द्रुढ संकल्प आपल्या मनमस्तीकामधे साठवून व त्यासाठी आपले सर्वोच्य योगदान देण्यासाठी धडपडत आहे.मात्र वरिष्ठाची नजर त्यांचेकडे नाही. त्यामुळे पक्ष आहे तिथेच आहे. मुंबई.पुणे. नाशिक. ठाणे सोडले. व विदर्भातील वणी विधानसभा क्षेत्र सोडले तर बाकी ठिकाणी पक्ष वाढविण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही कारण तेच ते पदाधिकारी आणि तेच ते रडगाणे यामुळे पक्षातील अनेक चांगले कर्तबगार कार्यकर्ते पक्ष सोडून गेले. त्यांचा राजसाहेबांवर विश्वास आजही आहे पण स्थानिक पदाधिकारीच निष्क्रिय असल्याने त्यांचा नाईलाज आहे. पण तरीही आज राजसाहेबांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवशी महाराष्ट्रातील सर्व राजसमर्थक आणि महाराष्ट्र सैनिकांनी एक संकल्प करून या महाराष्ट्रात मनसेची सत्ता निर्माण करण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेला राजसाहेबांचे विचार पटवून सांगावे लागेल व दूरदृष्टी असणाऱ्या राजसाहेबांच्या नेत्रुत्वाला प्रस्थापित करण्यासाठी मराठी चळवळ चालवावी लागेल. तर आणि तरच या महाराष्ट्रात पुन्हा सकळ मराठी मनाचं. मावळ मातीच राज्य निर्माण होईल. आणि शिवछत्रपतीच्या स्वराज्याची संकल्पना पुन्हा या महाराष्ट्रात प्रत्यक्षात साकारली जाईल.साप्ताहिक आणि पोर्टल भुमीपुत्राची हाक परिवारातर्फे राजसाहेबांच्या वाढदिवशी त्यांना कोटी कोटी मनसे शुभेच्छा !………

admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा