You are here
Home > कृषि व बाजार > अंधारी नदीअंधारी नदीधून हजारोधून हजारो ब्रॉस रेती चोरी करणारे व त्यांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा

अंधारी नदीअंधारी नदीधून हजारोधून हजारो ब्रॉस रेती चोरी करणारे व त्यांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा

हजारो ब्रॉस अवैध रेती तस्करीची उच्चस्तरीय चौकशी समिती नेमुन चौकशी करण्या ची मागणी
चंद्रपूर : मुल तालुक्यामध्ये असलेल्या अंधारी नदीच्या पात्रातून प्रस्तावित सुशी दाबगांव रेती घाटाव्यतिरिक्त नलेश्वर ते चिरोली पर्यंत १० ते १५ कि.मी. अंधारी नदीपात्रातून वर्षभर अवैधरित्या हजारो ब्रॉस रेती तस्करी करून शासनाचा महसुल बुडविणाऱ्या रेती तस्करांवर व त्याना अभयदान देणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. या संबंधात पुराव्यानिशी तक्रारी करून ही रेती तस्करांना अभय देणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, प्रस्तावित रेती घाटाव्यतिरिक्त अन्य रेती घाटामधून अंधारी नदीचे पात्र खोदून त्याठिकाणाहून हजारो ब्रॉस रेतीची चोरी करून शासनाचा लाखो रूपयांचा महसुल बुडविणाऱ्या रेती तस्करांवर फौजदारी गुन्हा दाखल करन्यात यावा अशी मागणी एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून श्रीराम सेना प्रतिष्ठान च्या वतीने करन्यात आली आहे.
मुल तालुक्यातील अंधारी नदी पात्राशेजारी सव्र्हेक्र. १०३ हा प्रस्तावित रेती घाट आहे. मागील वर्षी या रेती घाटाला वाढीव मुदत देन्यात आली होती. या रेती घाटाच्या शेजारी अंधारी नदीच्या पात्रामधील नलेश्वर येथील सव्र्हे क्र. १३७, १३९ व १४० या ठिकाणाहुन जेसीबी व पोकलॅन च्या सहाय्याने हजारो ब्रॉस रेतीचा उपसा करन्यात आला आहे. नलेश्वर, सुशी, चिरोली पर्यंत पसरलेल्या अंधारी नदीच्या पात्रातून कच्चा रस्ता बनवून चोरी करण्यात आली व त्याचे हायवा सारख्या जड वाहनाच्या माध्यमातून वहन करन्यात आले असून त्यासंबंधात श्रीराम सेना, चंद्रपूर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून ११ मार्च २०१९ व १८ मार्च २०१९ रोजी (छायाचित्र व व्हिडीओ) पुराव्यानिशी मान. उपविभागीय अधिकारी साहेब मुल व मान. तहसिलदार साहेब, मुल यांना तक्रार करन्यात आली होती. तक्रारी नुसार प्रस्तावित नसलेले रेती घाट नलेश्वर सव्र्हेक्र. १३७, १३९ व १४० मध्ये अंधारी नदीपात्रातून कच्चा रस्ता (रॅम ) बनवून त्या ठिकाणाहून नियमाविरूद्ध जेसीबी व पोकलॅन च्या सहाय्याने नदी पात्र खोदून हायवा चा वापर करून रेती चे उत्खनन करन्यात आलेल्या स्थळाची पाहणी करन्यात यावी व दोषींवर कारवाई करन्यात यावी अशी मागणी करन्यात आली होती.
तहसिलदार मुल यांचे पत्र क्र. कावि/अ.का./प्रस्तु-१/२०१९/८७, दिनांक २ मे २०१९ नुसार श्रीराम सेना, चंद्रपूर यांच्या तक्रारीच्या आधारे तहसिलदार साहेब मूल यांनी रेतीची अवैध तस्करी होत असलेल्या अंधारी नदीच्या पात्रातील रेती तस्करी करण्यासाठी बनविण्यात आलेला कच्चा रस्ता (रॅम ‘) तोडन्यात आल्याचे कबुली दिली असून अंधारी नदीपात्रातून नलेश्वर ते चिरोली पर्यंत हजारो ब्रॉस रेती च्या झालेल्या चोरीसंदर्भात रेती तस्करांवर कोणतीही ठोस कारवाई केलेली नसल्याचे स्पष्ट होत आहे. सव्र्हेक्र. १२५ मध्ये अवैध रेती साठ्यावर कंत्राटदार सूर्यकांत रणदिवे यांचेवर १६,८००रुपये ६/०५/२०१९ अन्वये चालान करन्यात आल्याची तसेच तत्पुर्वी याच कंत्राटदारावर २५,२०० रुपये दंड आकारण्यात आल्याचे नमुद केले आहे. श्रीराम सेना, चंद्रपूर यांच्या ११ मार्च २०१९ च्या तक्रारीनंतर १८ मार्च २०१९ ला सुशी येथील रेती घाटावरून रेती ची तस्करी करणाऱ्या हायवा वर कारवाई करून २,३३,६०० रू. दंड आकारन्यात आल्या चे पत्रात नमुद केले आहे. श्रीराम सेना, चंद्रपूर च्या तक्रारीमध्ये मूळ तालुक्यातील नलेश्वर ते चिरोली पर्यत १० ते १२ कि.मी . अंधारी नदीचे पात्र नियमबाह्य रित्या खोदून त्या ठिकाणाहून हजारो ब्रॉस रेतीची चोरी करून शासनाचा करोडो रूपयाचा महसुल बुडविणाऱ्या रेती तस्करांवर कोणतीही कारवाई न करता संबंधित शासकीय अधिकाऱ्याकडून रेती तस्करांना आर्थिक देवाण-घेवाणीतून अभय देण्यात आले आहे. मुल तालुक्यातील नलेश्वर, सुशी ते चिरोली पावेतो १० ते १२ कि.मी . अंधारी नदी पात्रातून झालेल्या हजारो ब्रॉस रेती उत्खनन करून शासनाचा करोडो रूरुपयांचा महसुल बुडविणाऱ्यावर व अंधारी नदी पात्रा ची तोडफोड करणाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांचेवर कायदेशीर कारवाई करन्यात यावी, रेती तस्करांना अभय देणाऱ्या संबंधित शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्याचेवर कडक कारवाई करण्यात यावी, तसेच अंधारी नदी पात्रातून झालेल्या अवैध रेती तस्करीसंबंधात उच्चस्तरीय चौकशी समिती नेमुन अंधारी नदी पात्राची निष्पक्ष चौकशी करन्यात यावी व या उच्चस्तरीय चौकशी समिती मध्ये संबंधित अधिकाऱ्याना डावलून अन्य अधिकाऱ्याचा समावेश करण्यात यावा (श्रीराम सेना प्रतिष्ठान, चंद्रपूर चे जिल्हाधिकारी याना दिलेले १५-०४-२०१९ चे पत्र) अशी मागणी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून श्रीराम सेना प्रतिष्ठान केली आहे.अंधारी नदीधून हजारो ब्रॉस रेती चोरी करणारे व त्यांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा
हजारो ब्रॉस अवैध रेती तस्करीची उच्चस्तरीय चौकशी समिती नेमुन चौकशी करण्या ची मागणी
चंद्रपूर : मुल तालुक्यामध्ये असलेल्या अंधारी नदीच्या पात्रातून प्रस्तावित सुशी दाबगांव रेती घाटाव्यतिरिक्त नलेश्वर ते चिरोली पर्यंत १० ते १५ कि.मी. अंधारी नदीपात्रातून वर्षभर अवैधरित्या हजारो ब्रॉस रेती तस्करी करून शासनाचा महसुल बुडविणाऱ्या रेती तस्करांवर व त्याना अभयदान देणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. या संबंधात पुराव्यानिशी तक्रारी करून ही रेती तस्करांना अभय देणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, प्रस्तावित रेती घाटाव्यतिरिक्त अन्य रेती घाटामधून अंधारी नदीचे पात्र खोदून त्याठिकाणाहून हजारो ब्रॉस रेतीची चोरी करून शासनाचा लाखो रूपयांचा महसुल बुडविणाऱ्या रेती तस्करांवर फौजदारी गुन्हा दाखल करन्यात यावा अशी मागणी एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून श्रीराम सेना प्रतिष्ठान च्या वतीने करन्यात आली आहे.
मुल तालुक्यातील अंधारी नदी पात्राशेजारी सव्र्हेक्र. १०३ हा प्रस्तावित रेती घाट आहे. मागील वर्षी या रेती घाटाला वाढीव मुदत देन्यात आली होती. या रेती घाटाच्या शेजारी अंधारी नदीच्या पात्रामधील नलेश्वर येथील सव्र्हे क्र. १३७, १३९ व १४० या ठिकाणाहुन जेसीबी व पोकलॅन च्या सहाय्याने हजारो ब्रॉस रेतीचा उपसा करन्यात आला आहे. नलेश्वर, सुशी, चिरोली पर्यंत पसरलेल्या अंधारी नदीच्या पात्रातून कच्चा रस्ता बनवून चोरी करण्यात आली व त्याचे हायवा सारख्या जड वाहनाच्या माध्यमातून वहन करन्यात आले असून त्यासंबंधात श्रीराम सेना, चंद्रपूर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून ११ मार्च २०१९ व १८ मार्च २०१९ रोजी (छायाचित्र व व्हिडीओ) पुराव्यानिशी मान. उपविभागीय अधिकारी साहेब मुल व मान. तहसिलदार साहेब, मुल यांना तक्रार करन्यात आली होती. तक्रारी नुसार प्रस्तावित नसलेले रेती घाट नलेश्वर सव्र्हेक्र. १३७, १३९ व १४० मध्ये अंधारी नदीपात्रातून कच्चा रस्ता (रॅम ) बनवून त्या ठिकाणाहून नियमाविरूद्ध जेसीबी व पोकलॅन च्या सहाय्याने नदी पात्र खोदून हायवा चा वापर करून रेती चे उत्खनन करन्यात आलेल्या स्थळाची पाहणी करन्यात यावी व दोषींवर कारवाई करन्यात यावी अशी मागणी करन्यात आली होती.
तहसिलदार मुल यांचे पत्र क्र. कावि/अ.का./प्रस्तु-१/२०१९/८७, दिनांक २ मे २०१९ नुसार श्रीराम सेना, चंद्रपूर यांच्या तक्रारीच्या आधारे तहसिलदार साहेब मूल यांनी रेतीची अवैध तस्करी होत असलेल्या अंधारी नदीच्या पात्रातील रेती तस्करी करण्यासाठी बनविण्यात आलेला कच्चा रस्ता (रॅम ‘) तोडन्यात आल्याचे कबुली दिली असून अंधारी नदीपात्रातून नलेश्वर ते चिरोली पर्यंत हजारो ब्रॉस रेती च्या झालेल्या चोरीसंदर्भात रेती तस्करांवर कोणतीही ठोस कारवाई केलेली नसल्याचे स्पष्ट होत आहे. सव्र्हेक्र. १२५ मध्ये अवैध रेती साठ्यावर कंत्राटदार सूर्यकांत रणदिवे यांचेवर १६,८००रुपये ६/०५/२०१९ अन्वये चालान करन्यात आल्याची तसेच तत्पुर्वी याच कंत्राटदारावर २५,२०० रुपये दंड आकारण्यात आल्याचे नमुद केले आहे. श्रीराम सेना, चंद्रपूर यांच्या ११ मार्च २०१९ च्या तक्रारीनंतर १८ मार्च २०१९ ला सुशी येथील रेती घाटावरून रेती ची तस्करी करणाऱ्या हायवा वर कारवाई करून २,३३,६०० रू. दंड आकारन्यात आल्या चे पत्रात नमुद केले आहे. श्रीराम सेना, चंद्रपूर च्या तक्रारीमध्ये मूळ तालुक्यातील नलेश्वर ते चिरोली पर्यत १० ते १२ कि.मी . अंधारी नदीचे पात्र नियमबाह्य रित्या खोदून त्या ठिकाणाहून हजारो ब्रॉस रेतीची चोरी करून शासनाचा करोडो रूपयाचा महसुल बुडविणाऱ्या रेती तस्करांवर कोणतीही कारवाई न करता संबंधित शासकीय अधिकाऱ्याकडून रेती तस्करांना आर्थिक देवाण-घेवाणीतून अभय देण्यात आले आहे. मुल तालुक्यातील नलेश्वर, सुशी ते चिरोली पावेतो १० ते १२ कि.मी . अंधारी नदी पात्रातून झालेल्या हजारो ब्रॉस रेती उत्खनन करून शासनाचा करोडो रूरुपयांचा महसुल बुडविणाऱ्यावर व अंधारी नदी पात्रा ची तोडफोड करणाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांचेवर कायदेशीर कारवाई करन्यात यावी, रेती तस्करांना अभय देणाऱ्या संबंधित शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्याचेवर कडक कारवाई करण्यात यावी, तसेच अंधारी नदी पात्रातून झालेल्या अवैध रेती तस्करीसंबंधात उच्चस्तरीय चौकशी समिती नेमुन अंधारी नदी पात्राची निष्पक्ष चौकशी करन्यात यावी व या उच्चस्तरीय चौकशी समिती मध्ये संबंधित अधिकाऱ्याना डावलून अन्य अधिकाऱ्याचा समावेश करण्यात यावा (श्रीराम सेना प्रतिष्ठान, चंद्रपूर चे जिल्हाधिकारी याना दिलेले १५-०४-२०१९ चे पत्र) अशी मागणी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून श्रीराम सेना प्रतिष्ठान केली आहे.

admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा