
चंद्रपूर : चंद्रपूर उपप्रादेशिक कार्यालय (RTO) दलालांच्या अवास्तव वास्तव्यामुळे नेहमीच टीकेचा व चर्चेचा विषय राहिला आहे. त्यातच दलालांपासून सावधान राहण्याचा दर्शनी भागात लागलेला बोर्ड जणू दलाल पूर्णपणे सक्रिय असल्याचेच येणाऱ्या-जाणाऱ्याना खुणावत असतो. परंतु अधिकारी मात्र येथे दलाल नाहीत व प्रामाणिक व निष्ठेने आपण कार्यरत असल्याच्या अविर्भात वागत असतात. नुकतेच स्कूल बस पासिंग करण्याचे आव्हान rto कडून करण्यात आले होते. या पासिंग दरम्यान उपप्रादेशिक कार्यालयातील दलालांनी अधिकाऱ्यांसमोर केलेला धिंगाणा rto कार्यालयाचे धिंडवडे काढणारा आहे. स्कूल बस पासिंग वरून कार्यालयात सर्वासमोर झालेली हमरी तुमरी काहींनी आपल्या मोबाइल मध्ये record केल्यामुळे rto तील भ्रष्ट कारभार आता पूर्णपणे चव्हाट्यावर आला आहे. rto कार्यालयातील याच धिंगाण्यात धिंगाणा घालणाऱ्यानी आपला राजकीय “वट” कुठपर्यंत आहे याचे केलेले सूतोवाच राजकीय पुढाऱ्यांचा या ठिकाणी असलेला वरदहस्त दर्शविणारा आहे. उपप्रादेशिक कार्यालयात होणार भोंगळ कारभार हा सर्वविदित आहे. स्कूल बस ची नियमाप्रमाणे तपासणी करूनच त्यांना रस्त्यावर शाळकरी मुलांना घेऊन जाण्यासाठी परवाना द्यायचा असा हा साधा नियम आहे. जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये कोणतीही दुर्घटना घडणार नाही असा प्रामाणिक हेतू परिवहन मंत्रालयाचा असल्यामुळे त्याची अंमलबजावणी साठी ही चार चाकी शाळकरी वाहनांची रांग rto मध्ये लागलेली होती. योग्य कागदपत्रांची पूर्तता करून वाहन पासिंग करणे एव्हडेच सोपस्कार पार पाडायचे असताना विनायस दलाली व राजकीय नावाचा वापर हा अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट नीतीला उघडा पडणारा होता.
त्याचप्रमाणे नुकतेच दुचाकी वाहन खरेदी करताना हेल्मेट शिवाय दुचाकी वाहन पासिंग होणार नाही असा आदेश चंद्रपूर rto ने जिल्ह्यातील प्रत्येक दुचाकी वाहन विक्रेत्यांना दिलेला आहे. परंतु हेल्मेट ग्राहकाला खरेदी करायचे आहे कि दुकानदाराला ते मोफत द्यायचे आहे असा कोनताही उल्लेख या आदेशात नसल्यामुळे दुचाकी वाहन विक्रेते हेल्मेट घेण्याची सक्ती ग्राहकांना करून अव्वा-सव्वा भावाने हेल्मेट ग्राहकांच्या मस्तकी मारीत आहे. ज्यांचेजवळ पूर्वीपासून हेल्मेट आहे. त्यांना हे बंधन जिव्हारी लागत असल्यामुळे यामध्येही rto चा काही हार्दीक देवाणघेवाणीचा विषय तर नाही नां ? अशी शंका हि आता व्यक्त होऊ लागली आहे. rto ने या विषयावर वृत्तपत्राच्या माध्यमातून स्पष्टीकरण देऊन ग्राहकांची लूट थांबवावी.