
-पं वसंतराव देशपांडे यांना जन्मशताब्दीनिमित्त सुरसप्तकचे अभिवादन
नागपूर – ”कार्यक्रम उत्तमच झाला गं .मराठी गीतांचा कार्यक्रम असल्यामुळेच मी आले ” अशी एका बैठकीत कार्यक्रमाचा आस्वाद घेणाऱ्या ८५ वर्षीय आजींची प्रतिक्रिया ऐकून सुरसप्तकचा उद्देश सफल झाला. मराठी मुलखात मराठी गाणी ऐकायला मिळत नाही ही रसिकांची तक्रार लक्षात घेऊन सुरसप्तक नेहमीच मराठी गीतांचे दर्जेदार कार्यक्रम सादर करीत असते . ‘पाहिले न मी तुला’ या कार्यक्रमाद्वारे —-पं वसंतराव देशपांडे यांना जन्मशताब्दीनिमित्त सुरसप्तकने नागपुरात प्रथम मानाचा मुजरा केला. तसेच संगीतकार श्रीनिवास खळे, पं हृदयनाथ मंगेशकर ,अनिल अरूण, श्रीधर फडके, अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेली अनवट सुरावटींची अजरामर गाणी कलाकारांनी सादर केलीत.
‘प्रथम तुला वंदितो ‘ या पं वसंतरावांच्या गीताने सुरेल प्रारंभ झाला .’या चिमण्यांनो’ या भावपूर्ण गीताने दूरदेशीच्या पिलांच्या आठवणीने जेष्ठांचे डोळे पाणावले. ‘गंध फुलांचा ‘ मोगरा फुलाला’ ‘त्या फुलांच्या गंधकोषी ‘ या गाण्यांनी रसिकांची सांज स्वरगंधित केली.’स्वरगंगेच्या काठावरती’ गोमू संगतीने ‘,’येऊ कशी प्रिया ‘ अश्विनी येना ‘ पहिलीच भेट’ संधीकाळी या अश्या’ ‘सुन्या सुन्या ,’केंव्हातरी पहाटे ‘ ‘ना मानोगे तो’ ‘पाहिले ना मी तुला’ ‘शुक्रतारा मंद वारा’ या गीतांनी तर तीनही पिढ्यांचे मन तारुण्यात फेरफटका मारून आले. ‘सैराट झालं जी ‘ ‘झिंझिंग झिंगाट’ ‘माउली माउली ”जीव दंगला रंगला ‘, ‘कळीदार कपुरी पान’ या गीतांनी कार्यक्रम दणकेबाज झाला. कलाकारांच्या उत्तम सादरीकरणाने अनेक मराठी गीतांना वन्स मोर मिळालेत हे आश्चर्य घडलं. विजय देशपांडे,, डॉ अमोल कुळकर्णी ,आशिष घाटे ,मुकुल पांडे,अरुण ओझरकर ,कुमार केळकर, आदित्य फडके, प्रा पद्मजा सिन्हा,प्रतीक्षा पट्टलवार ,अश्विनी लुले,अर्चना उचके, ,अनुजा जोशी, दिपाली पनके ,मेघा हरिदास, या गायकांना परिमल जोशी ,पंकज यादव ,रवी सातफळे,आशिष घाटे, विजय देशपांडे, महेंद्र वाटोळकर , निशिकांत देशमुख, तुषार विघ्ने ,आर्या देशपांडे या वादकानीं तोडीसतोड साथसंगत केली.शुभांगी रायलू यांच्या अभ्यासपूर्ण निवेदनाने कार्यक्रमाने उंची गाठली . संकल्पना सूरसप्तक अध्यक्ष सुचित्रा कातरकर यांची, निर्मिती कार्याध्यक्ष प्रा.पद्मजा सिन्हा यांची होती .प्रारंभी शोभा दोडके यांनी नृत्याभिनय सादर केला. . सूत्रसंचालन प्रा.उज्ज्वला अंधारे यांनी केले.