You are here
Home > चंद्रपूर > जिल्ह्यातील नगरपालिका व नगर पंचायतींचा संचालकांनी घेतला आढावा

जिल्ह्यातील नगरपालिका व नगर पंचायतींचा संचालकांनी घेतला आढावा

चंद्रपूर, दि.15 जून: नगरविकास संदर्भात राज्याचे नगरपालिका प्रशासन विभागाचे संचालक मुथुकृष्णन शंकरनारायणन यांनी जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील नगरपालिकांच्या  विविध विकास कामांचा आढावा घेतला. नगर विकास विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी ते शनिवारी चंद्रपूर जिल्हयाच्या दौ-यावर आले होते.

दुपारी वरोरा येथे आगमन झाल्यानंतर त्यांनी वरोरा येथील नगर परिषदेचा आढावा घेतला. या ठिकाणी त्यांनी सुरु असलेल्या कामांना प्रत्यक्ष भेटी देऊन क्षेत्र पाहणी केली. त्यानंतर सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिका-यांच्या उपस्थितीत जिल्हयातील नगर पंचायती व नगर परिषदेच्या मुख्याधिका-यांशी चर्चा केली.  यामध्ये प्रामुख्याने संचालकांनी नगरोत्थान योजनेचा प्रस्ताव सादर करताना नगरपालिकांनी घ्यावयाची काळजी, प्रस्तावामध्ये विविध बाबींचा समावेश, 19 डिसेंबर 2018 च्या शासन पत्रानुसार देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना, रस्त्यांची कामे करताना अधिकाऱ्यांनी पाळायचे निकष, नगरपालिकांना राज्य शासनामार्फत प्राप्त झालेल्या एकूण निधी, त्याअंतर्गत विविध मान्यता प्राप्त कामे, पूर्ण झालेली कामे, चालू असलेली कामे, प्रलंबित असलेली कामे यावर मुख्याधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला.

सोबतच अधिकाऱ्यांना कामासंदर्भात येत असलेल्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या संदर्भातील समस्या जिल्हाधिकाऱ्यांना अवगत करून द्याव्यात. बांधकाम विभागाशी समन्वय साधून उर्वरित कामे तात्काळ पूर्ण करावीत. अशा सूचना त्यांनी उपस्थित नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांना दिल्या.

            यावेळी त्यांनी प्रत्येक छोटया शहराच्या नियोजनाचा आराखडा तयार करतांना भविष्यातील गरजा लक्षात घेऊन नियोजन करण्यात यावे. तसेच प्रस्ताव सादर करतांना संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थाच्या पदाधिका-यांना विश्वासात घेऊन आवश्यक ठराव पारित करण्याची सूचना केली.

admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा