You are here
Home > कृषि व बाजार > मनसेचे अनधिकृत शाळा विरोधात जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन ! महाराष्ट्र राज्य शिक्षण सुधार संघर्ष समितीचा पाठिंबा !

मनसेचे अनधिकृत शाळा विरोधात जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन ! महाराष्ट्र राज्य शिक्षण सुधार संघर्ष समितीचा पाठिंबा !

जिल्ह्यात तब्बल पन्नासपेक्षा जास्त इंग्रजी माध्यमाच्या शाळा अनधिकृतपणे चालविल्या जात असून त्या शाळापैकी 13 शाळा अनधिकृत असल्याचे स्वतः जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी चंद्रपूर यांचे सर्व्हनुसार जाहीर करण्यात आले होते.मात्र असे असले तरी जोपर्यंत शिक्षण विभाग अशा अनधिकृत शाळाविरोधात कडक करवाई करत नाही तोपर्यंत अशाच अनधिकृत शाळा सुरू राहणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजू कुकडे यांच्या नेत्रुत्वात ह्या अनधिकृत शाळा कायमच्या बंद झाल्या पाहिजे याकरिता दिनांक 6 जूनला शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते.व 12 जून 2019 पर्यंत जर ह्या अनधिकृत शाळांवर करवाई झाली नाही तर मनसेतर्फे आंदोलन केल्या जाईल असा इशारा सुद्धा निवेदनातून देण्यात आळा होता. मात्र शिक्षणाधिकारी यांनी केवळ पंचायत समिती गटशिक्षण अधिकारी यांना अनधिकृत शाळांवर कारवाईचे आदेश दिले असले तरी अजून पर्यंत त्या अनधिकृत शाळा संचालकांविरोधात दंड आकारणी आणि फौजदारी गुन्हे दाखल करण्याची करवाई केली नसल्याने पुन्हा या शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्याच्या शैक्षणिक भविष्याशी शिक्षण विभाग खेळ खेळेल आणि अनधिकृत शाळा संचालकांचे फावेल त्यामुळे मनसेने शिक्षण विभागाच्या लेटलतीफशाही विरोधात आंदोलनाचे हतीयार उपसले असून 18 जून 2019 रोज मंगळवारला जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन करण्यात येतं आहे. जर ह्या आंदोलनाची दखल शिक्षणाधिकारी यांनी घेवून 20 जून पर्यंत अनधिकृत शाळा बंद केल्या नाही तर 22 जून पासून पुन्हा जिल्हापरिषद समोर मनसे व महाराष्ट्र राज्य शिक्षण सुधार संघर्ष समिती यांच्या सयुक्त विद्यमाने आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा शिक्षण विभागला दिलेल्या निवेदनातून दिला आहे..

admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा