
गेल्या अनेक वर्षापासून अनधिकृतपणे इंग्रजी माध्यमाच्या शाळा शिक्षण विभागाची मान्यता न घेता सुरू असून त्या शाळा बंद करण्यात याव्या व त्या संस्था चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसेतर्फे मागील दोन वर्षापासून सतत केल्या जात आहे.मात्र शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ व काही भ्रष्ट अधिकाऱ्यांचा अनधिकृत शाळा संचालकांना छुपा पाठिंबा यामुळे अशा अनधिकृत शाळा राजरोसपणे सुरू आहे. परंतु येणाऱ्या शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य खराब होऊ नये व अशा अनधिकृत शाळा कायमच्या बंद व्हाव्यात यासाठी मनसेचे राजू कुकडे यांच्या नेत्रुत्वात 6 जून 2019 ला जिल्हाधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांना निवेदने देण्यात आली होती. त्या निवेदनाची दखल घेऊन शिक्षणाधिकारी लोखंडे यांनी जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी यांना आदेश पत्र देऊन अनधिकृत शाळा संचालकांवर 1 लाख रुपयाचा दंड आकारणी व तरीही शाळा सुरू ठेवल्यास दररोज 10 हज़ार रुपये दंड आणि फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र तब्बल 12 दिवस लोटून सुद्धा जिल्ह्यातील अनधिकृत शाळा बंद केल्या नाही. त्यामधे चंद्रपूर शहरातील विठ्ठल मंदिर वार्ड येथील शांती निकेतन.नाईस इंग्रजी कॉन्व्हेंट. चिंचाळा येथील डिलाईट कॉन्व्हेंट.कोरपना तालुक्यातील ग्लोबल माऊंट पब्लिक स्कूल.गोल्डन क्रिडस अकैदमी स्कूल. विद्या निकेतन कॉन्व्हेंट पारडी.इमिनस इंटरनेशनल स्कूल.श्री शिवाजी इंग्लिश स्कूल वणसडी. गोल्डन क्रिडस कॉन्व्हेंट गडचांदुर. राज इंग्लिश मिडीयम स्कूल गडचांदुर. पोंभूर्णा पब्लिक स्कूल.के.जी. एन. पब्लिक स्कूल बल्लारपूर. शरद विद्या मंदिर ब्रम्हपुरी.इत्यादी शाळा संचालकांवर कारवाई केल्या गेली नाही.त्यामुळे मनसेचे राजू कुकडे यांच्या नेत्रुत्वात जिल्हा परिषद समोर 18 जून ला धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची दखल घेऊन तत्काळ शिक्षणाधिकारी यांनी गटशिक्षणाधिकारी यांना आदेश देऊन 22 जून पर्यंत अनधिकृत शाळावर कारवाई करण्याचे आदेश देऊन शाळा बंद न केल्यास त्या संस्थाचालकांवर गुन्हे दाखल करण्याचे सूचित केले आहे. परंतु तरीही शिक्षण विभागाने कारवाई न केल्यास मनसेतर्फे खळखट्ट्याक आंदोलन करेल असा इशारा शिक्षण विभागला देण्यात आला आहे. या प्रसंगी मनसेचे राजू कुकडे. आकाश भालेराव. रमेश कालबान्धे. पीयूष धूपे. समीर भोयर.कविता घोणमोडे. सुमन फूलझेले व इतर मनसैनिक उपस्थित होते…..