You are here
Home > कृषि व बाजार > तहसील कार्यालयात विद्यार्थ्यांना नाहक त्रास.नायब तहसील गादेवार कार्यालयातून असतात गायब ..

तहसील कार्यालयात विद्यार्थ्यांना नाहक त्रास.नायब तहसील गादेवार कार्यालयातून असतात गायब ..

चंद्रपूर तहसील कार्यलयात सद्ध्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली असली तरी तहसील प्रशासनाच्या दफ्तर दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांचे जातीच्या दाखल्यासह विविध शैक्षणिक दाखले वेळेवर मिळत नसल्याची ओरड होतं आहे. या संदर्भात शहरातील सर्वच सेतू केंद्रात विद्यार्थी आपले दाखले काढण्यासाठी जातात त्या सेतू केंद्रातील संचालकांना तहसील कार्यालयात चकरा माराव्या लागतात मात्र समण्धीत नायब तहसीलदार हे केवळ पैसे देणाऱ्या व्यक्तींचेच कामे करीत असल्याची माहिती आहे.यामधे नायब तहसिलदार गादेवार हे जाणीवपूर्वक स्वतःच्या स्वार्थासाठी काही मोजकी प्रकरणे करतात व खुर्चीवर जास्त काळ बसत नाही तर फोनवर आलेल्या कामासाठी ते वेळ देतात शिवाय लिपिक यांच्या टेबलची कामे स्वतःचकडे ठेवतात त्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे वेळेवर होतं नसल्याने मोठी अडचण होतं आहे. एकीकडे या परिसरात विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही त्यामुळे दिवसभर रांगेत लागलेली मुले चक्कर येऊन पडत आहे. तर दुसरीकडे नायब तहसिलदार गादेवार सारखे अधिकारी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रश्नावर गंभीर नाही त्यामुळे विद्यार्थी. पालक आणि सेतू केंद्राचे संचालकाचा गादेवार विरोधात रोष बघता त्यांची चौकशी करून त्यांचेवर दफ्तर दिरंगाई कायद्याअन्तर्गत करवाई करण्यात यावी अशी मागणी जोर पकडू लागली आहे…….

admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा