You are here
Home > Breaking News > देशाच्या इतिहासात पहिला खोटारडा पंतप्रधान

देशाच्या इतिहासात पहिला खोटारडा पंतप्रधान


स्वर्गीय पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांनी एकदा संसदेमध्ये भाषण कतांना म्हटलं होतं की, म सत्ता कां खेल तो चलता रहेगा, सरकारे आयेगी, सरकारे जायेंगी, पार्टीयां बनेगी, पार्टीया टुटेंगी, लेकिन किसी भी हाल में देश नही टुटना चाहिये. पण त्याच पंतप्रधान वाजपेयी यांना आपले आदर्श माणणारे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर देश खड्यात गेला तरी चालेल पण सत्ता मिळविण्यासाठी वाट्टेल ते निर्णय आणि अश्नय त्या घोषणा देवून भारतीय जनतेला जणू त्यांनी मुर्ख बनविण्याचा खेळ चालविला आहे. मोदी जिथे जिथे प्रचार सभांमध्ये जातात qकवा पक्षाच्या काङ्र्मक्रमाला जातात, त्या-त्या वेळी, त्या-त्या ठिकाणाचा त्यांच्या आयुष्यात काही तरी पुर्वीचा संबंध आहे असेच त्यांचे एकतरी वा्नय असते आणि चुकीची माहिती व खोटे बोलून जनतेमध्ये संभ्रमनिर्माण करण्याचा ते प्रयत्न करतात. त्यामुळे मोदी बद्दल आता छोटी छोटी मुलं सुद्धा मचौकीदार चोर है, चौकीदार चोर है असे म्हणतात. खरं तर आजपङ्र्मंत जेवढे पंतप्रधान झाले, त्या सर्वांचा भारतीय जनतेला खुप आदर होता कारण त्यांनी पंतप्रधान पदाची गरीमा कायमठेवली होती पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाला साजेसं कामन करता वेळोवेळी खोटे बोलणे, अंबाणी-अदानी या उद्योगपतींना ङ्कायदा पोहोचवून देण्यासाठी एकतफी निर्णय घेणे आणि ज्या नोटबंदी qकेवा जिएसटीमुळे देश खड्यात गेला त्या गोष्टीमुळै जणू देशाला खुप मोठा ङ्कायदा झाला अशा प्रकारच्या खोट्या उपलब्धीची जाहिरातबाजी करणे त्यांचेकडून सुरू असल्याने आता जनतेला मोदींचा असली चेहरा समजला आहे. त्यामुळे मागील पाच राज्यातील जनतेनी त्यांना नाकारून त्यांची सत्ता असलेली तिन राज्याची सत्ता संपुष्ठात आणली आहे. पाच राज्याच्या निवडणुक निकालावरून भाजपा विरोधात जनतेमध्ये जनआक्रोश आहे, हे स्पष्ट होत असल्याने मोदींनी सवर्ण समाजाला म्हणजे विशेष करून ब्राम्हण समाजाला खुष करण्यासाठी १० टक्के आरक्षण जे आर्थिक निकषावर घटनेमध्ये देण्याची तरतुद नसतांना संसदेच्या सभागृहात मंजूर केले. जिथे देशातील अनेक जातीसमुह आरक्षणाच्या मागण्या एवढी वर्ष रेटून धरत आहे, त्या समाजाला आरक्षण देण्यासाठी उपाययोजना करण्यापेक्षा आपली वोट बँक मजबुत करण्यासाठी सवर्ण समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण देवून त्या समाजातील युवकांना पक्षाच्या प्रचाराकरीता वापरणे मग ते आरक्षण न्यायालयात टिको की नको, अशी मोदी सरकारची रणनिती आहे. कारण त्यांना माहित आहे की आर्थिक निकषावर दिले गेलेले आरक्षण न्यायालयात टिकत नाही कारण घटनेमध्ये तशी कुठलीही तरतूद नाही आणि नरqसहराव पंतप्रधान असतांना त्यांनी सुद्धा हा प्रयत्न केला होता पण तो न्यायालयानी हाणून पाडला होता, मग आता कसे काय श्नय आहे. इथे महत्वाची बाब लक्षात घेण्यासारखी आहे जर महाराष्ट्राचा विचार केला तर एवढी वर्ष धनगर समाज, माना समाज आरक्षण मागतो आहे त्या समाजाला न्याय मिळाला नाही. मराठा समाजाला जे लाखोंचे मोर्चे काढले आणि सरकारची पुर्ण बाजुनी कोंडी केली. मराठा समाजाची ताकत बघता महाराष्ट्रात सत्ता स्थापन करायची तर त्यांना जवळ करणे महत्वाचे आहे, असे भाजप सरकार ला वाटले असावे आणि म्हणूनच त्यांनी मराठा समाजाला १६ टक्के विशेष आरक्षण देण्याची तरतूद केली परंतु त्याविरोधात सुद्धा न्यायालयात अपील केल्या गेल्याने त्यांचा आरक्षणाचा तिढा अजून पावेतो सुटला नाही. एकीकडे मोदी सरकार आरक्षणाचा आपल्या राजकीय सत्तेसाठी उपयोग करून घेण्यासाठी रणनिती आखत असेल तरी सरकारी नोकèया आता राहिल्या कुठे ? सर्वत्र सरकारी कामकाजाचं खाजगीकरण झाल्यामुळे आता कंत्राटी पद्धतीने नौकर भरती केल्या जात आहे आणि कंत्राटी पद्धतीत आरक्षण लागू होत नाही त्यामुळे या पलिकडे आरक्षणामुळे नौकèया मिळण्याच्या सर्व आशा मावळल्या असल्याने व ज्या काही पोलीस, रेल्वे, आयकर, इन्कमटॅ्नस qकवा प्रशासकीय यंत्रणेमध्ये शासन भरती घेणार ती नगण्य असल्याने आरक्षणाचं महत्व असं ही कमी झालं आहे. कारण ज्या प्रवर्गात जागा आहे त्या प्रवर्गातील उमेदवार लाखोंच्या संख्येने अर्ज दाखल करणार तर स्पर्धा ही वाढणारचं आहे म्हणजे जो खरोखरचं टॅलेंन्ट आहे त्यालाच ती नौकरी मिळणार मग जाती आणि आर्थिक निकषावरचं आरक्षण काय कामाचं ? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण म्हणजे संरक्षण हा विचार घेवून जो समाज विकासाच्या प्रवाहापासून दुर सारला गेला होता त्या समाजाला आरक्षण देवून विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची तरतूद केली होती पण आता कालपरत्वे त्यांच्या आरक्षण संकल्पनेची एैशीतैशी होत असल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारं आरक्षण आता संपल आहे. जिथे आरक्षणाचा ङ्कायदाचं गोरगरीब, शोषित-पिडीतांना होत नसेल तर ते आरक्षण कुणालाच नको आहे. परंतु राजकीय ङ्कायद्यासाठी आरक्षणाचे कोलीत घेवून संपूर्ण समाज पेटविण्याचं कामसत्ताधारी मोदी सरकार करीत असल्याने आता प्रत्येक समाजातील तरूणांनी सरकारच्या अशा घातकी निर्णयाविरोधात आवाज उठविणे क्रमप्राप्त आहे नाही तर हे सत्ताधारी समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण करून आपला राजकीय स्वार्थ साध्य करण्यास यशस्वी होतील. अगोदरचं मोदी सरकार नी दरवर्षी दोन कोटी तरूणांना नौकरी देण्याचे आश्वासन दिले ते स्वतः विसरले आहे. प्रत्येक भारतियांच्या बँक खात्यात १५ लाख रूपये टाकू म्हणून बोलले, मात्र त्याला अमित शहांनी चुनावी जुमला ठरविला. विदेशी बँकांमधील भारतीयांचा काळा पेसा आणला तर नाहीच पण मोदीच्या काळात तो ५० टक्के वाढला, त्यामुळे मोदी सरकार हे घोषणाबाज्याचं सरकार आहे त्यांना ङ्कक्त सत्ता हवी आहे कुठल्याही स्थितीत. त्यामुळे ते नको ते निर्णय करतांना दिसतात. मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी मध्यंतरी म्हटलं होतं की हे सरकार जसं जशा निवडणुका जवळ येतील तसतशा चुका करतील आणि स्वतःचं त्या खड्यात पडतील तशीच काहीशी स्थिती मोदी सरकारची झाली आहे. देशाच्या ईतिहासात एवढे पंतप्रधान झाले पण गुगलवर त्यांची नांवे सर्च केली तर त्यांच्याबद्दल अभिमान वाटावा अशीच माहिती येते पण मोदीबद्दल गुगलवर टाईप केलं तर सरळ फेकु येते आणि फेकु टाईप केलं तर मोदी येते म्हणजे मोदींनी आपली प्रतिमा किती मलीन करून घेतली याचा अंदाज येतो. त्यामुळे पंतप्रधान म्हणून मोदींनी जी जुमलेबाजी करून जनतेच्या पदरात काही न पाडता ङ्कक्त सत्ता काबीज करण्याचा जो ङ्कंडा खेळला आहे तो जनता येणाèया २०१९ च्या निवडणुकीत उधळून लावेल अशीच चिन्हे सध्या दिसत आहे.

admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

One thought on “देशाच्या इतिहासात पहिला खोटारडा पंतप्रधान

  1. Ashya news Naka takat jau re thodya paishasathi
    Toch ahe fakt ki tyane deshasathi sarv Kahi sodal ani toch ahe tyachya jawal deshbhakti Shivay dusar Kahi nahi
    Jage vha
    Fake news pasun

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा