You are here
Home > कृषि व बाजार > बल्लारपूर नगरपरिषदमधे कोट्यवधीचा निविदा घोटाळा

बल्लारपूर नगरपरिषदमधे कोट्यवधीचा निविदा घोटाळा

मनसेचे राजू कुकडे यांनी केली मागणी

बल्लारपूर- नगरपरिषदमधे गेल्या अनेक वर्षापासून भाजपची सत्ता असून राज्याचे अर्थमंत्री तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे विधानास क्षेत्रातील ही महत्वपूर्ण नगरपरिषद आहे. या नगरपरिषदमधे मुख्याधिकारी बिपिन मुग्धा, शहर अभियंता महेश वानखेडे यांच्या संगनमताने सन शहरात भूमिगत विद्युत लाईन टाकण्याच्या जवळपास 4,33 कोटी रुपयाच्या कामात जी निविदा काढण्यात आली त्यात कुठल्याही अटी आणि शर्तीची पुर्तता न करता अमर्चन्द गांधी यांच्या ए एम जी ट्रान्सफौर्मर नावाच्या कंत्राटी कंपनीला कंत्राट देण्यात आले.

महत्वाची बाब म्हणजे निविदेमधे सन 2016-17. 2017-18 च्या प्रस्तावित बैलेन्स शीट सादर करणे आणि सन 2017 चे आयकर रिटर्न सर्टिफिकेट देणे आवश्यक होते मात्र. अमर्चण्द गांधी यांनी केवळ 2016 चे आयकर रिटर्न प्रमाणपत्र सादर करून त्याचं आधारावर कोट्यवधीचे कंत्राट मिळविले. मात्र या कंत्राटदाराला खुली सूट देवून बल्लारपूर नगरपरिषदचे मुख्याधिकारी बिपिन मुग्धा. शहर अभियंता महेश वानखेडे यांनी नगरपरिषदमधे मोठा आर्थिक घोटाळा केला आहे. या संदर्भात लक्ष्मण लिन्गय्या कनकुटला यांनी माहिती अधिकारात मिळविलेल्या माहितीत. एवढेच नव्हे तर त्यांनी मुख्याधिकारी यांना या कंत्राटामधे झालेल्या अनियमितता संदर्भात तक्रार केली असतांना सुद्धा कंत्राटदारावर करवाई न करता उलट त्यांना जवळपास 2 कोटी रुपये कामाचे मूल्यांकन न करता देण्यात आल्याचे बोलल्या जातं आहे. ही बाब केवळ भूमिगत विद्युत लाईन कामामध्येच नाही तर घनकचरा व्यवस्थापन मधे सुद्धा असल्याने बल्लारपूर नगरपरिषदमधे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतं असल्याची गंभीर बाब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजू कुकडे यांनी यांच्या लक्षात येताच त्यांनी याबाबत जिल्हाधिकारी. नगरविकास मंत्रालय आयुक्त. विभागीय आयुक्त आयकर विभाग आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक नागपूर यांचेकडे तक्रार देवून संबंधित कंत्राटदार अमर्चन्द गांधी. मुख्याधिकारी आणि नगर अभियंता यांचेवर चौकशी करून करवाई करा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना बल्लारपूर नगरपरिषदमधील भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन करेल असा इशारा चंद्रपूर प्रेस क्लब येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून प्रशासनाला दिला आहे. या प्रसंगी राजू बघेल, पीयूष धूपे, कोटेश्वरि गोहने व इतर मनसैनिक उपस्थित होते.

admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा