You are here
Home > विदर्भ > मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांना पत्र!

मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांना पत्र!

-प्रति मा.

राजसाहेब ठाकरे.
सस्नेह जय महाराष्ट्र!
आपणास हे पत्र लिहिण्याचे कारण की आपण निवडणूक निकालावर “अनाकलनीय !” असं निवडणूक निकालावरून भाष्य केलं होतं. खरं तर तुमच्याप्रमाणे आमचाही एकवेळ विश्वास बसला नाही. कारण सन 2014 ला जी मोदी लाट होती ती ह्या वेळी नव्हती.शिवाय मोदी सरकारविरोधात जनमत निर्माण झालं होतं त्यामुळे मोदी हरणार अशीच एकूण राजकीय परिस्थिती होती. पण शेवटी लोकांचा निर्णय म्हणून आम्ही तो स्वीकारला. या निकालानंतर तुम्हाला Facebook वर ट्रोल होताना बघून एक निष्ठावान पत्रकार म्हणून खूप वाईट वाटत होते पण आम्ही त्यांना सडेतोड उत्तर दिल्यानंतर सुद्धा काहीच करू शकलो नाही.याची खंत वाटते त्याबद्दल माफी असावी.
तुमच्यावरच्यावरील ‘ Good Morning साहेब, पोपट, पेंटर, काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रचारक, माध्यमांनी फुगवलेला फुगा वगैरेच्या टिका असल्या तरी आपण भाषणांतून पुराव्यानिशी, संदर्भ देऊन,स्वतःचे विचार असणाऱ्या लोकांच्या तर्काला पटेल अशी, यांची पोलखोल करत होता तेंव्हा मात्र महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील अनेक राज्यातील लोकं आपले कौतुक करत होते.. मोदींनी ५ वर्षांपूर्वी दाखवलेली स्वप्न आणि आता झालेली देशाची परिस्थिती यातील विरोधाभास तुम्ही सिद्ध करून पुराव्यानिशी दाखवला .
तुमच्या भाषणांनांचं इंग्रजी भाषांतर बघून दिल्ली,UP, बिहार,आसाम, तामिळनाडू, आसाम अशा भारतातील अनेक राज्यांतून लोकं बोलत होती की आपण महाराष्ट्रात काय करताय ? तुम्ही देशाच्या राजकारणात यायला पाहिजे,महाराष्ट्र तुम्हाला ओळखण्यात चुक करतोय.” तुमच्या भूमिका त्यांना पटल्या होत्या कारण हा देश विविधतेने नटलेला आहे.अनेक जाती धर्माचे, अनेक भाषा बोलणारे, विविध अन्न खाणारे, वेगवेगळे सण- उत्सव साजरे करणारे व वेगवेगळे विचार असणाऱ्या लोकांनी भारत बनलेला आहे या सगळ्या गोष्टींचा सन्मान ठेवलाच पाहिजे ही तुमची भूमिका अनेकांना इतर राज्यात पटत होती पण महाराष्ट्रातल्या लोकांच्या कंमेंट काय होत्या ? तर सट्टेबाज, स्टार प्रचारक, पेंटर इत्यादी.
मला कळत नाही की महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या १२ कोटी जनतेनीं तुम्हाला कधी सत्ता दिलीच नाही मग हे कोणत्या तर्कावर तुम्हाला भ्रष्टाचारी बोलताय ? सत्तेत नसताना तुम्ही खूप कामं केली. टोल आंदोलन झाल्यावर अनधिकृत ७५ पेक्षा व अधिकृत अनेक टोल बंद झाले तेंव्हा हेच लोकं म्हणतात सेटिंग झाली..आज मुंबईत आणि इतर मोठ्या शहरात बाहेर प्रांतातील व्यक्तीने दादागिरी केली तर मनसेचा धाक हीच मराठी माणसं दाखवतात. संघटन कमी असूनही महाराष्ट्रसैनिक मुजोर व्यवस्थेला प्रश्न करतात, लोकांचे प्रश्न सोडवतात, मोर्चे आंदोलने करतात, विरोधी पक्षाची भूमिका बजावतात पण हे आपल्याच मराठी माणसाला का कळत नाही ? तुम्ही एक उत्कृष्ट व्यंगचित्रकार आहात पण हेच निर्बुद्ध लोक तुमची पेंटर म्ह्णून खिल्ली उडवली जाते.यशवंतरावांसारखे तुम्ही कलाप्रेमी आहात पण कलेचं महत्व या लोकांना समजलंच नाही.त्यामुळे स्वातंत्र्यापासून प्रत्येक सरकारांनी जे जे उभं केलं त्यात कुठेच इंग्रजांच्या कलाक्रुतीची सौंदर्यदृष्टी दिसत नाही. इतर राज्यांतून येणाऱ्या स्थलांतरामुळे शहरं बकाल होत आहेत, इथली वाहतुक व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, शिक्षण व्यवस्था, रोजगार या सर्वांवर ताण येत आहे. त्यापेक्षा प्रत्येकाने स्वतःच्या राज्यात रोजगार उभे केले तर हे स्थलांतर बंद होईल व महाराष्ट्राप्रमाणे इतर राज्येही पुढे जातील ही आपली भूमिका याच मराठी लोकांना प्रांतवादी कशी वाटते ? महाराष्ट्रात रोजगारासाठी प्राधान्य स्थानिकांना मिळालं तर आरक्षणासाठी मोर्चे पण काढायची गरज नाही, पण मग जातीत फूट पाडून, निवडणुकांपुरतं आरक्षणाचे गाजर दाखवून , आश्वासनं देऊन निवडून येता येतं हे आपण का करीत नाही असा काहींना प्रश्न पडतो.खरं तर भारतात प्रादेशिक पक्षही एखाद्या राज्याला खूप पुढे घेऊन जाऊ शकतात हे अनेक राज्यातील प्रादेशिक पक्षाच्या सरकारनी सिद्ध करून दाखवलय.
तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र असे कितीतरी राज्ये आहेत.तेथे प्रादेशिक पक्षांनी राज्ये खूप पुढे नेलीत. राज्य पुढे म्हणजेच देश पुढे ! हे सूत्र आहे मात्र हेच लोकं निवडणूकांच्या वेळी चुकीच्या लोकांना मतदान करतात आणि पाच वर्ष सतत तक्रारी करतात, “नोकऱ्या नाही,महागाई वाढली, शेतमालाला बाजार नाही, मालाला मागणी नाही, अर्थव्यवस्थेत मंदी आहे, स्वायत्त संस्थांची विश्वसनीयता ढासळली आहे, विचारवंतांच्या हत्या होत आहेत अशा कितीतरी तक्रारी आहेत..मग निवडणुकीत यांच्या शेपट्या मागे का वळतात ? मी म्हणतो आता यांना तक्रारी करण्याचा काही अधिकार नाही..
आपण महाराष्ट्र विकासाची ब्लू प्रिंट मराठी जनतेला दिली.महाराष्ट्र मला असा करायचा आणि असा घडवायचा आहे. तुमच्या हातात हे राज्य आलं तर हा महाराष्ट्र कसा उभा राहील याचं सगळं नियोजन. संशोधन, अहवाल, अधिकृत माहितीचा आधार घेऊन तयार केलेल्या या ब्लू प्रिंट मध्ये आहेत..पण या महाराष्ट्रातील लोकांना भंपक अफवा पसरवणारे संदेश वाचण्यात रस आहे. तुम्हाला ट्रोल करायला वेळ आहे पण ब्लुएप्रिंट वाचायला नाही..कधी कधी असं वाटतंय की तुम्ही उगाच धर्मनिरपेक्षता, रोजगार, पाणी प्रश्न आरोग्य, शिक्षण यावर बोलताच कशाला ? या सगळ्यांनी थोडी मते मिळतात? तुम्ही हे सोडून फक्त राजकारण करा.तथ्यहीन बोलून नुसत्या टीका करा..चर्चेत रहा..नेहरू, इंदिराजी, राजीव गांधींनी कसं देशाचं वाटोळे केलं सांगा..सैन्याचं, शास्त्रज्ञांचं श्रेय लाटा..ज्या संस्था बेरोजगारीची आकडेवारी बाहेर आणतात त्यांना रोखा, आपल्या जवळच्या उद्योगपतींना भरमसाट कर्ज देऊन देशाबाहेर पळण्यास मदत करा, शेतकऱ्यांना खोटी आश्वासनं द्या .. आपल्याला फक्त हिंदू राष्ट्र घडवायचं आहे असं बोला..तुम्ही फक्त बोलायचं ,भारत माता की जय, वंदे मातरम, पाकिस्तान मुर्दाबाद वगैरे..लोकं प्रेमात पडतील तुमच्या..तुमच्यावर टीका करणाऱ्या लोकांना शिव्या घालायला तुम्हीही IT सेल उघडा.. त्यात प्रति/कंमेंट ने दर ठरवून भाडोत्री व विचार गहाण ठेवलेले लोक बसवा..दाभोळकर कलबुर्गी, पानसरे, गौरी लंकेश यांसारख्या व्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना संपवण्याचा प्रयत्न करा..कुठे गोतस्करी वगैरे शंका आली, मुलं-मुली सोबत बसलेले दिसले की संस्कृती रक्षणासाठी उत्तरप्रदेश प्रमाणे गुंडांच्या टोळ्या तयार करा..जणू अशीच महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे. नोटबंदीमुळे ४ कोटी पेक्षा जास्त रोजगार गेले, छोटे उद्योग व शेती कोलमडली, आर्थिक वृद्धीदर २% ने कमी झाला, मंदी आलीये , दुष्काळाने लोकांना जगणं कठीण केलंय.. तुम्ही ४५ रु/लिटर ने दूध घेत असाल पण आमच्याकडून १७-१८ रु/ लिटरने विकलं जातं..कापसाच्या बियांपासून तेल काढल्यावर सरकी पेंड उरते, ती आम्ही जनावरांसाठी विकत घेतो.५ वर्षांपूर्वी ५० किलोचं पोतं ७०० रु ला मिळायचं, आता ते १७५५ रु. ला मिळायला लागले. दुसरीकडे कापसाला बाजार नाही..अशा आरोळ्या उठताय.पण हे सगळे आपण बदलवू शकता अशा अपेक्षा जनतेच्या आपल्याकडून आहे.असो. आपण महाराष्ट्र सैनिकांना सांगितलंय, “जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडवायचा आहे” …
त्यामुळे आम्ही राजकारणाविरहीत आम्हाला जे जे करता येईल ते आम्ही निश्चितपणे करूच.. आणि कोणतीही सरकारं सत्तेवर येवोत जे जे चुकीचं आहे त्याविरोधात आम्ही रान पेटवू.पण आपल्या महाराष्ट्रात मराठी माणसाच्या मनात घर करण्यासाठी आपण पक्ष बांधणीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.आणि विशेष म्हणजे ज्यांची पात्रता आहे व पक्षहितासाठी ज्यांचं समर्पण आहे त्याच होतकरू कार्यकर्त्याला पदे द्यावी कारण आपल्या पक्षात काही ठिकाणी पदाधिकारी नेमले आहे त्यांचं पक्षासाठी योगदान नाही आणि त्यांची पात्रता नसताना सुद्धा काही वरिष्ठांच्या आशीर्वादाने अनेक वर्षापासून तेच ते पदाधिकारी आहे त्यांना बदलविने आवश्यक आहे तरच महाराष्ट्रात गाव खेड्यात आपली संघटना मजबूत होऊन आपण महाराष्ट्राच्या सत्तेत येऊ.लोकसभा निवडणुकीनंतर शेतकरी नेते राजू शेट्टी आपल्याकडे आले. कॉंग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे आले. याचा अर्थ आपली भूमिका आणि आपलं अस्तित्व इथल्या विरोधी पक्षातील नेत्यांनीं मान्य केलं आहे. त्यामुळे आपण पुन्हा या महाराष्ट्रातील मराठी जनतेला हाक द्या. आणि महाराष्ट्रातील भाजप सेनेच्या सत्तेला पायउतार करा. आणि हो हे तुम्हीच करू शकता ! मला सुद्धा विश्वास आहे.
……राजू कुकडे संपादक साप्ताहिक भुमीपुत्राची हाक चंद्रपूरप्रति मा. राजसाहेब ठाकरे.
सस्नेह जय महाराष्ट्र!
आपणास हे पत्र लिहिण्याचे कारण की आपण निवडणूक निकालावर “अनाकलनीय !” असं निवडणूक निकालावरून भाष्य केलं होतं. खरं तर तुमच्याप्रमाणे आमचाही एकवेळ विश्वास बसला नाही. कारण सन 2014 ला जी मोदी लाट होती ती ह्या वेळी नव्हती.शिवाय मोदी सरकारविरोधात जनमत निर्माण झालं होतं त्यामुळे मोदी हरणार अशीच एकूण राजकीय परिस्थिती होती. पण शेवटी लोकांचा निर्णय म्हणून आम्ही तो स्वीकारला. या निकालानंतर तुम्हाला Facebook वर ट्रोल होताना बघून एक निष्ठावान पत्रकार म्हणून खूप वाईट वाटत होते पण आम्ही त्यांना सडेतोड उत्तर दिल्यानंतर सुद्धा काहीच करू शकलो नाही.याची खंत वाटते त्याबद्दल माफी असावी.
तुमच्यावरच्यावरील ‘ Good Morning साहेब, पोपट, पेंटर, काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रचारक, माध्यमांनी फुगवलेला फुगा वगैरेच्या टिका असल्या तरी आपण भाषणांतून पुराव्यानिशी, संदर्भ देऊन,स्वतःचे विचार असणाऱ्या लोकांच्या तर्काला पटेल अशी, यांची पोलखोल करत होता तेंव्हा मात्र महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील अनेक राज्यातील लोकं आपले कौतुक करत होते..मोदींनी ५ वर्षांपूर्वी दाखवलेली स्वप्न आणि आता झालेली देशाची परिस्थिती यातील विरोधाभास तुम्ही सिद्ध करून पुराव्यानिशी दाखवला .
तुमच्या भाषणांनांचं इंग्रजी भाषांतर बघून दिल्ली,UP, बिहार,आसाम, तामिळनाडू, आसाम अशा भारतातील अनेक राज्यांतून लोकं बोलत होती की आपण महाराष्ट्रात काय करताय ? तुम्ही देशाच्या राजकारणात यायला पाहिजे,महाराष्ट्र तुम्हाला ओळखण्यात चुक करतोय.” तुमच्या भूमिका त्यांना पटल्या होत्या कारण हा देश विविधतेने नटलेला आहे.अनेक जाती धर्माचे, अनेक भाषा बोलणारे, विविध अन्न खाणारे, वेगवेगळे सण- उत्सव साजरे करणारे व वेगवेगळे विचार असणाऱ्या लोकांनी भारत बनलेला आहे या सगळ्या गोष्टींचा सन्मान ठेवलाच पाहिजे ही तुमची भूमिका अनेकांना इतर राज्यात पटत होती पण महाराष्ट्रातल्या लोकांच्या कंमेंट काय होत्या ? तर सट्टेबाज, स्टार प्रचारक, पेंटर इत्यादी.
मला कळत नाही की महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या १२ कोटी जनतेनीं तुम्हाला कधी सत्ता दिलीच नाही मग हे कोणत्या तर्कावर तुम्हाला भ्रष्टाचारी बोलताय ? सत्तेत नसताना तुम्ही खूप कामं केली. टोल आंदोलन झाल्यावर अनधिकृत ७५ पेक्षा व अधिकृत अनेक टोल बंद झाले तेंव्हा हेच लोकं म्हणतात सेटिंग झाली..आज मुंबईत आणि इतर मोठ्या शहरात बाहेर प्रांतातील व्यक्तीने दादागिरी केली तर मनसेचा धाक हीच मराठी माणसं दाखवतात. संघटन कमी असूनही महाराष्ट्रसैनिक मुजोर व्यवस्थेला प्रश्न करतात, लोकांचे प्रश्न सोडवतात, मोर्चे आंदोलने करतात, विरोधी पक्षाची भूमिका बजावतात पण हे आपल्याच मराठी माणसाला का कळत नाही ? तुम्ही एक उत्कृष्ट व्यंगचित्रकार आहात पण हेच निर्बुद्ध लोक तुमची पेंटर म्ह्णून खिल्ली उडवली जाते.यशवंतरावांसारखे तुम्ही कलाप्रेमी आहात पण कलेचं महत्व या लोकांना समजलंच नाही.त्यामुळे स्वातंत्र्यापासून प्रत्येक सरकारांनी जे जे उभं केलं त्यात कुठेच इंग्रजांच्या कलाक्रुतीची सौंदर्यदृष्टी दिसत नाही. इतर राज्यांतून येणाऱ्या स्थलांतरामुळे शहरं बकाल होत आहेत, इथली वाहतुक व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, शिक्षण व्यवस्था, रोजगार या सर्वांवर ताण येत आहे. त्यापेक्षा प्रत्येकाने स्वतःच्या राज्यात रोजगार उभे केले तर हे स्थलांतर बंद होईल व महाराष्ट्राप्रमाणे इतर राज्येही पुढे जातील ही आपली भूमिका याच मराठी लोकांना प्रांतवादी कशी वाटते ? महाराष्ट्रात रोजगारासाठी प्राधान्य स्थानिकांना मिळालं तर आरक्षणासाठी मोर्चे पण काढायची गरज नाही, पण मग जातीत फूट पाडून, निवडणुकांपुरतं आरक्षणाचे गाजर दाखवून , आश्वासनं देऊन निवडून येता येतं हे आपण का करीत नाही असा काहींना प्रश्न पडतो.खरं तर भारतात प्रादेशिक पक्षही एखाद्या राज्याला खूप पुढे घेऊन जाऊ शकतात हे अनेक राज्यातील प्रादेशिक पक्षाच्या सरकारनी सिद्ध करून दाखवलय.
तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र असे कितीतरी राज्ये आहेत.तेथे प्रादेशिक पक्षांनी राज्ये खूप पुढे नेलीत. राज्य पुढे म्हणजेच देश पुढे ! हे सूत्र आहे मात्र हेच लोकं निवडणूकांच्या वेळी चुकीच्या लोकांना मतदान करतात आणि पाच वर्ष सतत तक्रारी करतात, “नोकऱ्या नाही,महागाई वाढली, शेतमालाला बाजार नाही, मालाला मागणी नाही, अर्थव्यवस्थेत मंदी आहे, स्वायत्त संस्थांची विश्वसनीयता ढासळली आहे, विचारवंतांच्या हत्या होत आहेत अशा कितीतरी तक्रारी आहेत..मग निवडणुकीत यांच्या शेपट्या मागे का वळतात ? मी म्हणतो आता यांना तक्रारी करण्याचा काही अधिकार नाही..
आपण महाराष्ट्र विकासाची ब्लू प्रिंट मराठी जनतेला दिली.महाराष्ट्र मला असा करायचा आणि असा घडवायचा आहे. तुमच्या हातात हे राज्य आलं तर हा महाराष्ट्र कसा उभा राहील याचं सगळं नियोजन. संशोधन, अहवाल, अधिकृत माहितीचा आधार घेऊन तयार केलेल्या या ब्लू प्रिंट मध्ये आहेत..पण या महाराष्ट्रातील लोकांना भंपक अफवा पसरवणारे संदेश वाचण्यात रस आहे. तुम्हाला ट्रोल करायला वेळ आहे पण ब्लुएप्रिंट वाचायला नाही..कधी कधी असं वाटतंय की तुम्ही उगाच धर्मनिरपेक्षता, रोजगार, पाणी प्रश्न आरोग्य, शिक्षण यावर बोलताच कशाला ? या सगळ्यांनी थोडी मते मिळतात? तुम्ही हे सोडून फक्त राजकारण करा.तथ्यहीन बोलून नुसत्या टीका करा..चर्चेत रहा..नेहरू, इंदिराजी, राजीव गांधींनी कसं देशाचं वाटोळे केलं सांगा..सैन्याचं, शास्त्रज्ञांचं श्रेय लाटा..ज्या संस्था बेरोजगारीची आकडेवारी बाहेर आणतात त्यांना रोखा, आपल्या जवळच्या उद्योगपतींना भरमसाट कर्ज देऊन देशाबाहेर पळण्यास मदत करा, शेतकऱ्यांना खोटी आश्वासनं द्या .. आपल्याला फक्त हिंदू राष्ट्र घडवायचं आहे असं बोला..तुम्ही फक्त बोलायचं ,भारत माता की जय, वंदे मातरम, पाकिस्तान मुर्दाबाद वगैरे..लोकं प्रेमात पडतील तुमच्या..तुमच्यावर टीका करणाऱ्या लोकांना शिव्या घालायला तुम्हीही IT सेल उघडा.. त्यात प्रति/कंमेंट ने दर ठरवून भाडोत्री व विचार गहाण ठेवलेले लोक बसवा..दाभोळकर कलबुर्गी, पानसरे, गौरी लंकेश यांसारख्या व्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना संपवण्याचा प्रयत्न करा..कुठे गोतस्करी वगैरे शंका आली, मुलं-मुली सोबत बसलेले दिसले की संस्कृती रक्षणासाठी उत्तरप्रदेश प्रमाणे गुंडांच्या टोळ्या तयार करा..जणू अशीच महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे. नोटबंदीमुळे ४ कोटी पेक्षा जास्त रोजगार गेले, छोटे उद्योग व शेती कोलमडली, आर्थिक वृद्धीदर २% ने कमी झाला, मंदी आलीये , दुष्काळाने लोकांना जगणं कठीण केलंय.. तुम्ही ४५ रु/लिटर ने दूध घेत असाल पण आमच्याकडून १७-१८ रु/ लिटरने विकलं जातं..कापसाच्या बियांपासून तेल काढल्यावर सरकी पेंड उरते, ती आम्ही जनावरांसाठी विकत घेतो.५ वर्षांपूर्वी ५० किलोचं पोतं ७०० रु ला मिळायचं, आता ते १७५५ रु. ला मिळायला लागले. दुसरीकडे कापसाला बाजार नाही..अशा आरोळ्या उठताय.पण हे सगळे आपण बदलवू शकता अशा अपेक्षा जनतेच्या आपल्याकडून आहे.असो. आपण महाराष्ट्र सैनिकांना सांगितलंय, “जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडवायचा आहे” …
त्यामुळे आम्ही राजकारणाविरहीत आम्हाला जे जे करता येईल ते आम्ही निश्चितपणे करूच.. आणि कोणतीही सरकारं सत्तेवर येवोत जे जे चुकीचं आहे त्याविरोधात आम्ही रान पेटवू.पण आपल्या महाराष्ट्रात मराठी माणसाच्या मनात घर करण्यासाठी आपण पक्ष बांधणीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.आणि विशेष म्हणजे ज्यांची पात्रता आहे व पक्षहितासाठी ज्यांचं समर्पण आहे त्याच होतकरू कार्यकर्त्याला पदे द्यावी कारण आपल्या पक्षात काही ठिकाणी पदाधिकारी नेमले आहे त्यांचं पक्षासाठी योगदान नाही आणि त्यांची पात्रता नसताना सुद्धा काही वरिष्ठांच्या आशीर्वादाने अनेक वर्षापासून तेच ते पदाधिकारी आहे त्यांना बदलविने आवश्यक आहे तरच महाराष्ट्रात गाव खेड्यात आपली संघटना मजबूत होऊन आपण महाराष्ट्राच्या सत्तेत येऊ.लोकसभा निवडणुकीनंतर शेतकरी नेते राजू शेट्टी आपल्याकडे आले. कॉंग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे आले. याचा अर्थ आपली भूमिका आणि आपलं अस्तित्व इथल्या विरोधी पक्षातील नेत्यांनीं मान्य केलं आहे. त्यामुळे आपण पुन्हा या महाराष्ट्रातील मराठी जनतेला हाक द्या. आणि महाराष्ट्रातील भाजप सेनेच्या सत्तेला पायउतार करा. आणि हो हे तुम्हीच करू शकता ! मला सुद्धा विश्वास आहे.
……राजू कुकडे संपादक साप्ताहिक भुमीपुत्राची हाक चंद्रपूर

admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा