You are here
Home > कृषि व बाजार > बबन उरकुडे यांच्या पुन्हा शिवसेनेत घेतलेल्या कोलांटउड्या आल्या अंगलट.उपजिल्हाप्रमुख पद महीनाभरातच रद्द !

बबन उरकुडे यांच्या पुन्हा शिवसेनेत घेतलेल्या कोलांटउड्या आल्या अंगलट.उपजिल्हाप्रमुख पद महीनाभरातच रद्द !

*बबन उरकुडे यांच्या शिवसेनेत पुनः कोलांट्याउड्या आल्या अंगलट. उपजिल्हा प्रमुख पद महिन्याभरातच रद्द! शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख बबन उरकुडे यांनी जिल्ह्यातील शिवसेनेच्या तत्कालीन वरिष्ठ नेत्यावर नाराजगी व्यक्त करीत मोठा गाजावाजा करून शेतकरी संघटनेत प्रवेश केला.गावोगावी शिवसेनेला शिव्या हाणत पक्षप्रवेशाचा धडाका उठविला, संघटनेत सर्व आलबेल सुरु असतानाही कुणास ठाऊक कुठे कशी माशी शिंकली, आणि लोकसभा निवडणुकीत ज्या धानोरकरांनावर ठपका ठेऊन सेना सोडली व संघटनेत प्रवेश केला त्याच धानोरकरांच्या लोकसभा निवडणूक प्रचारात ह्याच महाशयांनी हिरहिरीने सहभाग घेत जणू काँग्रेस पक्ष प्रवेशाच्या चर्चा उठत पर्यंत प्रचार केला.मग काही दिवसातच शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी पुनः शिवसेनेत प्रवेश करून जय विदर्भ म्हणता म्हणता जय महाराष्ट्र चा राग अलापने सुरु केले. मात्र त्यांची ही भूमिका आजवर त्यांच्या पाठीशी असणाऱ्या समर्थकांना बुचकळ्यात टाकणारी ठरली. *पुनः प्रवेशाने काय साध्य केले? त्यांच्या या पुनः प्रवेशामागे गृहलक्ष्मी चा सिंहाचा वाट असल्याचे त्यांचे अनेक कार्यकर्ते उघडपणे बोलतात. या प्रवेशानंतर त्यांना शिवसेना संपर्क प्रमुख सुरेश सावंत यांच्या मर्जीने उपजिल्हा प्रमुख पद देण्यात आल्याचे पत्र अनेक माध्यमांवर फिरत होते. हे पद जरी मिळाले तरी आजवर त्यांच्या पाठीशी असलेल्या व सेनेतून संघटनेत गेलेल्या, पुनः संघटनेतून सेनेत येण्यास 70%युवकांनी नकार दिला याची प्रचिती राजुरा वसतिगृह अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ आयोजित केलेल्या “मुंडन मोर्चात दिसून आली (नेहमी 200-300कार्यकर्ते सोबत ठेवणाऱ्या या वाघाची डरकाळी यावेळेस जंगलजमा करण्यास समर्थ ठरली, व शेवटी मुंडन न करताच 10-15लोकांना सोबत घेऊन फक्त निवेदनावरच मोर्चाचे मुंडन करावे लागले होते. विशेष म्हणजे या मोर्चाला शिवसेनेच्या जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांनीही पाठ फिरविली होती याचे कारण अजूनही अस्पष्ठ आहे.तालुक्यातील एका महिलेला सेनेचे बरोबरीचे पद देण्यावरून यांच्या गृहलक्षमी ने वादंग उठविल्याचे नाव न सांगण्याच्या अटीवर 24तास सोबत असणाऱ्या कार्यकर्त्याने सांगितले ,यावरून यांच्या गृहलक्ष्मीची नेमकी पावर काय ते लाक्षत येते. *अवघ्या महिन्याभरात गमवावे लागले उपजिल्हा प्रमुख पद* : शिवसेनेतील काही अंतर्गत वादामुळे वरिष्ठांची मर्जी न घेता संपर्क प्रमुख सावंत यांनी वाटलेली सर्व पद-नियुक्ती पत्रे आता शेंगदाणेपुडी बनविण्याच्या कामाची झालेली आहे. त्यांनी वाटलेली सर्व पदे मुंबई हुन रद्द करण्यात आली असल्याची खात्रीलायक माहिती आहे.त्यात जिल्ह्यातील शिवसेनेच्या इतर शाखांच्या जिल्हाप्रमुख पदाचाही समावेश आहे.या अचानक घडलेल्या प्रकारामुळे जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते नाराज असून,कार्यकर्त्यांच्या अनेक वेगवेगळ्या गटांची सारखी आवक-जावक मुंबई ला सुरु असून यातून उरकुडे नेमके कोणत्या गटात सामील आहेत व पुढे यांना पद मिळण्याच्या शक्यतेवर यांच्या सोबत असलेल्या बोटावर मोजण्या इतक्या कार्यकर्त्यात संभ्रम असून आज त्यांच्या कार्यालय उदघाटन कार्यक्रमाला जिल्हाप्रमुखांची मात्र 5मिनिटांची हजेरी नवीन प्रश्न निर्माण करून गेली आहे. एकेकाळी शिवसेनेची तुती बोलणाऱ्या या राजुरा विधानसभा क्षेत्रांत शिवसेना बकाल झाल्याने आता त्या शिवसेनेत उरकुडे कुठली जान निर्माण करेल. हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल ….

admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा