You are here
Home > कृषि व बाजार > विद्यार्थी युवकांना सैन्य दलात अधिकारी होण्याची सुवर्ण संधी! चंद्रपूर येथे परीसंवाद व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन 5जूनला..

विद्यार्थी युवकांना सैन्य दलात अधिकारी होण्याची सुवर्ण संधी! चंद्रपूर येथे परीसंवाद व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन 5जूनला..

चंद्रपूर ( प्रतिनिधी ): चंद्रपूर क्रीडा भारती तर्फे कार्यरत विजयपथ ही संस्था सशस्त्र आणि तत्सम सेनेतील करियर बाबत संपूर्ण विदर्भात मोफत मार्गदर्शन करण्यासाठी कार्यरत आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ चंद्रपूर जिल्हा तथा विजयपथ या संस्थेच्या संयुक्त विद्द्यमानने चंद्रपूर , गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्याकरिता ‘ करिअर इन डिफेन्स सर्व्हिसेस’ या विषयावर बुधवार रोज 5 जून 2019 ला जिल्हामध्यवर्ती सहकारी बँकेच्या ‘कन्नमवार’ सभागृहात निशुल्क परिसवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादामध्ये सशस्त्र सैन्य दलातील निवृत्त कर्नल शिरीष मुजुमदार, कर्नल अविनाश मुळे, ग्रुप कॅप्टन सुभाष पागे हे मार्गदर्शन करणार आहे.
भारतीय सैन्यात प्रवेश कसा करावा? स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी? प्रात्यक्षिक आणि प्रगत अभ्रासक्रमांचे स्वरूप यावर विस्तृत मार्गदर्शन व चर्चा या परिसंवादात होणार आहे या सेमिनारमध्ये 16 ते 24 वर्ष वयोगटातील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. सदर सेमिनार चंद्रपूर जिल्हामध्यवर्ती सहकारी बँकेच्या सौज्यान्याने संपन्न होत आहे.
सैन्यात प्रवेश विषयी केंद्रीय लोकसेवा आयोग , राष्ट्रीय रक्षा अकॅडमी नोसेना रक्षा अकॅडमी, संयुक्त रक्षा सेवा परीक्षा, शार्ट सर्व्हिस कमिशन याबाबत संपूर्ण माहिती या सेमिनार मध्ये देन्यात येणार आहे. सादर सेमिनाचे उदघाटन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनोहर राव पाउनकर यांचे हस्ते होणार आहे.
सैन्यात अधिकारी होण्यासाठी चंद्रपूर गडचिरोली जिल्हातील जास्तीत जास्त विद्यार्थानि पुढाकार घ्यावा व तयारी करावी या ऊद्देशाने प्रेरित होऊन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व विजयपथ यांचे संयुक्त विद्यमानाने या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून मोठ्या संख्येने युवकांनी लाभ घ्यावा असे आव्हान संघांचे पूर्व विदर्भ अध्यक्ष प्रा. महेश पानसे, जिल्हा अध्यक्ष सुनील बोकडे, कार्याध्यक्ष जितेंद्र चोरडिया, जिल्हा सरचिटणीस राजू कुकडे यांनी केले आहे

admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा