You are here
Home > कृषि व बाजार > मराठी माणसाला ऊद्दोजक होण्यासाठी मनसेच्या रोजगार-स्वयंरोजगार विभागाचे आव्हान !

मराठी माणसाला ऊद्दोजक होण्यासाठी मनसेच्या रोजगार-स्वयंरोजगार विभागाचे आव्हान !

**मराठी माणसा उद्योजक हो!**

**मराठी माणसा व्यवसाय करण्याचे धाडस कर!**

**स्वतः चा व्यवसाय उभा कर!**

**रोजगार दे, स्वयंरोजगार कर!**

**१,०००/- ते २५,०००/- रुपयांपर्यंत भागभांडवल लागणारे व्यवसाय*

**अथक कष्ट,परिश्रम घेतले तर,** **नक्कीच यशस्वी होणारे ५१ उद्योग!**

१) चहा काॅफी करुन विकणे.पाचपट नफा.

२) कुल्फी विकणे.घरीच केली तर तिप्पट नफा.

३) मासे विकणे.दिडपट नफा.

४) आंबे घाऊक आणून, किरकोळ विकणे.

५) भाजीपाला अर्थात पहाटे घाऊक भाजी खरेदी करून किरकोळ विकणे दिडपट होतात.

६) पाणीपुरी रगडा पुरी विकणे यात पैसे तिप्पट होतात.

७) कच्छी दाबेली विक्री केंद्रद्वारे विकून चौपट नफा मिळवा, दाबेलीचे वेगळे पाव मिळतात.

८) वडापावची गाडी लावा,स्वस्त विकलेत तरी दिडपट नफा.

९) मूग भजी ची विक्री करा,घराबाहेरच विक्री केंद्र लावा.चागंला व्यवसाय होतो. तिप्पट नफा.

१०) ढोकळा घरी बनवून चटणी बनवून मोठ्या डब्यात भरुन घराबाहेर किंवा मोक्याच्या ठिकाणी विका.

११) चाळीस रुपये किलोच्या डोस्याच्या पीठाचे वीस डोसा तयार होतात.एक डोसा वीस रुपयांना विका.सोबत भाजक्या डाळीची चटणी व बटाटा भाजी द्या.याच पीठाचे वडेसुध्दा विकता येतात.

१२) घरीच पोळी भाजी बनवुन ग्राहकाला कार्यालयात डबा पोहोचवा.

१३) फळ विक्री करा.

१४) शहाळे आणून विका, रोज तेच ते ग्राहक मिळेल. बावीस रुपयांचे चाळीस रुपये होतात.

१५) कापडाचे तुकडे पोत्याने विकत मिळतात. घरी शिलाई यंत्र असेल व कोणाले शिलाई करता येत असेल तर झबले टोपडे व दुपटे करून विका, टाकाऊतुन टिकाऊ बनवा.

१६) फ्लेक्स बॕनर,बोर्ड तयार करुन,लाकडी चौकट बनवून वा चिटकवून,लावून द्या. दोनशे ते पाचशे रुपये प्रती मिळतात.

१७) मुंबई येथे सुट्ट्या उदबत्त्या वजनावर विकतात तशा आपल्या स्वतःच्या गावात,शहरातही विकता येतील.

१८) मुंबई येथे घाऊक बाजारामध्ये कपड्यांचा गठ्ठा विकत आणून घरी सुध्दा व्यवसाय सुरु करु शकता,दादर रेल्वे स्थानकाशेजारीच घाऊक बाजार आहे.

१९) मंदिराजवळ नारळ विक्री करा.

२०) फुलांच्या मार्केटमधुन फुलं आणा व त्याचे हार करुन विका,यात खुप फायदा आहे.

२१) उपहारगृहांना कडधान्ये पुरवणे.

२२) उपहार गृहांना बटाटे खुप लागतात,पुरवठा करा.

२३) घरी चटणीचे चार पाच प्रकार तयार करुन थेट उपहारागृहे,खाऊ गल्ली येथे विका किंवा स्वतः किरकोळ विक्री करा.

२४) चामड शिवण्याचे जूने वा नविन यंत्र घ्या व चामड्याच्या वस्तू बनवून, तयार करुन विका.चांगले उत्पन्न मिळते.

२५) बाजाराला लसणाच्या पाकळ्या घाऊकमध्ये मिळतात,घरी आणून गरम पाण्यात मीठ टाकून लसणाच्या पाकळ्या टाकल्या की लगेच हाताने चोळुनही साले निघतात.उपहारगृहे, भाजीवाले यांना छोट्या मोठ्या पुड्या करुन विका.

२६) एलईडी बल्ब,ट्युब लाईट,फॕन स्टाॅल विक्री क्रेंद्र लावून विका.मुंबईत लोहार चाळ येथे
घाऊक विक्रेते आहेत.

२७) ज्यांना योगासने येतात त्यांनी त्याचे वर्ग सुरु करावेत.

२८) महिलांसाठी घरगुती व्यवसाय पाळणाघर सर्वात चांगला करु शकता,भांडवल लागतेच. खेळणी,दूध,बिस्किटे इत्यादी ठेवावे लागते.

२९) प्लॅस्टीक बंंद झाली असल्यामुळे कागदी व कापडी पिशव्यांची मागणी वाढत आहे,घरी तयार करा.दुकानदारांना थेट विका.खुप मागाणी आहे.

३०) पेस्टकंट्रोल कसे करतात शिकून घ्या,हा धंदा उन्हाळ्यात खुप चालतो.जागे नुसार दर असतात.

३१) नळजोडणी,प्लंबिंग काम शिकून घ्या.दररोज हजार रुपये ‘सहज कमवा’.

३२) विको दंतमंजनच्या मागे लिहिलेले साहित्य काष्टौषधीच्या दुकानातुन आणून त्याचे घरी दंतमंजन तयार करा.खुप लोक वापरतात त्यांना विक्री करा.

३३) काही औषधी जंगलात जाऊन गोळा करुन आणून आयुर्वेद वैद्याकडून शिकूनऔषधे बनवून विका.

३४) गोमुत्र गोळा करुन बाटलीत भरून विका.

३५) खेडेगावात असाल तर दुध गोळा करुन शहरात जाऊन विका. देशी गायीचे दूध शहरात सत्तर रुपये ते दोनशे रुपये प्रतिलीटर विकले जाते.

३६) गावाकडे उन्हाळ्यात कडबा कुट्टी खुप चालते. ज्याच्याकडे यंत्र आहे त्याच्याकडे जाऊन पोती भरुन घरपोच करता येतील.

३७) फाईल तयार करायचा पुठ्ठा मिळतो. पट्ट्याही मिळतात.फक्त कटिंग मशीनने कटींग करुन कार्यालयात पुरवठा करु शकता.छपाई करुन पाहिजे असल्यास छापखान्यातून छपाई करुन घेऊ शकता.

३८) स्टेपलर,त्याच्या पिना,पंच मशीन कार्यालयात पूरवठा करुन वीस ते पंचवीस टक्के फायदा मिळतोच.फक्त तुम्हाला बरेच कार्यालय शोधावे लागतील.

३९) लगीनसराईत नवरदेवाचे फेटे विका. ज्यांचे शिलाईचे दुकान आहे त्यांना हा जोडधंदा म्हणून चांगला आहे.

४०) भगव्या फेट्यांची मागणी जोरात चालू आहे. फेटा बांधायला शिका. चार महीने भरपूर कमवा. सोबत भगव्या फेट्याचे कापडही भाड्याने द्या.

४१) उन्हाळ्यात चिंच फोडून चिंच वेगळी करुन विकू शकता.शिरे व टरफले यांची पुड बनवुन त्यात मीठ मिसळुन तांबे पितळेची भांडी घासायला पावडर तयार करु शकता. चिंचोक्याचे भट्टीतुन लाह्याही बनवतात.

४२) उन्हाळ्यात घाऊक दही आणून त्याचे घुसळुन लोणी व ताक काढले जाते.मसाला ताक करुन विकणे हा खुप फायदेशीर व्यवसाय आहे.फक्त त्यात बर्फ टाकू नये.त्याऐवजी माठात साठवून ठेवता येते तसे विका.

४३) देवदेवतांचे साचे विकत मिळतात.त्यात POP टाकून मुर्ती बनवता येतील व रंगवून विकता येतील परंतु याला प्रशिक्षणाची व कौशल्याची खुप गरज आहे.कलेतुन पैसे जास्त मिळतात.

४४) रद्दी खरेदी करणे गठ्ठे बांधून घाऊक विकणे हा सर्वात कमी भांडवलाचा सुंदर व्यवसाय आहे. अनुभवातुन हा व्यवसाय मोठा करता येईल.

४५) व्यायामाचा अनुभव असेल तर शहरामध्ये व्यायाम प्रशिक्षक म्हणून प्रतिष्टीतांना व्यायामाचे धडे शिकवून,मार्गदर्शन करुन भरपूर मोबदला मिळतो.

४६) शेवचिवडा घाऊक आणायचा.चुरमुरे पोत्याने आणायचे.चुरमुरे चाळण मारुन साफ करून घ्यायचे.चिंचपाणी घरीच तयार करुन ओली व सुकी भेळ विकता येईल.अगदी हातगाडीसुध्दा चालेल. नाट्यगृह,समुद्र किनारा, गजबजलेल्या रस्त्यावर किंवा बागे बाहेर अशी छोटी दुकाने थाटली जातात.

४७) धोबी,परीट कामगार ठेवतात.धुवायचे कपडे, ड्रायक्लिन कपडे बाहेरच्या माणसाकडुन घेतले जाते.हल्ली हा व्यवसाय कोणीही करत आहे.शहरात जाऊन टाकला तर खात्रीने तुम्ही या व्यवसायामध्ये यशच मिळवणार.कारण शहरात नोकरी करणार्यां महिलांचे प्रमाण खुप आहे.

४८) रेडियम पट्ट्यांचा व्यवसाय खुप चांगला आहे पण यंत्रसामग्री आवश्यक आहे.सध्या सर्वात जास्त चालणारा व्यवसाय आहे.गाडीची क्रमांक पट्टी व सजावट या सर्वात रेडियम वापरतात. रोल घाऊक मिळतात. अगदी घरीही ब्लेडने कटिंग करुन विकता येते.

४९) भ्रमणध्वनी रिचार्ज चा व्यवसायही खुप चांगला आहे.एक हजार पासून सुरु करता येतो. विशिष्ठ ध्येय पुर्ण केले तर योजनांनुसार अनेक जादाचे फायदेही मिळतात.

५०) सर्वात सुंदर व नवव्यवसाय म्हणजे भ्रमणध्वनी व त्याच्याशी निगडीत सामान विकणे यात गुतंवणुकी नूसार प्रचंड नफा व फायदा आहे.

५१) वरील सर्व माहिती वाचल्याबद्दल धन्यवाद!
स्वतः लाभ घ्या अथवा गरजू व होतकरुंना लाभ मिळवून द्या !
व हा संदेश पुढे पाठवा !!
सर्व नवउद्योजकांच चांगभलं होवो!!!

**चला काम देणारे हात घडवूया**

*मराठी पाऊल पडते पुढे*

**आदरणीय,राजसाहेब ठाकरे**
**अध्यक्षः महाराष्ट्र नवनिर्माण सेना**

**सन्माननीय,महेंद्र बैसाणे**
**अध्यक्षः मनसे रोजगार व स्वयंरोजगार विभाग**
**महाराष्ट्र राज्य**

**विशेष सहकार्यः मा.सन्नी (सुनिल) आंबोरे**

**वासुदेव पांडुरंग नार्वेकर**
**प्रसार व प्रसिद्धी प्रमुख**
**रोजगार व स्वयंरोजगार विभाग**
**महाराष्ट्र राज्य**
**महाराष्ट्र नवनिर्माण सेना**

**आपणासं स्वयंरोजगार करण्यास शुभेच्छा**

**मनसेचा निर्धार,स्थानिकांना रोजगार!**

???????

admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा