
महाराष्ट्राचे अर्थ नियोजन तथा वनमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील स्वतःच्या बल्लारपूर विधानसभा क्षेत्रांत महाराष्ट्रातील एकमेव स्मार्ट बसस्थानक मार्च 2019 ला बांधले व त्यांचे विधिवत उद्घाटन करण्यात आले होते.हे बसस्थानक बांधणाऱ्या पटेल नावाच्या कंत्राटदारासह राज्य परिवहन नियंत्रण पाटिल आणि अभियंता मोडक हे दोषी असून यांनी या कामात कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केला असल्याची खात्रीलायक माहिती आहे.त्यामुळे कोट्यावधी रुपये खर्चून बांधलेल्या या बसस्थानकाचे छत अवघ्या 41 दिवसातच कोसळल्याने जिल्ह्यात या बांधकामात झालेल्या भ्रष्टाचाराची सर्वत्र चर्चा झाली होती. या प्रकाराबद्दल स्वतः सुधीर मुनगंटीवार यांनी कंत्राटदाराला कानपीचक्या दिल्या होत्या मात्र यानंतरच सुद्धा पुन्हा तिसऱ्यांदा स्मार्ट बसस्थानकाचे छत कोसळल्याने आता मात्र सुधीर मुनगंटीवार काय उत्तर देईल या बद्दल जनतेत उत्सुकता आहे. सुधीरभाऊ यांनी बल्लारपूर मूल आणि पोंभूर्णा या आपल्या विधानसभा मतदार संघात कोट्यावधी रुपयाची विकासकामे केली ती जर या बसस्थानकासारखीच असेल तर या मतदारसंघातील जनता सुधीरभाऊला असेच बल्लारपूर बसस्थानकाप्रमाणे या विधानसभा निवडणुकीत जनता
तिसऱ्या वेळी पाडतील का ? असा प्रश्न आता जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे ……..