You are here
Home > कृषि व बाजार > सेवानिवृत्त सेनाधिकाऱ्यानीं दिले सैन्य भरतीची धडे!

सेवानिवृत्त सेनाधिकाऱ्यानीं दिले सैन्य भरतीची धडे!

..चंद्रपूर जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच सैन्य दलातील सेवा संधी याविषयी मार्गदर्शनाच्या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि विजयपथ नागपूर यांच्या सयुक्त विद्यमाने चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक च्या कन्नमवार सभाग्रुहात आयोजित करण्यात आले..या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा महेश पानसे पूर्व विदर्भ अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांनी भूषविले तर उद्घाटक म्हणून चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक चे अध्यक्ष मनोहर पाऊणकर यांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमात देशातील सैन्य दलात विशेषता स्थलसेना.वायूसेना तथा जलसेना मधे अधिकारी पदावर जाण्यासाठी काय करावे लागेल.त्यांचा अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण कसे करायचे या बाबत क्रीडा भारती संचालित विजयपथ या संस्थे तर्फे पंजाब रेजिमेंट कमांडो फोर्सचे सेवानिवृत्त कर्नल शिरीष मुजुमदार.एएसई मधे कार्य केलेले सेवानिवृत्त कर्नल अविनाश मुळे एअरफोर्स मधे तब्बल 32 वर्ष सेवा दिलेले व सन 1971 च्या बांगलादेश फाळणीच्या युद्धात सक्रिय सहभाग घेतलेले ग्रुप कैप्टण सुभाष पागे यांनी यथोचित मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू कुकडे व अंजली मानकर यांनी संयुक्तपणे केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासंदर्भात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष सुनील बोकडे. कार्याध्यक्ष जितेंद्र चोरडिया. आकाश भालेराव. अनिल अम्बाडेरे. जयपाल गेडाम. रोहित तुराणकर.उमेश तपासे आणि महेश पानसे यांनी परिश्रम केले. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील संघाचे पदाधिकारी प्रदीप रामटेके. मुन्ना खेडेकर. प्रा. राजेश राजूरकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या मार्गदर्शकाचे मार्गदर्शन ऐकण्याकरिता विद्यार्थी व युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा