You are here
Home > कृषि व बाजार > जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी येथे जागतिक तंबाखू निषेध दिनानिमित्य प्रबोधन

जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी येथे जागतिक तंबाखू निषेध दिनानिमित्य प्रबोधन


कोरपना – अल्ट्राटेक सिमेंट वेलफेयर फाउंडेशन आवारपूरच्या वतीने जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी येथे जागतिक तंबाखू निषेध दिनानिमित्त प्रबोधनपर कार्यक्रम नुकताच पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बिबी ग्रामपंचायतीचे उपसरपंच आशिष देरकर उपस्थित होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. गरिमा तांबेकर उपस्थित होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शंकर आस्वले, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष नामदेव ढवस, आनंद पावडे, रामदास देरकर, दादाजी कन्नाके, नथू काकडे आदी, विलास राजुरकर, अरुण ढवस आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. गरिमा तांबेकर यांनी प्रोजेक्टरच्या माध्यमातून गावकऱ्यांना तंबाखूमुळे होणाऱ्या विविध आजारांची माहिती दिली. तंबाखू गुटखा, सिगारेट यापासून प्रत्येकांनी दूर राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी गावातील शेकडो महिला व पुरुषांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता डॉ. संजय ठाकरे, देविदास मांदाळे, सचिन गोवरदिपे, शबनम शेख, सुनील कुरसंगे, अनिल मारटकर, अनिल आत्राम, रामकिसन कुळमेथे, आनंद कनकुटला, जयमाला येटे, यांच्यासह गावकर्यांनी सहकार्य केले.

admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा