You are here
Home > कृषि व बाजार > बिबी येथे विधी साक्षरता शिबिर अनेक मान्यवरांची उपस्थिती

बिबी येथे विधी साक्षरता शिबिर अनेक मान्यवरांची उपस्थिती

कोरपना :- जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी येथे ग्रामपंचायत बिबीच्या वतीने विधी साक्षरता शिबीराचे आयोजन नुकतेच पार पडले.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून राजुरा येथील दिवानी न्यायाधीश एम. के. सोरते, अधिवक्ता एस.बी. मुसळेे,अधिवक्ता पवन मोहीतकर यांची प्रमुख उपस्थिती होती. न्यायधीश सोरते यांनी दखलपात्र व अदखलपात्र गुन्ह्यांसंदर्भात माहीती दिली. तसेच महसुली व फौजदारी विविध कायद्यांची माहिती देऊन ग्रामवासीयांना मार्गदर्शन केले. तसेच ग्राहक स्वंरक्षण कायद्यासंदर्भात अधिवक्ता मुसळे यांनी मार्गदर्शन केले. अधिवक्ता मोहीतकर यांनी जेष्ठ नागरीक कायद्यासंदर्भातील अधिकाराची माहीती दिली. याप्रसंगी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शंकर आस्वले, पोलीस पाटील राहुल आसुटकर, रामदास देरकर, नामदेव ढवस, आंनदराव पावडे, श्रावन चौकै, रशीद शेख, देवराव कोडापे, यासह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.
विधी साक्षरता शिबिराचे सुत्र संचालन रामकिसन कुळमेथे यांनी केले. प्रास्ताविक राहुल आसुटकर यांनी केले तर आभार सुरज लेडांगे यांनी मानले. शिबिराच्या यशस्वितेकरिता सुनिल कुरसंगे, अनिल मारटकर, अनिल आत्राम, रामकिसन कुळमेथे, आनंद कनकुटला, जयमाला येटे, यांच्यासह गावकर्यांनी सहकार्य केले.

admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा