You are here
Home > कृषि व बाजार > उमरी तालुक्यात चक्रीवादळामुळे शेतीचे नुकसान; पंचनामे करून नागरी सुविधा तातडीने पूरवा माजी आ.बापुसाहेब देशमुख गोरठेकर यांची मागणी

उमरी तालुक्यात चक्रीवादळामुळे शेतीचे नुकसान; पंचनामे करून नागरी सुविधा तातडीने पूरवा माजी आ.बापुसाहेब देशमुख गोरठेकर यांची मागणी

नांदेड/प्रतिनिधी
उमरी तालुक्यामध्ये दि. 4 जून रोजी वादळी वार्‍यासह पाऊस होवून चक्रीवादळाच्या या तडाख्याने शेतीचे, जनावरे आणि नागरिकांच्या जिवनमानावर मोठा परिणाम झालेला आहे. अनेक नागरिक जखमी झालेले आहेत. प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेवून तालुक्यामध्ये तातडीने पंचनामे करून जनतेला मूलभूत सुविधा पुरवाव्यत अशी मागणी नांदेड जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष माजी आ.बापुसाहेब देशमुख गोरठेकर यांनी जिल्हाधिकार्‍यांना देवून केली आहे.
उमरी तालुक्यामध्ये 4 जून रोजी सायंकाळी 7.20 च्या सुमारास चक्रीवादळाचा तडाखा बसला. त्यामुळे बहुतांश गावातील फळबागा व शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या भयंकर चक्रीवादळामुळे गावातील लोकांच्या घरावरील पत्रे उडून गेली. शेकडो लोक या घटनेत जखमी झाले आहेत. उमरी व नांदेड रूग्णालयात रूग्णांवर उपचार चालू आहेत. या रूग्णांना तातडीने आर्थिक मदत करण्याची गरज आहे. तसेच अनेक जनावरे मृत्यूमुखी पडलेले आहेत. शेतकर्‍यांचा जोडधंदा म्हणून ओळखल्या जाणार्‍या पोयट्री फोर्मचे मोठे नुकसान झाले आहे. उमरी शहरातील व ग्रामीण भागातील जवळपास शंभर गावामध्ये विद्युत पुरवठा पोल पडल्यामुळे खंडित आहे. दोन दिवसापासून येथील समस्यांचा सामना करीत आहे. मागील 50 वर्षातील सर्वाधिक भयंकर चक्रीवादळ होते. त्यामुळे शासनाने युद्ध पातळीवर अपाद ग्रस्तांना त्वरीत मदत द्यावी. विद्युत पुरवठा सुरळीत करावा, सर्व बाबींची गांभीर्याची चौकशी करावी, नुकसान ग्रस्तांना न्याय द्यावा अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनामध्ये जिल्हाध्यक्ष गोरठेकर यांनी केली आहे.

admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा