You are here
Home > कृषि व बाजार > मी मराठी एकीकरण समितीचा अभिनय उपक्रम. मराठी उद्योजकता दिवस 20 जूनला !

मी मराठी एकीकरण समितीचा अभिनय उपक्रम. मराठी उद्योजकता दिवस 20 जूनला !

मी मराठी एकीकरण समिती, हि एक बिगर राजकीय चळवळ गेली पाच वर्षे, अध्यक्ष भारतकुमार राऊत आणि कार्याध्यक्ष प्रमोद मसुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली, मराठी संस्कृती जतन, मराठी भाषा संवर्धन आणि संरक्षण, व्यवसाय मार्गदर्शन व रोजगार निर्मिती हि चार उद्दिष्ट्ये समोर ठेवून काम करीत आहे. संघटनेने मराठी भाषा ह्या विषयावर काम करताना कायद्याच्या माध्यमातून त्याला न्याय मिळवून देत मुंबईसह महाराष्ट्राच्या मराठी जनमानसात आपली सुदृढ प्रतिमा उभी केली आहे. यानंतर आता संघटनेने मराठी व्यावसायिकतेला आणि उद्योजकतेला एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी आपले महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.मराठी साहित्य, संस्कृती व कला मंडळ, हि वाशी येथील गेली ४० वर्षे जुनी संस्था, तिच्या स्थापनेपासूनच नवी मुंबईतील सांस्कृतिक चळवळीचे मुख्य केंद्र बनली आहे. संस्थेचे अध्यक्ष श्री सुभाष कुलकर्णी आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या उत्कृष्ट नियोजनाच्या बळावर वर्षभरात ५२आठवड्यात तब्ब्ल ५० उपक्रम राबवून संस्थेने एक आगळा वेगळा विक्रमच रचला आहे. आता हि संस्था सुद्धा मराठी समाजात उद्योजकतेचा संस्कार रुजवण्यासाठी सज्ज झाली आहे.महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील उद्योग क्षेत्रात उद्योगमहर्षी म्हणून ज्यांची गणना होते असे महाराष्ट्राचे आद्य उद्योगपुरुष आणि किर्लोस्करवाडी ह्या महाराष्ट्रातील पहिल्या औद्योगिक वसाहतीचे जनक कै. लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर यांची येत्या २० जून २०१९ रोजी शतकोत्तर सुवर्णजयंती आहे. याच दिवसाचे औचित्य साधून मी मराठी एकीकरण समिती आणि मराठी साहित्य, संस्कृती व कला मंडळ, ह्या दोन्ही संस्थांनी संयुक्त विद्यमाने “मराठी उद्योजकता दिवस” म्हणून साजरा करून मराठी समाजाला एक नवीन संकल्पना आणि मराठी उद्योजकतेला एक नवीन परिमाण प्राप्त करून देण्याचे ठरवले आहे. “या दिवशी मराठी समाजात उद्योजकतेचे बीज पेरणाऱ्या काही मराठी व्यावसायिक संस्थांचा गौरव केला जाणार आहे आणि त्यांचे बहुमूल्य मार्गदर्शन आपल्याला प्राप्त होणार आहे.तरी मराठी उद्योग जगतामध्ये एक नवीन पायंडा निर्माण करणाऱ्या ह्या कार्यक्रमाला आपण सर्वानी उपस्थित रहावे. *उद्योगमहर्षी कै लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या जीवनप्रवासातून व सन्माननीय संस्थांच्या प्रमुखांच्या मार्गदर्शनातून प्रेरणा घेऊन आपण सर्वांनीही उद्योजकतेची कास धरावी आणि मराठी समाजाला एक वेगळी ओळख प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्नशील रहावे असे आयोजकांनी आव्हान केले आहे. प्रवेश विनामूल्य – पुढील काही जागा राखीव.कृपया ज्या उद्योजकांना ह्या कार्यक्रमात सहभागी व्हायचे असेल त्यांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.*सन्माननीय संस्था पुढील प्रमाणे:*
* सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट,
* मराठी व्यावसायिक उद्योजक व
व्यापारी मित्र मंडळ,
* अर्थसंकेत
* महाराष्ट्र बिझिनेस क्लब,
* आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान *आपले स्नेहांकित,*
मी मराठी एकीकरण समिती,
मराठी साहित्य, संस्कृती व कला मंडळ.
श्री. उमेश थोरात – ९८६७७१०१२३
श्री. निलेश पालेकर – ९३२१५४५४९०
श्री. मंदार नार्वेकर – ९६१९२७७४४६ यांचेशी संपर्क साधावा.*दिनांक आणि वेळ :*
गुरुवार, २० जून २०१९,
सायं: ५ ते रात्रौ ८
प्रवेश ४:३० वाजल्यापासून

\

*स्थळ :*
साहित्य मंदिर सभागृह,
मराठी साहित्य, संस्कृती व कला मंडळ,
एनबीएसए जवळ, एमजीएम हॉस्पिटल मार्ग,
सेक्टर ६, वाशी, नवी मुंबई.

admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा