You are here
Home > कृषि व बाजार > APEC या कर्मचारी संघटनेचा सामाजिक उपक्रम! गरीब हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती!

APEC या कर्मचारी संघटनेचा सामाजिक उपक्रम! गरीब हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती!

Association of progressive Employees, Chandrapur (APEC) या सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या

चंद्रपूर जिल्ह्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची एक संघटना आहे. समाजसेवेच्या उदात्त भावनेतून काही सहकारी व मित्र एकत्र येऊन समाज उपयोगी, समाजाची विविध गरज ओळखून, निःस्वार्थ गरजवंतांसाठी विविध कार्यक्रम समाजात राबविण्याकरिता या संघटनेचा जन्म झाला. ज्या मातीत, माणसात जन्मलो त्या मातीला, माणसाला आमचे देणे लागते याची जाण आणि भान ठेवणणाऱ्या कर्मचाऱ्यांची ही संघटना आहे.

डॉ बाबासाहेब अम्बेडकर म्हणतात, “Cultivation of mind should be the ultimate aim of human existence”. भारत देश 1947 ला स्वतंत्र झाला पण अजूनही 72 वर्षांच्या स्वातंत्र्या नंतर भारतीय समाजात अज्ञान, अंधश्रद्धा, आणि आर्थिक विषमता फार मोठी आहे. बरेच विद्यार्थी अभ्यासात अत्यंत हुशार असुनही, आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत. ही समाजातील उणिव APEC या समाजसेवी संघटनेने लक्षात घेऊन अभ्यासात अत्यंत हुशार पण आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सत्र 2019-20 करिता शिष्यवृत्ति देण्याचे ठरविलेले आहे. SC, ST, OBC आणि MINORITY प्रवर्गातील खलील पात्रता पूर्ण करणाऱ्या विद्यार्थांनी दिनांक 27/06/2019 पर्यन्त आपले आवेदन पत्र संघटनेला सादर करावे. आलेल्या आवेदन पत्रातून 20 विद्यार्थांची रुपये 5000/- प्रति वर्ष शिष्यवृत्ती करीत निवड केली जाईल.

या वर्षी ही शिष्यवृत्ती शाहू महाराज जयंती निमित्य दिनांक 30 जून 2019 वेळ:दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत . VENUE:दादासाहेब कन्नमवार सभागृह CDCC बैंकच्यावर, होटेल VEG जंक्शन जवळ,वरोरा नाका, नागपुर रोड, चंद्रपुर येथे देण्यात येईल.

विधार्थाची शिष्यवृत्तीकरीत पात्रता:
सत्र 2018-19 मध्ये मिळविलेल्या गुणानुसार.

1. 10 वी 12 वी त 75% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविणारे सर्व शाखेतील विद्यार्थी.
2. पदवी 60% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविणारे सर्व शाखेतील विद्यार्थी.
3. विद्यार्थांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न 150000 पेक्षा जास्त नसावे.
4. विद्यार्थी BPL चा असेल तर प्राधान्य दिले जाईल.
5. आई किंवा वडील हयात नसलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल.
6. अत्यंत गरीब आणि गंभीर परिस्तिथी असेल तर विद्यार्थाला वरील 10 वी 12 वी 75% व पदवीला 60% ची अट शिथिल केली जाईल.
7. शिष्यवृत्ती फक्त चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना देण्यात येईल.
8. शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थांची निवड निर्णय निवड समितीचा अंतिम राहील

सादर करावयाचे छायांकित कागदपत्रे.
1. पूर्ण भरलेले आवेदन पत्र
2. 10 वी 12 वी किंवा पदवी ची मार्कशीट
3. टी सी
4. जातीचे प्रमाणपत्र
5. उत्पन्नाचे प्रमाणपत्र
6. आधार कार्ड
7.BPL असल्याचा पुरावा:पिवळे . रेशन कार्ड कींव BPL प्रमाणपत्र
8. आई वडील हयात नासल्यास त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र
9. बँक पासबुक पहिल्या पानांची xerox
10. आवेदन पत्रावर पासपोर्ट साईझ 1 फोटो

आवेदन पत्र pdf फॉरमॅट मध्ये APEC शिष्यवृत्ती सूचना/नोटीस सोबत आहे. कृपया याची कोणत्याही xerox center वर प्रिंट घेऊ शकता.आवेदन पत्र खालील email किंवा प्रत्यक्ष व्यक्तीकडे सादर करावे :

1. डॉ. संजय बाबाजी उराडे
इंग्रजी विभाग
सरदार पटेल महाविद्यालय
चंद्रपूर
प्रत्यक्ष भेटण्याची वेळ: सकाळी 10. 00 ते दुपारी 3.00
मो न : 09673547435
sanjayurade29@gmail.com

2. डॉ नागसेन शंभरकर
वाणिज्य विभाग
सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर
प्रत्यक्ष भेटण्याची वेळ: सकाळी 10.00 ते दुपारी 3.00
मो न 09850145238
email: nagsenshambharkar@rediffmail.com

3. आयु अमित चहांदे
फॉरेस्ट कॉलनी, रामबाग, चंद्रपुर
प्रत्यक्ष भेटण्याची वेळ : सकाळी 8.00 ते 10. 00
सांध्यकाळी 6.00 ते 8.00
मो न : 07775086680
email: chahandeamit24@gmail.com

4. आयुष्यमती सुनीता अडबले
जगन्नाथबाबा नगर, श्रीकृपा कॉलनी, दाताळा रोड, चंद्रपुर
प्रत्यक्ष भेटण्याची वेळ: दुपारी 12.00 ते 3.00
मो नं: 09588628961
Email: nituvadbale@gmail.com

सर्व APEC सभासद

admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा