You are here
Home > कृषि व बाजार > जिल्ह्यातील अनधिकृत शाळा बंद करा. अन्यथा मनसे करणार खळखट्ट्याक आंदोलन!

जिल्ह्यातील अनधिकृत शाळा बंद करा. अन्यथा मनसे करणार खळखट्ट्याक आंदोलन!

जिल्ह्यातील अनधिकृत शाळा बंद करा. अन्यथा मनसे करणार खळखट्ट्याक आंदोलन …..गेल्या अनेक वर्षापासून अनधिकृतपणे इंग्रजी माध्यमाच्या शाळा शिक्षण विभागाची मान्यता न घेता अनधिकृतपणे सुरू आहे. त्या शाळा बंद करण्यात याव्या व त्या संस्था चालकांवर दंडात्मक कारवाई सोबतच त्यांचेवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी मनसेतर्फे मागील दोन वर्षापासून सतत केल्या जात आहे.मात्र शिक्षण विभाग याकडे डोळेझाक करून व काही भ्रष्ट अधिकाऱ्यांचा अनधिकृत शाळा संचालकांना छुपा पाठिंबा यामुळे अशा अनधिकृत शाळा राजरोसपणे सुरू आहे. परंतु येणाऱ्या शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य खराब होऊ नये याकरिता या अनधिकृत शाळा कायमच्या बंद व्हाव्यात यासाठी मनसेचे राजू कुकडे यांच्या नेत्रुत्वात 18 जून 2019 ला जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन घेतल्याने शिक्षणाधिकारी लोखंडे यांनी जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी यांना आदेश पत्र देऊन अनधिकृत शाळा संचालकांवर 1 लाख रुपयाचा दंड आकारणी व तरीही शाळा सुरू ठेवल्यास दररोज 10 हज़ार रुपये दंड आणि फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले मात्र दिनांक 26 जूनला जिल्ह्यातील शाळा शाळा सुरू झाल्या असून चंद्रपूर शहरातील विठ्ठल मंदिर वार्ड येथील शांती निकेतन.नाईस इंग्रजी कॉन्व्हेट चंद्रपूर. चिंचाळा येथील डिलाईट कॉन्व्हेंट.कोरपना तालुक्यातील ग्लोबल माऊंट पब्लिक स्कूल.गोल्डन क्रिडस अकैदमी स्कूल. विद्या निकेतन कॉन्व्हेंट पारडी.इमिनस इंटरनेशनल स्कूल.श्री शिवाजी इंग्लिश स्कूल वणसडी. गोल्डन क्रिडस कॉन्व्हेंट गडचांदुर. राज इंग्लिश मिडीयम स्कूल गडचांदुर. पोंभूर्णा पब्लिक स्कूल.के.जी. एन. पब्लिक स्कूल बल्लारपूर. शरद विद्या मंदिर ब्रम्हपुरी.इत्यादी शाळा बंद करून त्या अनधिकृत शाळा संचालकांवर विद्यार्थी आणि पालकांच्या फसवणूकी प्रकरणी गुन्हे दाखल करावे अन्यथा मनसे अशा अनधिकृत शाळा संचालकांविरोधात खळखट्याक आंदोलन करेल असा इशारा मनसेचे राजू कुकडे यांनी दिला आहे मात्र या अनधिकृत शाळा खरच शिक्षण विभाग बंद करेल का ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे ..

admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा