You are here
Home > नागपूर > नागपूर महानगर क्षेत्रातील ६ तालुक्यात १८६६ घरकुले मंजूर

नागपूर महानगर क्षेत्रातील ६ तालुक्यात १८६६ घरकुले मंजूर

३० चौ.मी. जागेवर बांधकाम करण्यासाठी लाभार्थ्यांना ३ टप्प्यात मिळणार २,५०,००० रु. अनुदान
नागपूर : प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत नागपूर महानगर क्षेत्रातील ९ तालुक्यापैकी मौदा, कामठी, नागपूर (ग्रामिण), उमरेड, कुही व हिंगणा या ६ तालुक्यात १८६६ घरकुले घटक ४ अंतर्गत केंद्र व राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आलेली आहेत. हि घरे ३०. ०० चौ. मी. म्हणजे सुमारे ३३० चौ. फुट या आकाराचे असतील व लाभार्थ्यांना स्वतः च ही घरे बांधावयाची आहेत. यासाठी लाभार्थ्यांना ३ टप्प्यात एकूण रु. २ लाख ५० हजार एवढे अनुदान राज्य व केंद्र शासनाकडून उपलब्ध करून दिले जाणार आहे. 

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली असून, पात्र लाभार्थ्यांच्या प्रस्तावित घरकुलांच्या जागेचे प्रत्यक्ष स्थळ निरीक्षण व पंचनामा तयार करावयाचे काम प्रगतीपथावर आहे. मंजूर एकूण १८६६ घरकुलांपैकी पैकी सुमारे ४०० घरकुलांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. 

प्रधानमंत्री आवास योजना घटक ४ अंतर्गत लाभार्थ्यांना आपल्या घराचे बांधकाम स्वतः करावयाचे असल्याने यासाठी बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ चे कलम ५२ नुसार संभंधित ग्रामपंचायतीस आहेत. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल मंजूर करण्यात आलेल्या लाभार्थ्यांने ग्रामपंचायत हद्दीतील (गावठाण ) जागेवर घरकुलांचे बांधकाम करण्यासाठी लाभार्थ्यांनी रीतसर संभंधित ग्रामपंचायतीची परवानगी प्राप्त करून घावी. संबंधित लाभार्थ्याने ग्रामपंचायतीकडे अर्ज सादर केल्यानंतर त्यास संबंधित ग्रामपंचायती कडून रीतसर बांधकाम परवानगी प्रदान करण्यात येईल. या बाबत नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण जिल्हा परिषद, नागपूर व सर्व संबंधित गट विकास अधिकारी यांना तशी विनंती केली आहे.

admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा