भारतीय पोस्टल विभागामार्फत ढाई अखर पत्रलेखन स्पर्धा
चंद्रपूर, दि. 7 ऑगस्ट: गेल्या दोन वर्षाप्रमाणे यावर्षी सुध्दा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर वार्षिक पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेचा विषय प्रिय बापू..आपण अमर है… हा असून पत्र पाठवण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर 2019 आहे.
या स्पर्धेची दोन गटात विभागणी केली असून 18 वर्षाखालील आणि 18 वर्षावरील असे गट पाडण्यात आले आहे. या प्रत्येक गटातील आंतरदेशीय पत्राला 500 शब्दांची अट तर बंद लिफाफातील पत्राला 1000 शब्दांची अट दिलेली आहे. या स्पर्धेसाठी भाग घेण्याकरिता 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत लिखित पत्र स्थानिक पोस्ट विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या नावे पाठवायचे आहे. पत्रासोबत वयाचा दाखला सादर करावा लागेल.
स्पर्धेचे मूल्यांकन क्षेत्रीय स्तरावरील समिती मार्फत केल्या जाईल. 31 जानेवारी 2020 पर्यंत क्षेत्रीय स्तरावर निवड केलेल्या तीन स्पर्धकांची निवड केल्या जाईल व बक्षिस दिल्या जाईल. या तीनही स्पर्धकांची पत्रे राष्ट्रीय स्तरावर मूल्यांकनासाठी पाठवली जाईल. यातून तीन स्पर्धकांची निवड करण्यात येईल. स्पर्धेचा अंतिम निकाल 31 मार्च 2020 ला प्रकाशित करण्यात येईल. या स्पर्धेतील बक्षीस क्षेत्रीय स्तरावर प्रथम आल्यास 25 हजार, द्वितीय 10 हजार, तृतीय 5 हजार तर राष्ट्रीय स्तरावर प्रथम पारितोषिक 50 हजार, द्वितीय 25 हजार, तृतीय 10 हजार अशी परितोषिकांची विभागणी करण्यात आली आहे. यानुसार विजेत्यांना बक्षिसे प्रदान केल्या जातील.
तरी महात्मा गांधींना आदरांजली वाहण्यासाठी जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पोस्टल विभागामार्फत करण्यात आले आहे.