आता बल्लारपूर येथील जयसूख यांच्या गोडाऊन वर कधी पडणार धाड ? जनतेची इच्छा. चंद्रपूर प्रतिनिधी :- चंद्रपूर जिल्ह्यात वसिम अख्तर व जयसूख ह्या जोडगोळीने कोरोना संक्रमणच्या काळात कोट्यावधी रुपयाचा सुगंधीत तंबाखू व घुटका विक्री करून कोट्यावधी रुपयाचा नफा कमावला तर दुसरीकडे आजपर्यंत अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील अधिकारी यांच्यासोबत त्यांची अंतर्गत सेट्टिंग असल्याची चर्चा होती, मात्र दिनांक 03/12/2020 रोजी वसीम अख्तर झिमरी यांच्या गोडाऊन प्लॉट नं. ई-69, दाताळा येथे अन्न व औषध प्रशासनाच्या विशेष पथकाद्वारे 8 लाख 25 हजार 800 रुपये किंमतीचा प्रतिबंधित पानमसाला जप्त करुन तो ताब्यात घेतला असल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे 1 एप्रिल 2020 ते 31 ऑक्टोंबर या कालावधीत एकुण कारवाईत 58 लाख 48 हजार 388 रूपये किमतीचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आलेला आहे. वसिम अख्तर यांच्या
Author: Raju Kukade
धक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ ?
वरोरा येथे उपजिल्हा रुग्णालयात उपचारांदरम्यान डॉक्टरांनी केले मृत घोषित, वरोरा प्रतिनिधी :- अख्ख्या जगात प्रशिद्ध असलेल्या स्वर्गीय बाबा आमटे यांच्या आनंदवन येथे येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे यांनी विष घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली असून वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले असल्याची विश्वसनीय माहिती आहे. डॉ. शितल आमटे या आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळाच्या सदस्य होत्या. तसंच, शीतल आमटे- करजगी ह्या काही दिवसांपासून मानसिक ताणावात होत्या अशी माहिती असून या घटनेमागे राजकीय छडयंत्र तर नाही ना ? राजकीय छडयंत्रांच्या त्या बळी तर गेल्या नाही ना ? असे प्रश्न वरोरा शहरात चर्चील्या जात आहे. शितल आमटे यांची मानसिक स्थिती का बिघडली ? त्यामागे काय गुपित आहे
धक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण ?
कोरपना पोलीस स्टेशन येथे विजय बावणे सह इतरांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल, कोरपना प्रतिनिधी :- सत्ता आली की माणसाला कसा माज येतो हे चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच चर्चेची बाब राहिली आहे, कारण जिथे सत्ता तिथे सर्वकाही मैनेज होतं आणि म्हणूनच आम्हच कोण काय बिघडवत ते पाहून घेतो या तोऱ्यात सत्ताधारी वागत असतात अशीच एक मस्ती चढलेल्या कोरपना येथील CDCC, बँकेचे संचालक व नगरपंचायती स्वीकृत सदस्य विजय बावणे यांनी मोहब्बत खान या पत्रकार प्रतिनिधी असलेल्या व्यक्तीच्या घरात आपल्या समर्थकांसह घुसून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक बाब उघड झाली असून विजय बावणेसह नितीन बावणे, सुनील बावणे, नगरपंचायत चे उपाध्यक्ष मनोहर चेन्न, स्वप्निल गाभणे, पियुष कावळे इत्यादीविरोधात कोरपणा पोलीस स्टेशन येथे विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे , महाराष्ट्र 24 न्यूज चे मोहब्बत खान यांनी नगरपंचायत
धक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस ?
दत्तू कंचर्लावार यांचे जनार्धन मेडीकल मागील जागेचे अतिक्रमण असतांना म्रूतक विजय कंचर्लावार आले कुठून? मनपाचा भ्रष्ट कारभार भाग - २६ चंद्रपूर महानगरपालिकेत महापौर राखी कंचर्लावार यांच्या सेवेत तल्लीन झालेली मनपा प्रशासन व्यवस्था नेमके काय करताहेत हे त्यांना तरी कळत आहे का ? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला आता पडलेला आहे. कारण जिवंत व्यक्तीला सोडून म्रूतक व्यक्तीच्या नावाने नोटीस पाठवून मनपा प्रशासनाने चक्क परलोकात आता नोटीस पाठविण्याची व्यवस्था केली की काय ? असा प्रश्न पडायला लागला आहे. खरं तर सर्वसामान्यांचे शुल्लक अवैध बांधकाम तोडण्यात मनपा प्रशासन जणू आपत्कालात असल्यागत ते बांधकाम तोडतात मग चक्क महापौर राखी कंचर्लावार यांच्या घराचे बांधकाम मंजूर नकाशा नुसार नसतांना व त्यांचे पती संजय कंचर्लावार यांचे साई हेरीटेज व साई सुमन कॉंप्लेक्स हे सुद्धा अनधिकृत बांधकाम असताना ते तोडण्याची हिंमत महानगरपालिका
खळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.
सहाय्यक पोलिस निरीक्षक जितेंद्र बोबडे यांच्या नेत्रुत्वात तब्बल 72 तासांपेक्षा जास्त वेळेपर्यंत दारू माफीयांचा शोधाशोध सुरू . चंद्रपूर प्रतिनिधी :- जिल्ह्यात सर्वत्र दारू माफीयांचा धुमाकूळ सुरू असताना आता जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी आपले खास भरारी पोलिस पथक तयार करून दारू माफीयांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे, त्यातच पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या विधानसभा क्षेत्रात अक्षरशः 72 तासांपासून अवैध दारू तस्करांचा शोधाशोध सुरू आहे. मागील तीन दिवसापासून सहाय्यक पोलिस निरीक्षक जितेंद्र बोबडे यांच्या नेत्रुत्वात खास पोलिस भरारी पथक ब्रम्हपुरी, शिंदेवाही, सावली सोबतच नागभीड चिमूर आणि मूल मधे फिरत असल्याने बाहेरील जिल्ह्यातून कुठलीही दारू इथे आली नाही त्यामुळे एकीकडे दारू शौकीन दुःखी आहे तर दुसरीकडे दारू माफीयांचा शोध भरारी पथक करीत असल्याने सर्वच दारू माफीया हे जणू भूमिगत झाले असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामूळे
मुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .
मनसेचे शहर उपाध्यक्ष मोहसीण सय्यद यांच्यासह इतर मुस्लिम युवकांनी केली होती तक्रार, वरोरा प्रतिनिधी :- सद्ध्या सामाजिक माध्यमांमधे धार्मिक भावना भडकवुण एका विशिष्ट धर्म समुदायाला बदनाम करण्याचे छडयंत्र रचल्या जात आहे, जे सर्वधर्मसमभाव ह्या भारतीय मूळ संकल्पनेला तिलांजली देण्यासारखे आहे. कारण भारतात सर्व धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत असून एकमेकांच्या धार्मिक आणि सामाजिक उपक्रमात सहभागी होतात मात्र राजकीय सुडबुद्धिने काही धर्मांध व्यक्ती धर्मगुरूलाच लक्ष करून सामाजिक माध्यमांमधे त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह व्यक्तव्य व बदनामी करतात अशा धर्मांध व्यक्तींवर कारवाई होणे आवश्यक झाले आहे. अशीच घटना फेसबुक या सामजिक माध्यमांवर घडली असून वरोरा येथील अभी भागडे या व्यक्तींनी दिनांक २२ सप्टेंबरला दुपारी २ वाजून ३६ मिनिटांनी दिल्ली येथील मरकज चे सर्वेसर्वा व मुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात "मौलाना साद का भी ऍन्काउंटर हो" अशा प्रकारची धार्मिक
लक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.
आतापर्यंत 784 बाधितांना सुटी ; 370 बाधितांवर उपचार सुरू चंद्रपूर, दि.18 ऑगस्ट : चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या आता 1165 आहे. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 370 आहे. तर आतापर्यंत सुटी मिळालेले बाधित 784 आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. प्रत्येक गावांमध्ये चाचण्यांची संख्या वाढविण्याचे त्यांनी सांगितले. ऑक्सीमीटर तपासणी वाढविण्यात यावी, असेही निर्देश त्यांनी दिले आहे. जिल्ह्यामध्ये मोठ्याप्रमाणात परस्पर संपर्कातून रुग्ण तयार होत असून लक्षणे वाटणाऱ्या प्रत्येकाची अंटीजन टेस्ट व्हावी यासाठी, अतिरिक्त 30 हजार टेस्टिंग किट मागविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. खासगी दवाखाने चालविणाऱ्या डॉक्टरांनी देखील लक्षणे आढळणाऱ्या सामान्य बाधितांना लगेच चाचणी करण्याचा सल्ला द्यावा, असे आवाहन केले आहे. चंद्रपूर शहरांमध्ये महानगरपालिका क्षेत्रात जटपुरा वार्ड, येथील सरदार वल्लभभाई पटेल शाळा, पंचमुखी हनुमान मंदिराजवळ चाचणी सुरू आहे.
खळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,
मग भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टलच्या बातमीने भीमराव पडोळेसह अनेकांवर कारवाया का झाल्या ? पत्रकारीतेच्या नावाखाली गैंग बनवून सुपारी घेणाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे. भद्रावती प्रतिनिधी :- आजची पत्रकारिता ही अनेक गुंड मवाली, नतभ्रष्ट आणि दलाली करणाऱ्यांची जणू पाठराखण करणारी ठरत आहे की काय? अशीच परिस्थिती काही अपवाद वगळता सगळीकडे दिसत आहे. कारण एखादा अधिकारी बनण्यासाठी जी शैक्षणिक पात्रता लागते ती शैक्षणिक पात्रता पत्रकारितेत आवश्यक राहिली नाही आणि म्हणूनच ज्यांना पत्रकारीतेचे अवाक्षरही कळत नाही ते सुद्धा पत्रकार म्हणून मिरवीत असल्याने पत्रकारिता आता जणू धोक्यात आली आहे. असाच एक किस्सा सद्ध्या भद्रावती येथे गाजत असून एकीकडे भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टल मधे पोलिस हवालदार भीमराव पडोळे यांच्या भ्रष्ट कारणाम्याची मालिका प्रकाशित झाल्याने भांबावलेल्या भीमराव पडोळे यांनी काही भाडोत्री व एका पोर्टलच्या नावावर जमा झालेल्या गैंगच्या माध्यमातून स्वतःची
धक्कादायक :- सावरी बिडकर येथे तपासात गेलेल्या पोलिसांवर दारू माफियांकडून हल्ला.
शेगाव पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या सावरी बिडकर येथील दारू माफियांच्या हल्ल्यात पोलिस हवालदार जखमी ? पोलीस अधीक्षकांनी दखल घेण्याची गरज. वरोरा तालुका प्रतिनिधी :- शेगाव पोलिस स्टेशन हद्दीत सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर बोरकुटे यांच्या नेत्रुत्वात अवैध दारू विक्रेत्यावर एकीकडे वचक निर्माण झाला असताना दुसरीकडे दारू माफीयांनी मात्र पोलिसांनाच लक्ष केल्याने दारू माफीयांकडे एवढे धाडस येते कुठून ? हा गंभीर प्रश्न राजकीय सामजिक वर्तुळात चर्चेचा बनला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक.१८/०८/२०२० सावरी बिडकर येथे शेगाव पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर बोरकुटे व पो.हवा.क्षिरसागर हे दारू विक्री संदर्भात तपासणी करीता सावरी बिडकर येथे गेले असता दारू माफिया संदीप ठवरे, सुधीर ठवरे, सतीराम ठवरे यांनी पोलीस निरीक्षक सुधीर बोरकुटे यांच्यासोबत असलेल्या पो.हवा क्षिरसागर यांच्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली असून सावरी बिडकर या गावामध्ये
अखेर भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टल च्या दणक्याने भ्रष्ट भीमराव पडोळेची बदली,
बोगस पत्रकारांच्या माध्यमातून देवदूत बनलेल्या भीमराव पडोळे यांच्या स्वतःच्या चमकोगिरीने वरिष्ठांनी तत्काळ घेतली दखल, भद्रावती शहरातील पीडित जनतेत व्यक्त होत आहे आनंद. भद्रावती प्रतिनिधी :- भद्रावती पोलिस स्टेशन मधे गेली चार वर्ष गोपनीय विभागात कार्यरत भीमराव पडोळे म्हणजे एक धूर्त, लाचखोरी करणारा आणि जणू आपणच पोलिस स्टेशन चे सर्व्हेसर्वा असल्याच्या तोऱ्यात वावरणारा लबाड पोलिस कर्मचारी म्हणून कुप्रशीद्ध होता, त्यांच्याकडे पोलिस वेरिफिकेशन, कार्यक्रम उपक्रम किंव्हा आंदोलन या विषयी पोलिस परवानगी देण्याचे काम असताना ते अवैध दारू,सट्टापट्टी, जुगार व अवैध रेती व्यावसायिकांना गाठून हप्ताखोरी करीत होते आणि पोलिस स्टेशन मधे दस्तुरखुद्द ठाणेदार यांनाच गूमराह करीत असल्याची बाब समोर आल्याने व अनेक पिडीतांचे फोनवर भीमराव पडोळे यांच्या विरोधात तक्रारी आल्याने भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टल वर बातम्या प्रकाशित करण्यात आल्या मात्र आता आपला असली चेहरा जनतेसमोर