महाविकास आघाडी सरकारच्या कामकाजावर मनसे नजर ! मुंबई :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध प्रश्नांसाठी आणि समाजगटांसाठी विकासात्मक कामे व्हावी व महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर वचक रहावी याकरिता मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शॉडॊ कैबिनेटची निर्मिती करण्यात आली, जर सरकार बरोबर काम करीत नसल्यास सरकारचं वाभाडे जिथे काढायचे आहेत तिथे वाभाडे काढा आणि जिथे सरकार चांगलं काम करेल तिथं त्यांचं अभिनंदन पण करू असे आव्हान या प्रसंगी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी शॉडॊ कैबिनेटच्या सर्व सभासदांना केले आहे. मनसेच्या या शॉडॊ कैबिनेट मुळे महाराष्ट्रच्या राजकारणात जणू भूकंप आला की काय ? अशी स्थिती दिसत आहे. आजपर्यंत मंत्रिमंडळात मंत्री जो करेल ती पूर्व दिशा अशी अवस्था होती मात्र आता त्यावर मनसेचे प्रतिरूप सरकार हे वचक ठेवणार असून कैबिनेट मधे झालेल्या
मुंबई
काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार, केदार, व यशोमती ठाकुर यांच्यात मंत्रिपदाची रस्सीखेच ?
चंद्रपूर प्रतिनिधी:- महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे मंत्रिमंडळात विधानसभेचे हिवाळी अधिवेशना पूर्वी आपली वर्णी लागावी यासाठी काँग्रेसमध्ये जोरदार रस्खीखेच सुरू आहे, ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाच्या विस्तार होणे हिवाळी अधिवेशनात अपेक्षित आहे. खातेवाटपासंदर्भात चर्चा १० डिसेंबरच्या आसपास करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते दिल्लीत तळ ठोकून असतानाच या वेळी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या इच्छुकांनी देखील गर्दी केल्याचे चित्र आहे, विदर्भातील मुलूख मैदानी तोफ आणि आपल्या संघटन कौशल्याने सतत विजयी होण्याचा मान मिळविणारे दिग्गज विजय वडेट्टीवार हे लवकरच शपथ घेणार असल्याचे म्हटले म्हटल्या जात आहे.. तर वडेट्टीवार यांचेनंतर यशोमती ठाकूर अधिवेशनानंतर डिसेंबरच्या आणि सुनील केदार यांच्यासह शेवटच्या आठवड्यात काही आमदार मंत्री होतील अशी चर्चा आहे. आपल्याला मंत्रिमंडळात स्थान मिळावे म्हणून अनेक काँग्रेस आमदार १० जनपथसह जेष्ठ नेत्यांच्या घराभोवती प्रदक्षिणा घालत आहे. विधानसभेचे नागपूर अधिवेशन १६ डिसेंबरपासून सुरू होणार ! तत्पूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार व्हावा, असे काँग्रेसचे मत आहे. तर
फडणवीसानी केली महाराष्ट्रातील जनतेशी गद्दारी,
मुख्यमंत्री पद जाणार या भितीने चार तासात विकास निधी केला केंद्राकडे परत. मुंबई पंचनामा :- २३ नोव्हेंबर रोजी मोठी उलथापालथ होऊन राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मात्र त्यानंतर नाट्यमय घडामोडींना सुरुवात झाली. पण ही शपथ काही उगाच घेतली नव्हती त्या मागं एक खास कारण होतं. आधि बहुमत युतीकडून आल्यावर फडणविस निश्चिंत होते, पण शिवसेनेने फडणवीसाच्या मनसुब्यावर पाणी फेरल आणि शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल अशी रणनिती आखली. मात्र इकडे राज्यात जे विकासकामे चालु होते त्याचा अतिरिक्त निधी संबंधीत खात्यात आधिच पडुन होता. राज्य चालवण्यासाठी हा निधी महत्वपूर्ण होता आणि या निधीला मुख्यमंत्र्याशिवाय कोणिहि खर्च करू शकत नव्हते. त्यामुळेच फडणवीस यांनी मोठी कुटंनीति आखली आखली. आणि सरकारी कामकाजाच्या वेळेत किमान चार ४ तासांत हा संपूर्ण निधि पुन्हा केंद्र
लपून मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे फडणवीस थोड्या दिवसाचे पाहुणे ?
लक्षवेधी :- खरं तर महाराष्ट्रच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी युती आघाडी करून व रात्रीला राजकीय खिचडी पकवून सकाळी सकाळी आठ वाजता मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा आयोजित केला असेल.पण राजकारणात काहीही घडू शकत कारण सत्तेसाठी वाट्टेल त्याला समर्थन करण्याचं तंत्र हे भाजपच जणू शक्तीस्थळ बनलं आहे.काश्मीर मधे मेहबुबा मुक्ती मोहम्मद यांच्या पक्षा सोबत युती करून मूळ भाजपच्या सिद्धांताला यांनी मूठमाती दिली. आणि आता ज्या देवेंद्र फडणवीस यांनी मी आयुष्यात कधीही राष्ट्रवादी सोबत युती करणार नाही अशी भीष्म घोषणा केली होती ती सुद्धा एबीपी माझाच्या सेटवर आणि आता त्याचं राष्ट्रवादी सोबत आघाडी केली म्हणजे भाजपचे सर्वच सिद्धांत नेत्यांनी गुंडाळले का ? आणि आता कट्टर हिंदुत्व किवा स्वाभिमान थोडा तरी शिल्लक राहिलाय का ? असे प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडलेले आहे . महत्वाची
शिवसेनेचे बडे नेते आयकर विभागाच्या ‘रडार’वर ? युती तुटताच BMC च्या कंत्राटदारांवर ‘छापे’
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना आणि भाजपा यांची युती तुटल्यानंतर आता राज्यात राष्ट्रपती राजवट सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर आयकर विभाग सक्रीय झाला असून त्याने मुंबई महापालिकेतील ३७ कंत्राटदारांवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत मुंबई महापालिकेतील कोट्यवधींचा गैरव्यवहार उघड झाला आहे. त्यातून ७३५ कोटी रुपयांचा गैरव्यवहार समोर आला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातूनच शिवसेनेचे अनेक बडे नेते आयकर विभागाच्या रडारवर आले आहेत. या कंत्राटदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर मुंबई महापालिकेशी संबंधित नेत्यांकडे चौकशी केली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मुंबई आणि सुरतमध्ये ६ नोव्हेंबरपासून कंत्राटदारांवर ही कारवाई सुरु असून आतापर्यंत ४४ जागांवर छापे टाकण्यात आले आहेत. त्यात ३७ बडे कंत्राटदार, तसेच राज्यातील काही एन्ट्री ऑपरेटरची कार्यालये व निवासस्थानांची झडती घेण्यात आली आहे. त्यांच्याकडून सुमारे ७३५ कोटी रुपयांच्या बनावट एन्ट्री व
प्रसिद्ध गायिका गीता माळी यांचा अपघाती मृत्यू!
नाशिक वार्ता :- आपल्या सुमधूर आवाजाने मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या नाशिकच्या गायिका गीता माळी (40) यांचा भीषण अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील कार्यक्रम आटोपून मुंबई विमानतळावरून नाशिकला परतताना गीता माळी यांच्या कारला शहापूरजवळ अपघात झाला. यात त्यांचा मृत्यू झाला, तर त्यांचे पती अॅड. विजय माळी यांची प्रकृती गंभीर आहे.गीता माळी या गेल्या दोन महिन्यांपासून अमेरिकेत गायनाचे कार्यक्रम करीत होत्या. आज सकाळीच त्या मायदेशी परतल्या होत्या. एअरपोर्टहून नाशिकला परतत असताना महामार्गावर हा अपघात झाला. गीता माळी यांचे गायनाचे देश विदेशात अनेक कार्यक्रम झाले आहेत. त्यांच्या अपघाती निधनाने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. गीता माळी यांच्या निधनाचे वृत्त समजताच सोशल मीडीयासह मराठी कलाक्षेत्रातील कलाकारांकडून हळहळ व्यक्त करण्यात आली आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार मुंबई- नाशिक महामार्गावर रस्त्यावर आडव्या आलेल्या कुत्र्याला वाचवण्याच्या नादामध्ये गीता यांची
राष्ट्रपती राजवट लागू होणे म्हणजे या नतद्रष्टांनी महाराष्ट्राच्या मतदारांचा केलेला घोर अपमान आहे. राज ठाकरे
मुंबई :- महाराष्ट्रातील राजकीय सत्ता स्थापनेसाठी ज्या भाजप शिवसेना नेत्यांनी मुख्यमंत्री पदाच्या हवासापोटी अस्थिरता निर्माण केली आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुद्धा शिवसेनेचे सरकार आणण्यासाठी जी दिरंगाई केली त्यामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट भाजपच्या गमिनि काव्यातून लावण्यात आली.त्यामुळे मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी यावर पहिली प्रतिक्रिया देतांना "राष्ट्रपती राजवट लागू होणे म्हणजे या नतद्रष्टांनी महाराष्ट्राच्या मतदारांचा केलेला घोर अपमान आहे" असे म्हटले आहे.
भाजप सत्तेत की विरोधात बसणार ? हे ठरणार उद्याच्या कोर कमेटीत!
मुंबई कट्टा :- महाराष्ट्रातील राजकीय सत्ता स्थापनेचा तिढा काही केल्या सुटताना दिसत नाही. एकीकडे भाजप म्हणताहेत की सत्ता महायुतीचीच येईल तर दुसरीकडे शिवसेना मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल अशी आग्रही भूमिका घेत आहेत.जर आता शिवसेनेसमौत आपण झूकलो तर आम्हचाच गेम होईल अशी भिती भाजपला आहे तर भाजपला आपण मुख्यमंत्री पद दिलं तर मागील सन २०१४ च्या विधानसभा सत्तेत असून देखील भाजपने दुय्यम दर्जाचे मंत्री पदे आणि सरकार मधे बरोबरीचा वाटा दिला नसल्याने याही वेळी भाजपवाले आपला गेम करेल म्हणून शिवसेना सुद्धा आपला मुख्यमंत्री पदांवरचा हक्क सोडायला तयार नाही. अशा स्थितीत भाजप शिवसेनेची सत्ता महाराष्ट्रात बनेल का ? याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहे.अशातच महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यास कुणी तरी पुढे याव म्हणून राज्यपालांनी सर्वात मोठी पार्टी म्हणून भाजप ला सत्ता स्थापन करण्याचं निमंत्रण दिलं
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अखेर राजीनामा,
राष्ट्रपती शासन की येईल सेनेचे सरकार ? मुंबईनामा :- महाराष्ट्राच्या राजकारणात आम्हचाच मुख्यमंत्री होईल या शिवसेनेच्या हट्टापाई भाजपचे सत्ता स्थापनेचे स्वप्न पूर्णतः भंग झाले आणि म्हणूनच आम्ही नाही तर कुणीच नाही या भाजप नेत्यांच्या कुटील डावामुळे शेवटी राष्ट्रपती शासन लागणार अशी चर्चा सुरू झाली आहे. यामधे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे काय निर्णय घेतात याकडे महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागले आहे. जर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला तर शरद पवार हे काँग्रेसला सुद्धा सोबत आणेल आणि पहिल्यांदाच महाराष्ट्रात एक अनोखे राजकीय समीकरण निर्माण होईल मी पुनः येईल, मी पुनः येईल असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्याप्रकारे मुख्यमंत्री पदाचे पुन्हा स्वप्न बघितले ते आता इतिहास जमा झाले आहे. आणि शिवसेना आता राष्ट्रवादीला घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करेल की भाजपच्या
शिवसेना अखेर भाजप सोबतच जाणार, मांडवली करिता मुजोरी?
मुंबई :- महाराष्ट्रात शिवसेनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून हिंदुत्ववादी म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणारी भाजप शिवसेना कार्याध्यक्ष आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या लाचारीचा फायदा घेऊन महाराष्ट्रात गमिनी कावा करून सत्तेपर्यन्त पोहचली आणि आम्हीच महाराष्ट्रात मोठे म्हणून शिवसेनेला दुय्यम स्थान दिले. एकेकाळी शिवसेना महाराष्ट्रात १७१ जागी आणि भाजप ११७ जागी विधानसभा लढवायचे पण मागील विधानसभा निवडणुकीत भाजपने खेळी करून शिवसेनेला तोंडघशी पाडले आणि स्वतःचे संख्याबळ वाढवले व मुख्यमंत्री पद मिळविले.आता महाराष्ट्रात शिवसेना लहान भाऊ ठरला आणि भाजप सोबत शिवसेना फरकटत गेली.ज्या महाराष्ट्रात शिवसेनेच्या भरोशावर भाजप मोठी झाली त्याच शिवसेनेला अवघ्या १२४ जागा वाट्याला देवून भाजपने स्वतःच्या वाट्याला उर्वरित जागा घेतल्या आणि १०४ ठिकाणी विजय मिळविला. असे जरी असले तरी आता सत्ता स्थापनेसाठी भाजपची कोंडी करून शिवसेना मुख्यमंत्री पदावर दावा करीत आहे. यामुळे