मनसे जनहित कक्षाचे प्रदेश सरचिटणीस महेश जोशी यांची केंद्रीय रेल्वे मंत्र्याकडे मागणी ! येणा-या काळाची वैद्यकीय गरज तसेच जनतेला अद्यावत वैद्यकिय सुविधा उपलब्ध व्हावी त्याचबरोबर वैद्यकिय शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण घेण्याची संधी प्राप्त व्हावी यासाठी नागपूरात रेल्वेचे एक अद्यावत मध्यवर्ती रुग्णालय व विद्यालय बांधण्यात यावे ह्यासाठी नागपूर शहरात मध्य व दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडे उपलब्ध असलेल्या मुबलक जागेत मध्यवर्ती रेल्वे रुग्णालय बांधण्यात यावे ह्यासाठी पियुष गोयल, केंद्रिय रेल्वे मंत्री, भारत सरकार यांना मनसे जनहित कक्षाचे प्रदेश सरचिटणीस महेश जोशी यांनी मेलद्वारे निवेदन सादर केले ज्याची प्रतिलिपी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी, खासदार व केंद्रिय भूपृष्ठ मंत्री नितिनजी गडकरी, मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे, मनसे महाराष्ट्र सरचिटणीस व जनहित व विधी कक्षाचे अध्यक्ष किशोर शिंदे तसेच महाव्यस्थापक, मध्य व दक्षिण पूर्व मध्य रेल्वे,
विदर्भ
गडचिरोलीत 2 नक्षलवाद्यांचा खात्मा
गडचिरोली: गडचिरोलीत रविवारी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. यामध्ये दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. ग्यारापत्ती येथील नरकसा जंगलाच्या परिसरात रविवारी पहाटे ही चकमक झाली. या परिसरात सी-६० पथकाचे जवान गस्त घालत असताना त्यांचा नक्षलवाद्यांशी सामना झाला. यानंतर दोन्ही बाजूंनी तुफान गोळीबार झाला. यामध्ये दोन नक्षलवादी ठार झाले. तर काही नक्षलवादी जखमीही झाल्याचे वृत्त आहे. यामध्ये सी-६० पथकाच्या हाती मोठा शस्त्रसाठाही सापडल्याचे समजते. पोलीस दलाकडून अधिक कारवाई सुरू आहे.
सुंदर विचार समाजात रुजविण्याच्या कार्यात योग्य समित्यांनी पुढे यावे : ना. सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर दि 14 सप्टेंबर : फिट इंडिया हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे कार्य योग्य चळवळीच कार्य असून तेच कार्य आपण गावागावात पोहोचून सकारात्मक व सुंदर विचार करणाऱ्या समाज निर्मितीच्या कार्यात स्वतःला वाहून घ्यावे, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन, वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले स्थानिक पतंजली योग समितीमार्फत आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. डॉ. शामा प्रसाद मुखर्जी वाचनालयामध्ये आयोजित या कार्यक्रमात योग साधना करणाऱ्या अनेक समित्यांना स्पीकर्सचे वाटप करण्यात आले. यावेळी त्यांनी करो योग रहो निरोग, या वाक्याचा पुनरुच्चार करताना चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ही मोहीम अतिशय प्रभावीपणे राबवून सर्वसामान्य नागरिकांचा मार्ग योग समितीकडे वळवा. हॉस्पिटलच्या मार्गाला त्यांना जाऊ देऊ नका, असे आवाहन देखील
नागपुरात पोलिसांकडून लाच स्वरुपात ३ तरुणींची मागणी
नागपूर : ब्यूटीपार्लर आणि स्पाच्या मालकिणीवर एमपीडीएची कारवाई न करण्यासाठी दोन पोलिसांनी २५ हजार रुपयांच्या लाचेसह शरीर सुखासाठी ३ मुलींची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात मंगळवारी उघडकीस आला. कर्मचारी हे नागपूर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा सेलचे कर्मचारी असून एसीबीने या दोघांना सापळ्यात अडकवून अटक केली. लाच आणि शरीर सुखासाठी मुलींची मागणी करणाऱ्या या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे सहायक उपनिरीक्षक दामोदर राजूरकर (५६) आणि पोलिस हवालदार शीतलाप्रसाद मिश्रा (५१) अशी आहेत. या दोघांविरुद्ध एसीबीकडे तक्रार आली होती. अमरावती मार्गावरील एका ब्यूटीपार्लरवर अनैतिक प्रकारांच्या संशयावरून दोन वर्षांत गुन्हे शाखेने तीनदा छापे घालून कारवाई केली होती. या पार्लरच्या मालकिणीवर एमपीडीएची कारवाई न करण्यासाठी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा शाखेचे कर्मचारी राजूरकर आणि मिश्रा यांनी २५ हजार रुपये आणि शरीर सुखासाठी ३ तरुणींची मागणी केली. एसीबीच्या
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मोठ्या विमान अपघातातून बचावले
नागपूर - नागपुरहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानात तांत्रिक बिघाड आल्यामुळे मंगळवारी सकाळी विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले. या विमानातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी दिल्लीला जात होते. गडकरींसह सर्व प्रवाशांना विमानातून सुखरुप उतरवण्यात आले आहे. प्रवाशांना दिल्लीला जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे. प्राप्त माहितीनुसार इंडिगोच्या 6 ई 636 विमानात गंभीर बिघाड असल्याचे निदर्शनास आल्यावर वैमानिकाने ते रनवेवरून पुन्हा टॉक्सिवे वर आणले. या विमानात 100 पेक्षा अधिक प्रवासी होते.
पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने महा मेट्रोचे आणखी एक पाऊल
महा मेट्रो आणि उर्जा दक्षता सेवा लिमिटेड दरम्यान सामंजस्य करार नागपूर ०८ :* ग्रीन थीम संकल्पनेवर आधारित महा मेट्रो नागपूर प्रकल्पात मेट्रो स्टेशनवर सोलर पॅनल लावण्यात आले आहे. नागपूर मेट्रो स्टेशन वर आता पर्यत ९६५ सोलर पॅनल लावण्यात आले आहे तसेच ६५% उर्जा ही सौर उर्जा प्रकल्पातून घेण्याचा महा मेट्रोचा मानस आहे. आज पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने महा मेट्रोने आणखी एक पाऊल घेत उर्जा दक्षता सेवा लिमिटेड(Energy Efficiency Service Limited) या भारत सरकार,उर्जा मंत्रालयाच्या संयुक्त उपक्रम असलेल्या कंपनी सोबत सामंजस्य करार करण्यात आला. महा मेट्रोचे कार्यकारी संचालक (प्रोक्यूरमेट विभाग) श्री. आनंद कुमार आणि उर्जा दक्षता सेवा लिमिटेड विभागाचे (पूर्व महाराष्ट्र) प्रादेशिक प्रमुख श्री. किशोर चव्हाण यांनी या सामंजस्य करारवर संचालक (रोलिंग स्टॉक) श्री.सुनील माथुर,संचालक(प्रकल्प) श्री.महेश कुमार,संचालक(वित्त) यांच्या प्रमुख उपस्थितीत हस्तांक्षर केले. महा मेट्रोचे
नागपूर महानगर क्षेत्रातील ६ तालुक्यात १८६६ घरकुले मंजूर
३० चौ.मी. जागेवर बांधकाम करण्यासाठी लाभार्थ्यांना ३ टप्प्यात मिळणार २,५०,००० रु. अनुदाननागपूर : प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत नागपूर महानगर क्षेत्रातील ९ तालुक्यापैकी मौदा, कामठी, नागपूर (ग्रामिण), उमरेड, कुही व हिंगणा या ६ तालुक्यात १८६६ घरकुले घटक ४ अंतर्गत केंद्र व राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आलेली आहेत. हि घरे ३०. ०० चौ. मी. म्हणजे सुमारे ३३० चौ. फुट या आकाराचे असतील व लाभार्थ्यांना स्वतः च ही घरे बांधावयाची आहेत. यासाठी लाभार्थ्यांना ३ टप्प्यात एकूण रु. २ लाख ५० हजार एवढे अनुदान राज्य व केंद्र शासनाकडून उपलब्ध करून दिले जाणार आहे. नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली असून, पात्र लाभार्थ्यांच्या प्रस्तावित घरकुलांच्या जागेचे प्रत्यक्ष स्थळ निरीक्षण व पंचनामा तयार करावयाचे काम प्रगतीपथावर आहे. मंजूर एकूण १८६६ घरकुलांपैकी पैकी सुमारे
सलग दुसऱ्यादिवशी नासुप्र’ची अतिक्रमण कारवाई
नागपूर २६: मौजा लेंड्रा येथील नागपूर सुधार प्रन्यासच्या उत्तर अंबाझरी मार्गावरील २.९४ एकर सार्वजनिक उपयोगाच्या जागेवरील ०.५ एकर जागेचा ताबा मा. सर्वोच्च न्यायालयाचे अपील प्रकरण (सी) २७००१/-२७००२/२०१४ मधील दिनांक १८/०२/२०१९ चे आदेशान्वये दिनांक २५/०३/२०१९ रोजी नागपूर सुधार प्रन्यासतर्फे घेण्यात आला. सदर २.९४ एकर जागा मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड ला हस्तांतरित करावयाची असल्यामुळे ०.५ एकर जागेवर अस्तित्वात असलेले श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे अतिक्रमण काढण्याची कार्यवाही आज सलग दुसऱ्यादिवशी देखील करण्यात आली. सदर कार्यवाही दरम्यान विभागीय अधिकारी (पश्चिम) श्री अविनाश बडगे, सहाय्यक अभियंता श्रेणी-२ श्रीमती पुष्पा शहारे, स्थापत्य अभि सहाय्यक श्रीमती रूपा सोनाये, क्षतिपथक प्रमुख श्री.मनोहर पाटील उपस्थित होते
पेटत्या चितेमध्ये उडी घेऊन आत्महत्या
नागपूर- पेटत्या चितेमध्ये उडी घेऊन एका मनोरुग्ण तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशन आवारात हा प्रकार घडला आहे. शनिवारी संध्याकाऴी सहाच्या सुमारास महेश मारुती कोटांगले या 32 वर्षीय तरुणाने चितेमध्ये उडी मारली. जायताला येथील आंबेडकर नगरामध्ये महेश राहत होता. तो मजुर करत होता. गेल्या तीन वर्षांपासून त्याच्या मनावर परिणाम झाला होता. एका मयत व्यक्तीचे नातेवाईक मृतदेहाला अग्नी देऊन परतत होते. यावेळी परिसरातच खेळणारी मुले ओरडत बाहेर आली. महेशने चितेत उडी घेतल्याचे त्यांनी लोकांना सांगितले. यावेळी लोकांनी स्मशानभुमीत धाव घेतली. मात्र तोवर महेश जळून खाक झाला होता.
मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांना पत्र!
-प्रति मा. राजसाहेब ठाकरे. सस्नेह जय महाराष्ट्र! आपणास हे पत्र लिहिण्याचे कारण की आपण निवडणूक निकालावर "अनाकलनीय !" असं निवडणूक निकालावरून भाष्य केलं होतं. खरं तर तुमच्याप्रमाणे आमचाही एकवेळ विश्वास बसला नाही. कारण सन 2014 ला जी मोदी लाट होती ती ह्या वेळी नव्हती.शिवाय मोदी सरकारविरोधात जनमत निर्माण झालं होतं त्यामुळे मोदी हरणार अशीच एकूण राजकीय परिस्थिती होती. पण शेवटी लोकांचा निर्णय म्हणून आम्ही तो स्वीकारला. या निकालानंतर तुम्हाला Facebook वर ट्रोल होताना बघून एक निष्ठावान पत्रकार म्हणून खूप वाईट वाटत होते पण आम्ही त्यांना सडेतोड उत्तर दिल्यानंतर सुद्धा काहीच करू शकलो नाही.याची खंत वाटते त्याबद्दल माफी असावी. तुमच्यावरच्यावरील ' Good Morning साहेब, पोपट, पेंटर, काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रचारक, माध्यमांनी फुगवलेला फुगा वगैरेच्या टिका असल्या तरी आपण भाषणांतून पुराव्यानिशी, संदर्भ देऊन,स्वतःचे विचार असणाऱ्या लोकांच्या तर्काला पटेल