खळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध भारतीय पुरातत्व विभागाचा डॉ. मंगेश गुलवाडे यांना नोटीस, मग मनपाकडून बांधकामाला परवानगी दिली कशी ? मनपाचा भ्रष्ट कारभार भाग - १६ चंद्रपूर मनपाचा भ्रष्ट कारभार आता शहरातील जनतेच्या जिव्हारी लागण्याची वेळ आली असून सत्ताधाऱ्यांना वाट्टेल ते सूट देवून सर्वसामान्यांना वेठीस धरल्याने शहरवाशीयांमधे संतापाची लाट निर्माण झाली आहे. एकीकडे गोरगरीबांच्या झोपड्या तोडायला यांना न्यायालयाच्या आदेशाची सुद्धा आवश्यकता लागत नाही तर श्रीमंत आणि सत्ताधारी यांचे अवैध बांधकाम तोडण्याचे आदेश असताना सुद्धा मनपा प्रशासन ते बांधकाम तोडत नाही तर मग चंद्रपूर महानगर पालिकेत कायद्याचे राज्य आहे का ? असा प्रश्न आता पडायला लागला आहे ? एरव्ही सुसंस्कृत पक्ष म्हणून मिरविनाऱ्या भाजप पक्षाची सत्ता चंद्रपूर महानगर पालिकेत असताना त्याच भाजप पक्षातील महापौरांच्या नातेवाईकांचे
Breaking News
ब्रेकिंग न्यूज :- शाळा कधी सुरू होणार ? विद्यार्थ्यांची धकधक वाढली !
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना येणार थोड्याच दिवसात ! शिक्षण विशेष :- केंद्र सरकार झोननुसार पुन्हा शाळा पुन्हा उघडण्याच्या विचारात आहे. पहिल्यांदा ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये शाळा उघडण्यात याव्यात, असा सरकारचा मानस आहे. पहिल्यांदा मोठ्या वर्गातील मुलांना शाळेत बोलवण्यात येणार आहे. दुसरीकडे आठवीपर्यंतच्या मुलांना घरातूनच अभ्यास करावा लागणार आहे. कारण ते पूर्णतः स्वतःची काळजी घेऊ शकत नाहीत. शाळा उघडण्यासाठी अधिकृतरीत्या नियमावली या आठवड्याच्या अखेरपर्यंत प्रसिद्ध केली जाणार आहे. सर्वच मंत्रालयांच्या सहमती मिळाल्यानंतर याला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. देशातील सर्वच शाळा १६ मार्चपासून बंद करण्यात आल्या आहेत. तेव्हापासून आतापर्यंत मध्ये दोन महिन्यांचा कालावधी लोटला. त्यामुळे शाळा आता कधी उघडणार याचीच सगळ्यांना काळजी लागून राहिली आहे. ३० टक्के उपस्थितीनं उघडणार शाळा! इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, शाळांना जुलैमध्ये उघडण्यात येणार आहेत. सोशल डिस्टन्सिंग लक्षात घेता ३० टक्के उपस्थिती अनिवार्य
मोठी कारवाई :- जीवती पोलिसांनी वाहनासह पकडली 7 लाख 44 हजार रूपयांची दारू
एकाला अटक तर दोघे आरोपी फरार ! जिवती प्रतिनिधी :- तालुक्या लगत असलेल्या तेलंगणा राज्यातील केरामेरी येथून चुप्या मार्गाने अवैध दारूची तस्करी होत असल्याची माहिती जिवती पोलिसांना मिळताच शुक्रवारी रात्री 10 वाजताच्या दरम्यान येसापुर-अंतापुर मार्गावर सापळा रचुन वाहनासह सात लाख 44 हजार पाचशे रूपयांची दारू जप्त करून एकास अटक केली आहे. सर्वत्र कोरोना या आजाराने दहशत माजविली आहे.लगतच्या तेलंगणा राज्यातील जैनूर आणि वाकडी येथे कोरोनाचे पाॕझिटिव्ह रूग्ण मिळाल्याने प्रशासन वेळीच सतर्क होत संपूर्ण सिमा मार्ग बंद केले आहे.असे असतानाही अवैध दारूची तस्करी चुप्प्या मार्गाने होत असल्याची गुप्त माहिती जिवती पोलिसांना मिळताच सहा.पोलिस निरिक्षक विश्वास पुल्लरवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.शि.रमाकांत अमुगे,शैलेश दुर्गावाड,एकनाथ सुरनर यांनी येसापुर-अंतापुर या मार्गावर सापळा रचून 10 वाजताच्या दरम्यान एम एच-24 व्हि 6550 या अर्टिगा वाहनाची तपासणी केली असता मॕकडाल्स या
त्या कथित” सुपारी ‘ विक्री प्रकरणात नेमके तथ्य काय? पोलिस वर्तुळासह शहरात खमंग चर्चा
गोंडपिंपरी पोलिस स्टेशन ठाणेदार यांच्या कर्त्यव्यावर प्रश्नचिन्ह ? गोंडपिपरी :- तालुका प्रतिनिधी संपूर्ण जगात थैमान घालणाऱ्या कोरोनाव्हायरस मुळे इतिहासात प्रथमताच लॉक डाऊन करणे भाग पडले. या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तूंसह अन्य वस्तूंचे भाव गगनाला भिडल्या चे दिसून येते. अशातच खर्रा शौकिनांची वाढती मागणी पाहून सुगंधित तंबाखू व अन्य वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्या व्यवसायिकांनी पान मटेरियल साहित्याची दुपटी तिपटीने दरवाढ करून विक्री करण्याचा गोरख धंदा चालविला आहे. याचाच फायदा घेत गोंडपिपरी ठाण्यातील दोन युवा पोलीस शिपायांनी सुगंधित तंबाखू असल्याच्या संशयावरून एका इसमाचे वाहन अडवून कसून तपासणी केली. मात्र हाती केवळ सुपारी हे पान मटेरियल साहित्य मिळाल्याने मिळकत कमवू पाहणाऱ्या त्या दोन शिपायांनी चक्क सुपारीचे पोते ठाण्यात आणले. हस्तगत केलेल्या सुपारीचा परस्पर विक्रीचा अयशस्वी प्रयत्न त्या दोघांनी चालविला. मात्र बिंग फुटण्याच्या धास्तीने विक्री केलेली सुपारी परतं
मोदी पंतप्रधान झाल्यापासून देशाला लागले ग्रहण ? कोरोना व्हायरसच्या भितीने २१ दिवसांच्या संचारबंदीतून देशाच्या अर्थव्यवस्थेचा होणार बट्ट्याबोळ ?
देशातील जनतेला घरातच राहण्याचे आव्हान केले पण त्यांना दोन वेळेच्या जेवणाचे काय ? याचे उत्तर नाही, लक्षवेधी :- आपल्या देशात कोरोनाचं संकट पुढे ठाकलं आहे. हा कोरोना व्हायरस इतक्या झपाट्यानं पसरत आहे की, तैयारी करता येत नाही. त्यामुळे आज रात्रीपासून संपूर्ण देश लॉकडाउनमध्ये जात आहे,' अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली. व पुढील 21 दिवस संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात येणार आहे असेही त्यांनी जाहीर केले, खरं तर आता देशावर कोरोनाचे संकट आहे आणि त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी जनतेने सरकारला आणि सरकारी यंत्रणेला सहकार्य करणे गरजेचे आहे, पण हे संकट कसे काय ओढवले ? जेंव्हा शेजारी राष्ट्र असलेल्या चिनमधे कोरोना व्हायरस पसरत होता तेंव्हा आपल्या पंतप्रधानांच्या अधिनस्त असणाऱ्या गुप्तचर यंत्रणा काय करीत होत्या ? काय त्यांना हा व्हायरस आपल्या देशात येणार आणि आपली
सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या दुल्हेशाह बाबा दर्गा येथे उर्स महोत्सव !
तीन दिवस चालणार उर्स महोत्सव कार्यक्रम ! कोरपना प्रतिनिधी :- तालुक्यातील प्रसि'द्ध दर्गा जनतेचे श्रद्धास्थान कुसळ येथील दुल्हेशाह बाबा यांचा उर्स कार्यक्रम होळीच्या तीन दिवस अगोदर पासुन दरवर्षी होत असते, या उर्स ला तालुक्यातील व तालुक्या बाहेरील जनता हजेरी लावुन आपले नवस पुर्ण करण्यासाठी दर्ग्यावर नतमस्तक होतात. तिन दिवस चालणाऱ्या या उर्सला मोठ्या प्रमाणात जत्रा भरत असते व विविध कार्यक्रमांचे सुद्धा आयोजन करण्यात येते, सर्वच जाती धर्माचे लोक या ठिकाणी हजेरी लावत असतात या वर्षी दिनांक ६ मार्चला सुरु होणारा उर्स आठ तारखेला संपणार आहे.कौमी एकता समारोह या कार्यक्रमाचे अध्यक्ष बल्लारपूर चे आमदार तसेच माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे राहणार असुन उदघाटक खासदार बाळुभाऊ धानोरकर हे राहणार आहे तर विषेश अतिथी म्हणून सुभाष भाऊ छोटेआमदार, किशोर जोरगेवार, माजी आमदार संजय धोटे
धक्कादायक :-अखेर कैलास अग्रवाल सह इतर कोळसा माफियांना जामीन,
*कोळसा माफियांना अभयदान दिल्यामुळे आता चौकशीचे काय ? *न्यायालयात जामीन होण्यासाठी काय तर्क लावले असावे ? यांवर होणार चर्चा, *पोलिस प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे लक्ष, कोळसा चोरी प्रकरण! चंद्रपूर प्रतिनिधी :- जिल्ह्यातील विविध कोळसा खाणीतून निघणारा लघुउद्योगांचा अल्पदरातील कोळसा खुल्या बाजारात चढ्या दराने विक्री सुरू असल्याच्या गंभीर प्रकरणात महाराष्ट्र स्टेट मायनिंग कार्पोरेशनच्या तक्रारीनंतर कैलास अग्रवाल यांच्यासह रोशन लाइम वर्क्सचे आसिफ रहेमान आणि नागपूरच्या प्राइड कोल अण्ड मिनरल्स प्रा. लि. चे शहजाद शेख यांचेवर ४२० सह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते, आणि हे प्रकरण महाराष्ट्रातील कोळसा चोरी प्रकरणातील सर्वात मोठे प्रकरण असल्याने व यामधे आणखी काही कोळसा माफिया व राजकीय नेत्यांचा सहभाग असल्याने या प्रकरणात किमान जिल्हा सत्र न्यायालयात जामीन होईल अशी शक्यता नव्हती, पण न्यायालयापुढे जामीन संदर्भात जे तर्क ठेवन्यात आले असेल ते
भद्रावती शहरात अवैध दारू विक्रेत्यांकडून पोलिसांची लाखोंची हप्ता वसुली, कैमेऱ्यात झाली कैद !
प्रत्यक्षदर्शीनी काढले विडिओ, पोलिस कर्मचारी देरकर आणि खनके यांचा समावेश, दारूविक्रेत्यांचा विडिओ आला समोर ! भद्रावती प्रतिनिधी :- मागील काही महिन्यांपूर्वी शाहबाज सय्यद नावाच्या पोलिस कर्मचाऱ्यांचा अवैध दारू विक्रेत्यांकडून हप्ता वसुलीचा प्रकार भूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलवर प्रकाशित झाल्यानंतर भद्रावती शहरात पोलिस विभागात खळबळ उडाली होती. त्यानंतर त्या शाहबाज सय्यद यांचेकडून वसुलीचे काम काढून टाकण्यात आले होते. मात्र आता नवीनच पोलिस कर्मचारी असलेले देरकर व खनके हे अवैध दारू विक्रेत्यांकडून जवळपास चार लाख रुपयाची हप्ता वसुली करीत असल्याचा विडिओ हाती लागला असून यामधे एक छोटासा पानठेला टाकून बसलेला व्यक्ती हा भद्रावतीच्या मुख्य टप्प्यावर अवैध पद्धतीने दारू विक्री चालवीत असून तो व त्याचे सोबत असलेले काही अवैध दारू विक्रेते हे महिन्याकाठी चार ते साडेचार लाख रुपये हे पोलिसांना हप्ता वसुलीच्या नावाखाली देत असल्याचा धक्कादायक
अर्थ च्या वर्धापनदिन निमित रक्तदान शिबीर संपन्न!
अर्थ आणि जस्फ यांच्या संयुक्त पुढाकार. जिवती/कोरपणा प्रतिनिधी प्रमोद गिरडकर :- दिनांक २९ डिंसेबर २०१९ रोज रविवारला अर्थ संस्थेच्या च्या वर्धापन दिनानिमित्त अर्थ आणि जस्फ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन जिवती येथे करण्यात आले होते . या कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हा परिषद सदस्य मा. गोदरू पाटील जुमनाके यांनी केले तर अध्यक्ष म्हणून मा.हरिभाऊ मोरे( नगरसेवक/ माजी सभापती ) हे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.लक्ष्मण मंगाम ,प्रा.गंगाधर लांडगे , प्रा. पांडुरंग सावंत , प्रा.संजय मुंडे , अशपाक भाई शेख (उपनगराध्यक्ष ) , जमालु भाई शेख , लक्ष्मन बिरादर ,गोविन्द टोकरे , तुकाराम गिर्माजी , भारत बिरादार, ज्ञानोबा बिरादार , प्रभाकर पवार , संदीप चव्हाण सर( विस्तार अधिकारी) , देशमुख सर , दुर्योधन सर , वारकड़ सर , डॉ कुलभूषण मोरे (संचालक अर्थ )
मोबाईल ग्राहकांना बसणार मोठा फटका.जियो सह चारही कंपन्यांनी 40 ते 42 टक्क्यांनी वाढवले रिचार्ज दर !
जियो ची दे धणाधण नेट सुविधा होणार महाग ! ग्राहक वार्ता :- अलीकडेच,व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेलने 42% किंमतीत वाढीसह नवीन योजना आणल्या आहेत, ज्या 3 डिसेंबरपासून लागू केल्या गेल्या. त्यामुळे आता आता मुकेश अंबानी यांनीही मोठी घोषणा करून जियो चे रिचार्ज दर 40 टक्क्यांनी वाढविले आहे. मिळालेल्या माहितीनुसार असे म्हटले जात आहे की जियो कंपनी वाढीव दर 6 डिसेंबर 2019 पासून म्हणजे उद्यापासून लागू करेल. याचा अर्थ आता इतर कंपन्या 3 डिसेंबरपासून आययूसी शुल्कदेखील सुरू करणार आहेत.पण आता जिओ ग्राहकांसाठी आनंदाची बातमी यांच्यासाठीआहे की जिओ आपल्या योजनेच्या किंमतींमध्ये केवळ 40% वाढ करेल.पण 40% वाढ करतांना सुद्धा त्यांचा 300% अधिक नफा होणार आहे. आतापर्यंत जियो कंपनीने दूरसंचार विश्वात एक मोठा धमाका करून अगदी 149 रुपयात महिनाभर मोबाईल ग्राहकांना परवडेल अशा किंमतीत रिचार्ज उपलब्ध करून दिले त्यामुळेच